वाझे लादेन आहे का म्हणणारे मुख्यमंत्री कुठे आहेत?, उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा; निलेश राणेंची मागणी

| Updated on: Mar 15, 2021 | 11:25 AM

निलेश राणे यांनी एकापाठोपाठ तीन ट्विट करून वाझे प्रकरणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. (BJP's Nilesh Rane Demands Resignation Of CM Uddhav Thackeray)

वाझे लादेन आहे का म्हणणारे मुख्यमंत्री कुठे आहेत?, उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा; निलेश राणेंची मागणी
निलेश राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई: सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे लादेन आहे का? असा सवाल करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुठे आहे? असा सवाल करतानाच मुख्यमंत्रीच जर अशा अधिकाऱ्यांची बाजू घेत असतील तर त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांनी पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे. (BJP’s Nilesh Rane Demands Resignation Of CM Uddhav Thackeray)

निलेश राणे यांनी एकापाठोपाठ तीन ट्विट करून वाझे प्रकरणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. वाझे लादेन आहे का म्हणणारे मुख्यमंत्री कुठे आहेत? आतंकवाद्यांच्या वस्तू घेऊन जर पोलीस अधिकारी लोकांना ठार मारायला लागले आणि मुख्यमंत्री त्यांची बाजू घ्यायला लागले तर अशा मुख्यमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांनी पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी निलेश राणे यांनी केली आहे.

राष्ट्रपती राजवट लागू करा

शिवसेनेला मुकेश अंबानींकडून पैसे काढायचे होते, असं सचिन वाझेंनी म्हटल्याचा मीडिया रिपोर्ट आहे. याचा अर्थ शिवसेना या क्राईममध्ये एक पार्टी आहे. राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे. त्यामुळे याबाबतचं सर्व सत्य बाहेर पडणार नाही म्हणून महाराष्ट्रात ताबडतोब राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी राणे यांनी केली आहे.

सुशांत-दिशा सालियानप्रकरणातही हेच घडलं

25 फेब्रुवारी रोजी अंबानींच्या घराबाहेर जिलेटीनने भरलेली गाडी सापडली. 5 मार्चला मनसुख हिरेनची बॉडी सापडली. 6 मार्चला तपास ATS कडे देण्यात आला. पण 2 मार्चलाच वाझेंच्या घराजवळचे सर्व CCTV गायब झाले. हेच सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियानच्या केसमध्ये घडलं. पण तिथे आरोपी मोठ्या बापाचा मुलगा आहे म्हणून आजपर्यंत वाचला, असा दावाही त्यांनी केला आहे.

नारायण राणेंचीही राष्ट्रपती राजवटीची मागणी

नारायण राणे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन सचिन वाझेप्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली होती. अंबानी स्फोटक प्रकरणात पोलिसांचा वैयक्तिक कारणांसाठी वापर केला जात आहे. कुणाला तरी वाचवण्यासाठी हा सगळा खटाटोप सुरू आहे, असं सांगतानाच आज कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. कुणाला कधी काय होईल याची काही शाश्वती राहिली नाही. विकास नाही आणि पण भ्रष्टाचार वाढला आहे. त्यामुळेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी अमित शहा यांच्याकडे करण्यात आल्याचं राणे म्हणाले.

 

दिशा सालियानपासून ते मनसुखपर्यंतची चौकशी करा

दिशा सालियनवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. दिशाच्या घरी तिचे काही मित्र गेले होते. त्यावेळी त्यांची बाचाबाची झाली. त्यातच तिची हत्या झाली. त्यावेळी तिथे एक मंत्रीही उपस्थित होता, असा दावा करतानाच दिशा सालियन प्रकरणापासून ते सुशांतसिंग ते मनसुखप्रकरणापर्यंतची वाझेंची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राणे यांनी केली आहे. जेलमधल्या रवी पुजारींच्या स्टेटमेंटवरुन चौकशी झालीय. पुजारीलाही या प्रकरणात काही सांगायचे आहे, असं मी ऐकून आहे. त्यामुळे अजून कुणाच्या हत्या झाल्यायेत का? याची चौकशी व्हावी, अशी मागणीही नारायण राणेंनी केली होती. (BJP’s Nilesh Rane Demands Resignation Of CM Uddhav Thackeray)

 

संबंधित बातम्या:

 ‘या प्रकरणातील सत्य बाहेर आलं तर ठाकरे सरकार पडेल,’ कंगनाचं मोठं वक्तव्य

सचिन वाझेंना निलंबित करणार का?; अनिल देशमुखांचा काढता पाय!

पवारांना प्रश्न केला वाझे प्रकरणाबद्दल तर ते काय म्हणाले? देशाच्या राजकारणावर बोलले पण वाझेवर?

(BJP’s Nilesh Rane Demands Resignation Of CM Uddhav Thackeray