
BMC Election 2026: महाराष्ट्रात महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडला आणि पुन्हा भाजप मोठा पक्ष ठरला. पण मुंबईतील एका वॉर्डात काँग्रेसकडून भाजपला मोठा धक्का बसला आहे. कारण फक्त सात मतांच्या फरकामुळे काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. सांगायचं झालं तर, मतमोजणीनंतर अवाक् करणारे निकाल समोर आले. सांताक्रूझ, वॉर्ड क्रमांक 90 मध्ये विजय आणि पराभवातील फरक फक्त 7 मतांचा होता. यामुळे भाजपला माघार घ्यावा लागला. महापालिका निवडणुकीतील हा सर्वात महत्त्वाचा निकाल ठरला आहे. सांताक्रूझ, वॉर्ड क्रमांक 90 मध्ये काँग्रेस उमेदवार ट्यूलिप ब्रायन मिरांडा यांनी भाजपच्या ज्योती अनिल उपाध्याय यांचा पराभव केला आहे. फक्त सात मतांनी ज्योती उपाध्याय यांचा पराभव झाला आहे.
अधिकृत आकड्यांनुसार, काँग्रेसचे उमेदवार ट्यूलिप मिरांडा यांनी 5 हजार 197 मत मिळाले. तर भाजपच्या ज्योती अनिल उपाध्याय यांनी 5 हजार 190 मत मिळाले. या अगदी छोट्याशा फरकामुळे हा प्रभाग संपूर्ण बीएमसी निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत राहिला.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 227 वॉर्डांपैकी एक वॉर्ड क्रमांक 90 आहे. हा वॉर्ड सामान्य प्रवर्गासाठी राखीव आहे. त्याची एकूण लोकसंख्या 56 हजार 468 आहे. बीएमसी निवडणुकीत राजकीय पक्षांसाठी हा वॉर्ड नेहमीच महत्त्वाचा राहिला आहे.
अंसारी मसूद अब्दुलकासिम – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
सुरेशा केशव आचार्य – आम आदमी पार्टी
ज्योती अनिल उपाध्याय – भारतीय जनता पार्टी
एडवोकेट ट्यूलिप ब्रायन मिरांडा – कांग्रेस
सना अब्बास कुरैशी – समाजवादी पार्टी
गणेश जनप्पा अन्नारेड्डी – अपक्ष
जॉर्ज अब्राहम – अपक्ष
सुभाष महादेव सावंत – अपक्ष
सिंह विपिनकुमार- अपक्ष
2017 मध्ये झालेल्या BMC च्या निवडणुकीत देखील वॉर्ड क्रमांत 90 मधून ट्यूलिप ब्रायन मिरांडा विजयी उमेदवार ठरले होते. 2017 मध्ये, समाजवादी पक्षाचे बेनेडिक्ट डेनिस किनी या प्रभागात 4 हजार 373 मते मिळवून दुसऱ्या क्रमांकावर राहिले. त्या निवडणुकीत नोटालाही 430 मते मिळाली. तर 2026 मध्ये, विजयाचं अंतर फक्त 7 मतांपर्यंत कमी झालं आहे.
सांताक्रूझ याठिकाणी भाजपचा पराभव झाला. पण मलाड पश्चिम वॉर्ड क्रमांक 46 मध्ये भाजपचा दणदणीत विजय झाला. भाजप उमेदवार योगिता सुनील कोळी यांचा 37 हजार 831 मतांनी विजय झाल्या. तर त्यांच्या विरोधात रिंगणात उतरलेल्या मनसेच्या स्नेहिता संदेश देहलिकर यांचा पराभव झाला.
बीएमसी निवडणुकीत सत्ता संतुलन पूर्णपणे भाजप-एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेच्या बाजूने होतं. भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेने 118 जागा जिंकल्या. भाजपने 89 जागा जिंकल्या, तर शिंदे गटाने 29 जागा जिंकल्या. बहुमताचा आकडा 114 आहे.
शिवसेनेने (यूबीटी) 65 जागा जिंकल्या, मनसेने 6 जागा जिंकल्या, राष्ट्रवादीने (शरद पवार) 1 जागा जिंकली, काँग्रेसने 24 जागा जिंकल्या आणि एआयएमआयएमने 8 जागा जिंकल्या. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीने 3 जागा, समाजवादी पक्षाने 2 जागा जिंकल्या आणि अपक्षांनी 2 जागा जिंकल्या.