AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पुन्हा सरकारला घाम फोडणार, नव्या आंदोलनाची घोषणा; थेट तुरुंगात जाण्याची…

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी नव्या आंदोलनाची घोषणा केली आहे. त्यांनी सरकारला तीन महिन्यांचा अवधी दिला असून, शक्तीपीठ महामार्गाऐवजी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी केली आहे. "मी तुरुंगात जाण्यासही तयार आहे," असे आव्हान त्यांनी सरकारला दिले आहे.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पुन्हा सरकारला घाम फोडणार, नव्या आंदोलनाची घोषणा; थेट तुरुंगात जाण्याची...
Manoj Jarange PatilImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 02, 2026 | 3:30 PM
Share

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा सातत्याने संघर्ष सुरू आहे. आरक्षणासाठी त्यांनी अनेकदा उपोषण केलं आहे. जरांगे यांची आंदोलने सरकारला घाम फोडणारीच ठरली आहेत. आता जरांगे यांनी सरकारला तीन महिन्याचा वेळ दिला आहे. मात्र, असं असलं तरी जरांगे आता नव्या आंदोलनाच्या तयारीत आहेत. हे आंदोलन आरक्षण किंवा कुणबी प्रमाणपत्रांसाठी नसणार आहे. तर शेतकऱ्यांसाठी जरांगे आंदोलन छेडणार आहेत. तशी घोषणाच त्यांनी केली आहे. सरकारला घाम फोडणारं असंच हे आंदोलन असणार आहे. त्यामुळे जरांगे यांच्या या आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना ही घोषणा केली आहे. मी शेतकऱ्याच मोठं आंदोलन उभं करणार आहे. राज्याचं हे मोठ आंदोलन असणार आहे, अशी घोषणा करतानाच शक्ती पीठ महामार्ग करू नका, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा. कितीही वाईट संकट आलं तरी तुम्हाला घाबरणार नाही, मी सुद्धा जेलमध्ये जायला तयार आहे, असं आव्हानच मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलं आहे.

पदावर कशाला ठेवायचं?

जरांगे यांनी सीजेपीच्या आंदोलनावरही प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयुक्त लोकशाही धोक्यात आणत असेल तर त्याला पदावर कशाला ठेवायचं? आरोप ज्यांच्यावर झाले ते सोडून सरकारच त्यांच्या बाजूने उत्तर देत आहे. याचा अर्थ काय होतो? असा सवाल जरांगे यांनी केला आहे.

फूट पडू देऊ नका

यावेळी मराठा आरक्षणावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. मराठा समाज एकत्र आला तर त्यांना त्रास होईल. महिनाभर आरक्षण लेट मिळेल, पण मराठ्यांनी एकजूट तुटू देऊ नका. आपल्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपला कोण आणि परका कोण हे ओळखा. केवळ आपल्या समाजाचा असून उपयोग होत नाही. तो तुमच्या कामाला पडतो का? तुमच्यासाठी उभं राहतो का? हे महत्त्वाचं आहे, असंही ते म्हणाले.

विरोधात बोललं म्हणजे…

जरांगे यांच्या सहकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. कुणी आपल्या विरोधात बोललं म्हणजे त्याला त्रास द्यायचा याला प्रगल्भ नेता म्हणता येत नाही. वैचारिक काय बोलायचं ते बोला. पण तुच्छपणा नको. आंदोलनासाठी ज्यांनी मला गाडी आणि डिझेल दिलं त्यांना तुम्ही त्रास देता. आम्ही ज्यांना राज गादीवर बसवलं त्यांनीच आम्हाला त्रासा दिला. हे योग्य नाही. कितीकाळ तुम्ही सत्तेत राहाल? आज ना उद्या सत्ता बदलेलंच ना? असा सवालही त्यांनी केला.

Follow Us
धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता इमारतीत राहणार धारावीकर
Video : धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता झोपडपट्टी नाही तर, इमारतीत राहणार धारावीकर
'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी
Prashant Ambi : कोणता जिहादी मदत करतो.., 'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी; संजय गायकवाडांच्या आरोपांनंतर खळबळ
महिलांवर दबाव असल्याने त्या..., संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
Video : महिलांवर दबाव असल्याने त्या..., श्वेता महालेंचे संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
नापिकी अन् कर्जाचा डोंगर; शेतकऱ्याने जीवन संपवलं, मृतदेह घेऊन नातेवाईक
Dharashiv Farmer : नापिकी अन् कर्जाचा डोंगर; शेतकऱ्याने जीवन संपवलं, मृतदेह घेऊन नातेवाईक थेट...
आंदोलन करून राजीनामा घेणं हे..; दीपकेंबद्दल नार्वेकर स्पष्टच बोलले
Rahul Narvekar : आंदोलन करून राजीनामा घेणं हे..; अभिजीत दीपकेंबद्दल राहुल नार्वेकर स्पष्टच बोलले
दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी
Dino Morea : दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी सुरू, नेमकं प्रकरण काय?
कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; स्मित मच्छार....
PM Modi : कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्याला PM मोदींचा सलाम
दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर
Meenakshi Shinde PC : दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत मीनाक्षी शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर प्रकरणावर बोलणं टाळलं...
सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत..
Sachin Kharat : सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत केला गंभीर दावा, पुढे म्हणाले...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं
Delhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं, पोलिसांकडून आंदोलकांना...