Smit Machhar : कॅप्टन स्मित मच्छार यांना अशोक चक्र द्या, महाराष्ट्रातून पहिली मोठी मागणी; थेट पंतप्रधानांना पत्र

फ्लाईदुबईचे कॅप्टन स्मित मच्छार यांनी विमान दुर्घटनेत दाखवलेल्या अतुलनीय शौर्यामुळे १७४ प्रवाशांचे प्राण वाचले. कॉकपिटमध्ये हल्ला होऊन गंभीर जखमी होऊनही त्यांनी परिस्थिती कुशलतेने हाताळली. या अतुलनीय कार्याबद्दल त्यांना 'अशोक चक्र' प्रदान करावे, अशी मागणी खासदार मिलिंद देवरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून केली आहे.

Smit Machhar : कॅप्टन स्मित मच्छार यांना अशोक चक्र द्या, महाराष्ट्रातून पहिली मोठी मागणी; थेट पंतप्रधानांना पत्र
Captain Smit Machhar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 02, 2026 | 5:02 PM

फ्लाईदुबईचे कॅप्टन स्मित मच्छार यांना अशोक चक्र सन्मानाने गौरवण्यात यावं, अशी मागणी शिंदे गटाचे नेते आणि राज्यसभा सदस्य मिलिंद देवरा यांनी केली आहे. मिलिंद देवरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून ही मागणी केली आहे. मी कॅप्टन स्मित मच्छार यांच्याबाबत लिहित आहे. ते मुंबईत जन्मलेले पायलट आहेत. दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या फ्लाईदुबईमध्ये झालेल्या घटनेवेळी त्यांनी असाधारण हिंमत आणि प्रसंगावधान दाखवलं. त्यामुळे विमानातील सर्वच्या सर्व 174 प्रवाशांचा जीव वाचला, असं या पत्रात देवरा यांनी लिहिलं आहे.

स्मित यांच्या या शौर्याचं केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात कौतुक होत आहे. माझा असा विश्वास आहे की, अशा कार्याला औपचारिक मान्यता देण्याचे महत्त्व एखाद्या एका व्यक्तीला सन्मान देण्यापेक्षा कितीतरी अधिक आहे. यामुळे एक मजबूत संदेश जाईल. विशेषतः तरुणांमध्ये हा संदेश जाईल. त्यांचे धैर्य केवळ युद्धभूमीवर किंवा एखाद्या विशिष्ट व्यवसायापुरते मर्यादित नाही, असं मिलिंद देवरा यांनी या पत्रात नमूद केलं आहे.

Loading...

गंभीर जखमी असातनाही मच्छार यांनी विमानातील सर्वच्या सर्व 174 प्रवाशांच्या सुरक्षेसाठी त्यांचं काम चालू ठेवलं. यावेळी या 174 प्रवाशांमध्ये 27 मुलंही होती. त्यांनी या फ्लाइटमधून वेगाने एमर्जन्सी सिग्नल पाठवले. वेगाने परिस्थिती हाताळली. त्यानंतर विमानाला सौदी अरबच्या तबुकमध्ये प्रिन्स सुल्तान बिन अब्दुल अजीज एअरपोर्टवर नेण्यात आलं, असं या पत्रात म्हटलं आहे.

कठिण प्रसंगात…

कॉकपिटमध्ये मच्छार यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यानंतर एक इस्रायली प्रवाशी आणि क्रू मेंबर कॉकपिटमध्ये घुसले. आणि पायलटवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. यूएईने या घटनेची चौकशी सुरू केली आहे. या कथित हल्ल्याच्या मागचा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. मच्छार यांनी हिंमत दाखवली. त्यांच्या व्यावसायिक जबाबदारीपेक्षा त्यांनी मोठं कर्तव्य बजावलं आहे. त्यांनी कठिण प्रसंगात साहस, निस्वार्थ भाव आणि कर्तव्यनिष्ठेचा परिचय दिला आहे, असंही त्यांनी म्हटलंय.

स्मित यांचा अशोक चक्र देऊन सन्मान केला पाहिजे. त्यावर सरकारने गंभीरपणे विचार करावा. अशोक चक्र भारताचा सर्वोच्च शांती शौर्य पुरस्कार आहे. शत्रूंशी दोन हात करण्याच्या शिवाय असाधारण शौर्य, वीरता आणि आत्म बलिदानासाठी हा पुरस्कार दिला जातो, असंही त्यांनी म्हटलंय.

गंभीर जखमी तरीही…

मुंबईत राहणारे पायलट स्मित मच्छार हे फ्लाईदुबईच्या फ्लाइट FZ1073मध्ये गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर त्यांच्याच को-पायलटने हल्ला केला आणि विमान हायजॅक करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ही घटना घडली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us