BMC वैधानिक समिती निवडणूक : शिवसेनेला राष्ट्रवादी-सपाचा पाठिंबा, काँग्रेसचा निर्णय काय?

महत्वाच्या समित्यांवर शिवसेनेकडून यंदा आधीच्याच अध्यक्षांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. (BMC Standing Committee Election Shivsena )

BMC वैधानिक समिती निवडणूक : शिवसेनेला राष्ट्रवादी-सपाचा पाठिंबा, काँग्रेसचा निर्णय काय?
मुंबईकरांना तिसऱ्या लाटेचा धोका? इमारत सील होणार, कुणालाही प्रवेश नाही, वाचा पालिका आयुक्तांचे निर्देश
Follow us
| Updated on: Apr 01, 2021 | 4:07 PM

मुंबई : मुंबई महापालिकेत महाविकास आघाडीची नांदी होताना दिसत आहे. महापालिका निवडणुकीच्या आधी होणाऱ्या वैधानिक समित्यांच्या निवडणुकीत शिवसेनेला राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाकडून पाठिंबा देण्यात आला आहे. स्थायी समिती अध्यक्षपदासाठी दिग्गज नगरसेवक यशवंत जाधव यांना चौथ्यांदा संधी देण्यात आली आहे. (BMC Standing Committee Election Shivsena backed by NCP SP)

भाजपला रोखण्यासाठी जुनी फळीच मैदानात

महत्वाच्या समित्यांवर शिवसेनेकडून यंदा आधीच्याच अध्यक्षांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेनेकडून भाजपला रोखण्यासाठी जुनी फळीच मैदानात उतरवण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाने अर्ज दाखल केले नाहीत.

काँग्रेसही शिवसेनेलाच पाठिंबा देणार

काँग्रेसकडून समिती निवडणुकांसाठी अर्ज दाखल झाले असले, तरी काँग्रेस अर्ज मागे घेणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेसही शिवसेनेलाच पाठिंबा देणार असल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात येत आहे. भाजपला रोखण्यासाठी आगामी काळात महापालिकेतही महाविकास आघाडीतल्या पक्षांची एकजूट होताना दिसत आहे.

शिवसेनेकडून वैधानिक समिती निवडणुकीसाठी कोणाकोणाचा अर्ज दाखल?

यशवंत जाधव यांचा स्थायी समिती अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल

संध्या दोषी यांचा शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल

सदा परब यांचा सुधार समिती अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल

बेस्ट समिती अध्यक्षपदासाठी आशिष चेंबुरकर यांना संधी

यशवंत जाधव यांना चौथ्यांदा संधी

मुंबई महापालिका स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून पुन्हा यशवंत जाधव यांची वर्णी लागली आहे. शिवसेना नगरसेवक यशवंत जाधव यांना चौथ्यांदा संधी देण्यात आली. आगामी बीएमसी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्थायी समिती निवडणुकीला विशेष महत्त्व आहे. महापालिकेत भाजपला रोखण्यासाठी यशवंत जाधव यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. (BMC Standing Committee Election Shivsena backed by NCP SP)

मुंबई महापालिकेतील सध्याचं पक्षीय बलाबल

  • शिवसेना – 92
  • भाजप – 82
  • काँग्रेस – 30
  • राष्ट्रवादी काँग्रेस – 9
  • समाजवादी पक्ष– 6
  • एमआयएम – 2
  • मनसे – 1
  • अभासे – 1

संबंधित बातम्या :

बीएमसी स्थायीसह सात समित्यांच्या अध्यक्षपदाची निवडणूक, सेनेसह भाजप, काँग्रेसही रिंगणात; अनिल परबांना विजयाचा विश्वास

BMC च्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे? स्थायी समिती अध्यक्षपदासाठी निवडणूक, शिवसेनेसमोर भाजपसह काँग्रेसचेही आव्हान

(BMC Standing Committee Election Shivsena backed by NCP SP)

Non Stop LIVE Update
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.