मुंबई महापालिकेत महाविकास आघाडी पॅटर्नची नांदी, स्थायी समितीच्या अध्यक्षपदी यशवंत जाधव

| Updated on: Apr 05, 2021 | 5:08 PM

मुंबई महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या सेनेकडेच राहिल्या आहेत. मुंबई महापालिकेत राज्यातील महाविकासआघाडी पॅटर्न दिसून आला. BMC Standing Committee Election

मुंबई महापालिकेत महाविकास आघाडी पॅटर्नची नांदी, स्थायी समितीच्या अध्यक्षपदी यशवंत जाधव
मुंबईकरांना तिसऱ्या लाटेचा धोका? इमारत सील होणार, कुणालाही प्रवेश नाही, वाचा पालिका आयुक्तांचे निर्देश
Follow us on

मुंबई: मुंबई महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या सेनेकडेच राहिल्या आहेत. मुंबई महापालिकेत राज्यातील महाविकासआघाडी पॅटर्न दिसून आला. शिवसेनेचे यशवंत जाधव यांची चौथ्यांदा स्थायी समितीच्या अध्यक्ष पदी निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टीनं शिवसेनेना पाठिंबा दिला होता. तर, काँग्रेसनं त्यांचा उमेदवार माघे घेतला. मुंबई महापालिकेत महाविकासआघाडी पॅटर्न झाल्यानं भाजप उमेदवार पराभूत झाला. (BMC Standing Committee Election Shivsena candidate Yashwant Jadhav reelected with backed by NCP SP and BJP candidate defeated)

मुंबई महापालिकेत महाविकास आघाडी पॅटर्न

मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती निवडणुकीत शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षानं पाठिंबा दिला होता. तर, काँग्रेसने आपला अर्ज मागे घेत सेनेला अप्रत्यक्ष मदत केली. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये एकूण 27 सदस्य आहेत.

निवडणुकीत काँग्रेस तटस्थ

स्थायी समितीमध्ये एकूण 27 सदस्य आहेत. त्यापैकी 22 जणांनी मतदानात सहभाग घेतला. काँग्रेसचे स्थायी समितीमध्ये 3 सदस्य आहेत. ते स्थायी समिती निवडणुकीत तटस्थ राहिले आहेत.

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या यशवंत जाधव यांना 14 तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार राजश्री शिरवाडकर यांना 8 मते मिळाली आहेत.
भाजपाचे एक सदस्य भालचंद्र शिरसाट हे स्विकृत सदस्य असल्याने त्यांना मतदानाचा हक्क नव्हता.

यशवंत जाधव यांना संधी का?

मुंबई महापालिका स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून पुन्हा यशवंत जाधव यांची वर्णी लावण्यात आली. शिवसेना नगरसेवक यशवंत जाधव यांना चौथ्यांदा संधी देण्यात आली. आगामी बीएमसी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्थायी समिती निवडणुकीला विशेष महत्त्व आहे. महापालिकेत भाजपला रोखण्यासाठी यशवंत जाधव यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.

संध्या दोशी यांना शिक्षण समिती अध्यक्षपदी

शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी  झालेल्या निवडणुकीत  संध्या विपुल दोशी (सक्रे) (शिवसेना) या 13 मते मिळवून निवडून आल्या. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार पंकज यादव (भारतीय जनता पक्ष) यांना 09 मते मिळाली. 04 सदस्य तटस्थ राहिले. अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीत श्रीमती आशा सुरेश कोपरकर (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष) यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.

मुंबई महापालिकेतील सध्याचं पक्षीय बलाबल

शिवसेना – 92
भाजप – 82
काँग्रेस – 30
राष्ट्रवादी काँग्रेस – 9
समाजवादी पक्ष– 6
एमआयएम – 2
मनसे – 1
अभासे – 1

शिवसेनेकडून वैधानिक समिती निवडणुकीसाठी कोणाकोणाला संधी?

यशवंत जाधव यांना स्थायी समिती अध्यक्षपदासाठी, संध्या दोशी यांना शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी, सदा परब यांना सुधार समिती अध्यक्षपदासाठी आणि बेस्ट समिती अध्यक्षपदासाठी आशिष चेंबुरकर यांना शिवसेनेने संधी दिली आहे.

संबंधित बातम्या:

मुंबईतील पोलीस ठाण्यांच्या इमारतींची कामांना गती द्या, पालकमंत्री आदित्य ठाकरेंचे आदेश(Opens in a new browser tab)

BMC वैधानिक समिती निवडणूक : शिवसेनेला राष्ट्रवादी-सपाचा पाठिंबा, काँग्रेसचा निर्णय काय?

(BMC Standing Committee Election Shivsena candidate Yashwant Jadhav reelected with backed by NCP SP and BJP candidate defeated)