AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tukaram Mundhe : बायको, मुलं, नेते की बदलीची ऑर्डर? तुकाराम मुंढे कुणाला घाबरतात? अखेर पहिल्यांदाच म्हणाले…

अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळयुक्त पदार्थांविरोधात जोरदार मोहीम राबवली आहे. त्यांना कुणाची भीती वाटते या प्रश्नावर त्यांनी 'मी कुणालाही घाबरत नाही' असे स्पष्ट सांगितले.

Tukaram Mundhe : बायको, मुलं, नेते की बदलीची ऑर्डर? तुकाराम मुंढे कुणाला घाबरतात? अखेर पहिल्यांदाच म्हणाले...
Tukaram Mundhe Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 02, 2026 | 4:20 PM
Share

अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळयुक्त खाद्य पदार्थांविरोधात कारवाईचा धडाकाच लावला आहे. त्यामुळे कँटिनवाल्यांपासून हॉटेलवाल्यांपर्यंत, छोट्या दुकानदारांपासून प्रसिद्ध दुकानदारांपर्यंत सर्वच हादरून गेले आहेत. तुकाराम मुंढे या नावाला भले भले घाबरत आहेत. असं असलं तरी सर्वांना घाम फोडणारे तुकाराम मुंढे कुणाला घाबरतात? तुम्हाला माहीत आहे का? मुंढे यांनाच हा सवाल करण्यात आला. त्यावर त्यांनीही थेट उत्तर दिलं. मी कुणालाच घाबरत नाही, असं त्यांनी बिनधास्त सांगून टाकलं.

एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढे यांना हाच सवाल करण्यात आला. तुम्ही कुणाला घाबरता? तुम्हाला कशाची भीती वाटत नाही का? असा सवाल मुंढे यांना करण्यात आला. त्यावर मला कशाची भीती वाटत नाही. मी कुणाला घाबरत नाही, असं तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलं.

तुम्हाला कोण अधिक घाबरतात?

त्यानंतर त्यांना आणखी एक मजेदार प्रश्न विचारला गेला. तुम्हाला सर्वाधिक कोण घाबरतं? अधिकारी की मुलं? त्यावर त्यांनी अधिकारी अधिक घाबरतात असं स्पष्ट केलं. त्यानंतर त्यांनी कधी कधी मीच मुलांना घाबरत असतो, असं मिश्किलपणे सांगितलं. त्यामुळे एकच खसखस पिकली.

कुणाचीच भीती नाही

नेते, वरिष्ठ अधिकारी, पत्नी वा बदलीची ऑर्डर? तुम्हाला सर्वाधिक भीती कशाची वाटते? यावर त्यांनी मला कशाचीच भीती वाटत नाही. मी कुणाला घाबरत नाही. भीतीला डोक्यातून काढून टाका. तुम्ही काही चुकीचं केलं तरच तुम्हाला भीती वाटेल, असं मुंढे यांनी स्पष्ट केलं.

यावेळी त्यांनी सरकारी सेवेत असणाऱ्या अधिकाऱ्यांनाही संदेश दिला. सर्वात आधी तुम्ही तुमची भूमिका आणि जबाबदारी समजून घ्या. सरकारी नोकरीमध्ये उत्तरदायित्व सर्वाधिक असतं. कारण अधिकाऱ्यांना जनतेला थेट उत्तर द्यावं लागतं, असं ते म्हणाले.

ज्या काही सार्वजनिक समस्या समोर येत आहेत, त्या दूर करणं ही अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. केवळ प्रशासन चालवणं एवढंच सरकारी अधिकाऱ्याचं काम नाही. तर लोकांना चांगलं आणि सार्थक आयुष्याच्या दिशेने घेऊन जाण्याचं काम अधिकाऱ्यांचं आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

केवळ पगाराच्या दृष्टीने सरकारी सेवेकडे पाहू नका. ही मोठी जबाबदारी आणि समाजाच्या प्रति योगदान देण्याची संधी आहे. सरकारी नोकरीचा उद्देश केवळ नोकरी करणं नाहीये. तर जनतेच्या समस्यांचं समाधान करणं आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल आणणं हा त्याचा उद्देश आहे, असंही त्यांनी म्हटलंय.

Follow Us
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर जनसागर; ज्ञानेश कुमारांच्या....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर जनसागर;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा
धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता इमारतीत राहणार धारावीकर
Video : धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता झोपडपट्टी नाही तर, इमारतीत राहणार धारावीकर
'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी
Prashant Ambi : कोणता जिहादी मदत करतो.., 'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी; संजय गायकवाडांच्या आरोपांनंतर खळबळ
महिलांवर दबाव असल्याने त्या..., संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
Video : महिलांवर दबाव असल्याने त्या..., श्वेता महालेंचे संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
नापिकी अन् कर्जाचा डोंगर; शेतकऱ्याने जीवन संपवलं, मृतदेह घेऊन नातेवाईक
Dharashiv Farmer : नापिकी अन् कर्जाचा डोंगर; शेतकऱ्याने जीवन संपवलं, मृतदेह घेऊन नातेवाईक थेट...
आंदोलन करून राजीनामा घेणं हे..; दीपकेंबद्दल नार्वेकर स्पष्टच बोलले
Rahul Narvekar : आंदोलन करून राजीनामा घेणं हे..; अभिजीत दीपकेंबद्दल राहुल नार्वेकर स्पष्टच बोलले
दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी
Dino Morea : दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी सुरू, नेमकं प्रकरण काय?