60 वर्षात पहिल्यांदा गृहमंत्र्यांची फॉरेन्सिक लॅबला भेट, अनिल देशमुख म्हणतात...

गेल्या 60 वर्षात पहिल्यांदाच राज्याच्या गृहमंत्र्यांनी पुण्यातील फॉरेन्सिक लँबला भेट (Anil Deshmukh visited Pune Forensic laboratory) दिली.

60 वर्षात पहिल्यांदा गृहमंत्र्यांची फॉरेन्सिक लॅबला भेट, अनिल देशमुख म्हणतात...

पुणे : गेल्या 60 वर्षात पहिल्यांदाच राज्याच्या गृहमंत्र्यांनी पुण्यातील प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेला (फॉरेन्सिक लँब) भेट दिली. अनेक गुन्हे सिद्ध होण्याच्या संदर्भात या लँबचे काम खूप महत्त्वपूर्ण आहे, असे गृहमंत्री अनिल देशमुख या भेटीदरम्यान म्हणाले. (Home Minister Anil Deshmukh visited Pune Forensic laboratory)

गृहमंत्री अनिल देशमुखांनी नुकतंच फॉरेन्सिक लॅबला भेट देऊन त्याठिकाणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांच्या कामाची पद्धत, तसेच इतर अडीअडचणींबाबत माहिती घेतली.

प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा पुण्याचे उपसंचालक राजेंद्र कोकरे यांनी गृहमंत्र्यांचे स्वागत केले. त्यांना या प्रयोगशाळेत होत असलेल्या विविध कार्याविषयी सविस्तर माहिती दिली.

हेही वाचा – आधी कोरोनाच्या कामात ओव्हरटाईमचा ताण, आता पोलीस अधिकाऱ्यांवर खात्याअंतर्गत परीक्षेची टांगती तलवार

यात प्रामुख्याने संगणक गुन्हे, ध्वनी आणि ध्वनीफीत विश्लेषण, जीवशास्त्र, डीएनए, विषशास्त्र, सामान्य विश्लेषण आणि उपकरणे, दारूबंदीसह इतर उत्पादन शुल्क विभागामध्ये करण्यात येणाऱ्या कामकाजाची सविस्तर माहिती देण्यात आली. (Home Minister Anil Deshmukh visited Pune Forensic laboratory)

संबंधित बातम्या : 

कोरोनामुळे शहीद पोलिसांच्या कुटुंबियांना मोठा आधार, निवृत्तीपर्यंत शासकीय निवास, 65 लाखांची मदत

शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार : अनिल देशमुख

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *