हँकॉक पुलाच्या पुनर्बांधणीला आणखी वेग येणार, महत्त्वाचा टप्पा पूर्ण

| Updated on: Jun 07, 2021 | 9:26 PM

मध्य रेल्वेच्या भायखळा आणि सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या हँकॉक पुलाच्या पुनर्बांधणीतील महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे.

हँकॉक पुलाच्या पुनर्बांधणीला आणखी वेग येणार, महत्त्वाचा टप्पा पूर्ण
Hancock bridge
Follow us on

मुंबई : मध्य रेल्वेच्या भायखळा आणि सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या हँकॉक पुलाच्या पुनर्बांधणीतील महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. माझगाव आणि डोंगरी यांना जोडणाऱ्या हँकॉक पुलाच्या पुनर्बांधणीतील महत्त्वाचा टप्पा असलेला दुसरा गर्डर स्थापन करण्याचे काम मुंबई महापालिकेने काल (6 जून) पूर्ण झाले आहे. हा आव्हानात्मक आणि महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाल्याने या पुलाच्या पुनर्बांधणीला आणखी वेग येणार आहे. (BMC launched Second Girder across Hancock bridge)

माझगांव आणि डोंगरी यांना जोडणारा हँकॉक पूल 2016 मध्ये मध्य रेल्वेने तोडला. या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त (पायाभूत सुविधा) तथा प्रमुख अभियंता (रस्ते व पूल) राजेंद्रकुमार तळकर आणि त्यांचे सहकारी, अधिकारी हे या पुलाच्या पुनर्बांधणीची कार्यवाही करत आहेत.

दुसरा गर्डर स्थापन करण्याचे काम पूर्ण

हँकॉक पुलाच्या बांधणीतील पहिल्या टप्प्यात पहिला गर्डर जुलै 2020 मध्ये स्थापन करण्यात आला. त्यावरील पदपथ जानेवारी 2021 मध्ये सर्वसामान्यांच्या वापरासाठी खुला करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील सुमारे 675 मेट्रिक टन वजनाचा गर्डर हा रविवारी 6 जून 2021 रोजी पूर्ण करण्यात आला. मुंबई महानगरपालिका आणि मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी योग्य समन्वय साधून हे आव्हानात्मक काम पूर्ण केले.

पुलाची पुनर्बांधणी आणखी जलद गतीने

दरम्यान हा दुसरा गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाल्याने पुलाची पुनर्बांधणी आणखी जलद गतीने करता येणार आहे. या पुलाच्या रस्त्याचे काम, उपलब्ध रस्त्याची रुंदी, आवश्यक रुंदीकरण आणि बाधित कामांचे निष्कासन हे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे.

इतर बातम्या

चौपाट्यांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांच्या ताफ्यात अत्याधुनिक ATV वाहनं, वैशिष्ट्ये काय?

‘वेलारासू नावाचा राक्षस आ वासून बसलाय’, नालेसफाईवरुन शेलारांचा मुंबई महापालिकेवर हल्लाबोल

(BMC launched Second Girder across Hancock bridge)