AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election 2026: मुंबईच्या ‘या’ वॉर्डात उमेदवार फक्त 7 मतांनी जिंकला, काँग्रेसकडून भाजपला धक्का

BMC Election 2026: फक्त 7 मतांना मुंबईच्या महत्त्वाच्या वॉर्डात भाजपाला पराभव स्वीकारावा लागला आहे. हा काँग्रेसकडून भाजपाला मिळालेला फार मोठा धक्का आहे... सांगायचं झालं राजकीय गणीत बदलल्यामुळे यंदाची निवडणूक चर्चेत राहिली...

BMC Election 2026:  मुंबईच्या  'या' वॉर्डात उमेदवार फक्त 7 मतांनी जिंकला, काँग्रेसकडून भाजपला धक्का
Congress
| Updated on: Jan 17, 2026 | 10:10 AM
Share

BMC Election 2026: महाराष्ट्रात महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडला आणि पुन्हा भाजप मोठा पक्ष ठरला. पण मुंबईतील एका वॉर्डात काँग्रेसकडून भाजपला मोठा धक्का बसला आहे. कारण फक्त सात मतांच्या फरकामुळे काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. सांगायचं झालं तर, मतमोजणीनंतर अवाक् करणारे निकाल समोर आले. सांताक्रूझ, वॉर्ड क्रमांक 90 मध्ये विजय आणि पराभवातील फरक फक्त 7 मतांचा होता. यामुळे भाजपला माघार घ्यावा लागला. महापालिका निवडणुकीतील हा सर्वात महत्त्वाचा निकाल ठरला आहे. सांताक्रूझ, वॉर्ड क्रमांक 90 मध्ये काँग्रेस उमेदवार ट्यूलिप ब्रायन मिरांडा यांनी भाजपच्या ज्योती अनिल उपाध्याय यांचा पराभव केला आहे. फक्त सात मतांनी ज्योती उपाध्याय यांचा पराभव झाला आहे.

अधिकृत आकड्यांनुसार, काँग्रेसचे उमेदवार ट्यूलिप मिरांडा यांनी 5 हजार 197 मत मिळाले. तर भाजपच्या ज्योती अनिल उपाध्याय यांनी 5 हजार 190 मत मिळाले. या अगदी छोट्याशा फरकामुळे हा प्रभाग संपूर्ण बीएमसी निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत राहिला.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 227 वॉर्डांपैकी एक वॉर्ड क्रमांक 90 आहे. हा वॉर्ड सामान्य प्रवर्गासाठी राखीव आहे. त्याची एकूण लोकसंख्या 56 हजार 468 आहे. बीएमसी निवडणुकीत राजकीय पक्षांसाठी हा वॉर्ड नेहमीच महत्त्वाचा राहिला आहे.

वॉर्ड क्रमांक 90 मध्ये निवडणुकीच्या रिगंणात उतरलेले उमेदवार…

अंसारी मसूद अब्दुलकासिम – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

सुरेशा केशव आचार्य – आम आदमी पार्टी

ज्योती अनिल उपाध्याय – भारतीय जनता पार्टी

एडवोकेट ट्यूलिप ब्रायन मिरांडा – कांग्रेस

सना अब्बास कुरैशी – समाजवादी पार्टी

गणेश जनप्पा अन्नारेड्डी – अपक्ष

जॉर्ज अब्राहम – अपक्ष

सुभाष महादेव सावंत – अपक्ष

सिंह विपिनकुमार- अपक्ष

2017 च्या निकालानंतर काय बदललं?

2017 मध्ये झालेल्या BMC च्या निवडणुकीत देखील वॉर्ड क्रमांत 90 मधून ट्यूलिप ब्रायन मिरांडा विजयी उमेदवार ठरले होते. 2017 मध्ये, समाजवादी पक्षाचे बेनेडिक्ट डेनिस किनी या प्रभागात 4 हजार 373 मते मिळवून दुसऱ्या क्रमांकावर राहिले. त्या निवडणुकीत नोटालाही 430 मते मिळाली. तर 2026 मध्ये, विजयाचं अंतर फक्त 7 मतांपर्यंत कमी झालं आहे.

मालाड पश्चिमेच्या प्रभाग 46 मध्ये भाजपचा त्सुनामीचा विजय

सांताक्रूझ याठिकाणी भाजपचा पराभव झाला. पण मलाड पश्चिम वॉर्ड क्रमांक 46 मध्ये भाजपचा दणदणीत विजय झाला. भाजप उमेदवार योगिता सुनील कोळी यांचा 37 हजार 831 मतांनी विजय झाल्या. तर त्यांच्या विरोधात रिंगणात उतरलेल्या मनसेच्या स्नेहिता संदेश देहलिकर यांचा पराभव झाला.

संपूर्ण बीएमसी निवडणुकीचं मोठं राजकीय गणित

बीएमसी निवडणुकीत सत्ता संतुलन पूर्णपणे भाजप-एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेच्या बाजूने होतं. भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेने 118 जागा जिंकल्या. भाजपने 89 जागा जिंकल्या, तर शिंदे गटाने 29 जागा जिंकल्या. बहुमताचा आकडा 114 आहे.

शिवसेनेने (यूबीटी) 65 जागा जिंकल्या, मनसेने 6 जागा जिंकल्या, राष्ट्रवादीने (शरद पवार) 1 जागा जिंकली, काँग्रेसने 24 जागा जिंकल्या आणि एआयएमआयएमने 8 जागा जिंकल्या. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीने 3 जागा, समाजवादी पक्षाने 2 जागा जिंकल्या आणि अपक्षांनी 2 जागा जिंकल्या.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...