जुते मारो सालों को, भाजपाच्या आमदारांकडून भरसभागृहात नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी घोषणाबाजी

| Updated on: Mar 03, 2022 | 12:21 PM

महाराष्ट्र विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिनेशन (Budget Session) आजपासून सुरू झालं आहे. यावेळी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून भाजपानं (BJP) सरकारला घेरलं आहे. जुते मारो सालों को, अशी घोषणा भाजपानं केलीय.

जुते मारो सालों को, भाजपाच्या आमदारांकडून भरसभागृहात नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी घोषणाबाजी
राज्य सरकारवर टीका करताना विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस
Follow us on

मुंबई : महाराष्ट्र विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिनेशन (Budget Session) आजपासून सुरू झालं आहे. यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सरकारला घेरलं आहे. भाजपानं आक्रमक भूमिका घेतली असून नवाब मलिक हाय हायच्या घोषणा तर भाजपानं दिल्याच. त्याचबरोबर जुते मारो सालों को, अशी आक्षेपार्ह घोषणाबाजीही भाजपाच्या आमदारांनी केलीय. विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, आशिष शेलार, अतुल भातखळकर आदी नेत्यांनी मलिकांविरोधात घोषणाबाजी केली. भाजपा नेत्यांच्या या आंदोलनात काही वेळानंतर विधान सभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसदेखील (Devendra Fadanvis) सहभागी झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजपाच्या नेत्यांनी यावेळी केली.

‘नैतिकतेला धरून नाही’

दाऊदसोबत व्यवहार केल्याचा नवाब मलिक यांच्यावर आरोप आहे. हसीना पारकरला पैसे दिल्याचे भाजपाचं म्हणणं आहे. मुंबईत जे बॉम्बस्फोट झाले, त्यातील आरोपींसोबत व्यवहार करून आणि हसीना पारकरला पैसे देऊन ज्याप्रकारे हे काम झालं आहे. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आलीय, अशी अटक झालेली असताना एखादा मंत्री मंत्रीपदावर राहतो, हे नैतिकतेला धरून नाही, असे भाजपाचे म्हणणे आहे.

‘आमची अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडून…’

मुख्यमंत्र्यांनी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जर असते तर एका मिनिटांत त्यांना काढून टाकलं असतं. कारण मुंबईसोबत त्यांनी गद्दारी केली आहे. ते मुंबईचे अपराधी आहेत. ज्यांनी मुंबई बॉम्बस्फोट घडला त्यांच्याकडून फक्त जमीनच नाही घेतली, तर 50 लाख रुपये हसीना पारकरला दिला. दाऊदच्या बहिणीला पैसे देणं याचा अर्थ काय? अध्यक्ष महोदय या ठिकाणी आमची मागणी आहे, की दाऊदला समर्थन देणाऱ्या मंत्र्याचा राजीनामा घेतलाच पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आणखी वाचा :

Video : राज्यपाल येताच शिवाजी महाराजांच्या वक्तव्यावर आमदारांची घोषणाबाजी, जयंत पाटील म्हणाले, राष्ट्रगीतालाही थांबले नाहीत

VIDEO | नवाब मलिक हाय हाय, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मलिकांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक

नवाब मलिकांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता, ईडीकडे नवी तक्रार