AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीएमसी अभियांत्रिकी सेवा-प्रकल्पांच्या संचालकपदाची धुरा पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्याच्या खांद्यावर

अर्चना आचरेकर या 1984 पासून मुंबई महानगरपालिकेत काम (BMC Engineering And Projects Department Headed By Women) करतात.

बीएमसी अभियांत्रिकी सेवा-प्रकल्पांच्या संचालकपदाची धुरा पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्याच्या खांद्यावर
| Updated on: Jun 28, 2020 | 5:54 PM
Share

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अभियांत्रिकी सेवा आणि प्रकल्पांच्या संचालकपदी प्रथमच एक महिला अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. अभियंता अर्चना आचरेकर असे या महिलेचे नाव असून पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी त्यांची नेमणूक केली आहे. अर्चना आचरेकर या 1984 पासून मुंबई महानगरपालिकेत काम करतात. (BMC Engineering And Projects Department Headed By Archana Achrekar A Woman For The First Time)

विशेष म्हणजे यानिमित्ताने अभियांत्रिकी सेवा आणि प्रकल्प विषयक संचालकपदी महापालिकेच्या इतिहासात प्रथमच एका महिलेची नेमणूक झाली आहे. यापूर्वी आचरेकर या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘नगर अभियंता’ अर्थात ‘सिटी इंजिनिअर’ म्हणून कार्यरत होत्या.

हेही वाचा –सरकारने ठरवलेले दरपत्रक बॅनरवर, कोरोनाग्रस्तांची लूट करणाऱ्या रुग्णालयांना मनसेचा दणका

कोण आहेत अर्चना आचरेकर?

  • अर्चना आचरेकर यांनी भारतातील अभियांत्रिकीय शिक्षणाचा पाया घालणाऱ्या मुंबईतील ‘वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट’ येथून अभियांत्रिकीचे पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले.
  • त्यानंतर जानेवारी 1984 पासून त्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत दुय्यम अभियंता म्हणून रुजू झाल्या होत्या.
  • बृहन्मुंबई महानगरपालिकेतील आपल्या कारकिर्दी दरम्यान त्यांनी विविध खात्यातील विविध पदांवर काम केले आहे.
  • आचरेकर यांची ‘संचालक’ पदी नियुक्ती झाल्यामुळे प्रथमच या पदावर एक जेष्ठ महिला अधिकारी विराजमान झाल्या आहेत. (BMC Engineering And Projects Department Headed By Archana Achrekar A Woman For The First Time)

संबंधित बातम्या : 

60 वर्षात पहिल्यांदा गृहमंत्र्यांची फॉरेन्सिक लॅबला भेट, अनिल देशमुख म्हणतात…

महिनाभरात राज्यातील 15-17 हजार रिक्त पदं भरणार : राजेश टोपे

Follow Us
नाशिक IT कंपनी धर्मांतरण प्रकरणी मोठी अपडेट समोर! मुख्य संशयित आरोपी..
Big Breaking | नाशिक IT कंपनी धर्मांतरण प्रकरणी मोठी अपडेट समोर! मुख्य संशयित आरोपी निदा खानला...
मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची...
मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची महत्त्वाची बैठक सुरू, बारामतीतील...
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने प्रवाशांना त्रास!
पंचगंगा नदीचं महारौद्ररुप! पाणीपातळी थेट 34 फुटांपर्यंत, डोळे विस्फारण
पंचगंगा नदीचं महारौद्ररुप! पाणीपातळी थेट 34 फुटांपर्यंत, डोळे विस्फारणारं दृश्य
पाहणारे पाहतच राहिले! मुंबईत समुद्राला तुफान भरती, 4.26 मीटर उंच...
पाहणारे पाहतच राहिले! मुंबईत समुद्राला तुफान भरती, 4.26 मीटर उंच उसळल्या लाटा
उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली; बदलापूरमध्ये पूराचा मोठा धोका
Badlapur | धोक्याची घंटा! उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली; बदलापूरमध्ये पूराचा मोठा धोका
सतर्क राहा...मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन! 8 तारखेपर्यंत अलर्ट,
सतर्क राहा...मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन! 8 तारखेपर्यंत अलर्ट, 300 मिमी पावसासह ढगफुटी...
प्रशासनाचा मोठा निर्णय; पुढील आदेशापर्यंत मुंबई–पुणे एसटी बस बंद
मोठी बातमी! प्रशासनाचा मोठा निर्णय; पुढील आदेशापर्यंत मुंबई–पुणे एसटी बस बंद
पुणे हादरलं! मावळमधील दरड दुर्घटनेत तीघांचा मृत्यू तर एकाच कुटुंबातील
पुणे हादरलं! मावळमधील दरड दुर्घटनेत तीघांचा मृत्यू तर एकाच कुटुंबातील... थरकाप उडवणारे दृश्य समोर
नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट! शाळा, बाजार, मंदिरेही बंद
Nashik | नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट! शाळा, बाजार, मंदिरेही बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय