AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

10 ते 12 महिलांची तक्रार; श्वेता महालेंचा सूचक इशारा; संजय गायकवाडांच्या अडचणी वाढणार?

भाजप आमदार श्वेता महाले यांनी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणी वाढवल्या आहेत. १० ते १२ महिलांनी तक्रार केल्याचा दावा करत, महालेंनी गायकवाडांना आव्हान स्वीकारले आहे. तक्रारदार महिलांवर दबाव येत असूनही, महाले DIG यांना भेटून प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणार आहेत.

10 ते 12 महिलांची तक्रार; श्वेता महालेंचा सूचक इशारा; संजय गायकवाडांच्या अडचणी वाढणार?
shweta mahaleImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 02, 2026 | 2:54 PM
Share

शिवसैनिक महिलांना माझ्या घरातून मेसेज जात असल्याचा पुरावा दिला, तर मग माझ्या स्वभावाप्रमाणे मी काय करायचे ते करेल, असं आव्हान शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी भाजपच्या आमदार श्वेता महाले यांना दिलं होतं. श्वेता महाले यांनी हे आव्हान स्वीकारलं आहे. माझ्याकडे 10 ते 12 महिलांची तक्रार आली आहे. इतर महिलाही तक्रार करण्यासाठी येत आहेत. मात्र, त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे, असा दावा श्वेता महाले यांनी केला आहे. श्वेता महाले यांनी सूचक इशारा दिल्याने गायकवाड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वाढली आहे.

भाजपच्या आमदार श्वेता महाले मीडियाशी संवाद साधत होत्या. यावेळी त्यांनी हा सूचक इशारा दिला. नीचपणा कोण करतंय ते दिसतंय. माझ्याकडे 10 ते 12 महिलांनी तक्रार केली. आणखी काही महिलांना तक्रार करायची आहे. पण दबावामुळे त्या पुढे येत नाहीत. कुठे जाऊ नका. ज्यांनी मेसेज केले, त्यांना आम्ही समज देऊ. त्याला आम्ही योग्य पद्धताने समजून सांगू. पण तुम्ही कुठे जाऊ नका, असं या महिलांना सांगितलं जात आहे. तरीही 10 ते 12 महिलांनी तक्रार केली आहे, असं श्वेता महाले म्हणाल्या.

फेसबुक, इन्स्टाग्रामवरून मेसेज

आम्हाला समाजात राहावं लागत असल्याने फक्त आमचं नाव बाहेर येऊ नये. गोपनियता पाळली पाहिजे, असं या महिलांचं म्हणणं आहे. आम्ही त्यांना तसा विश्वास दिला आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅटवरून या महिलांना मेसेज केले आहेत. पुढच्या आठवड्यात डीआयजींना भेटून याची माहिती देऊ. या सर्व प्रकरणाची चौकशी झाल्यावर हलकटपणा आणि नीचपणा दिसून येईल, असं श्वेता महाले यांनी सांगितलं.

दबावाखाली निवेदन

शिवसेनेच्या महिला आघाडीने तुमच्या विरोधात निवेदन दिलं आहे. त्याचं काय? असा सवाल केला असता त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. शिवसेनेच्या महिला आघाडीने त्यांच्या नेत्यांच्या दबावामुळे निवेदन दिलं. निवेदन देताना त्या माझ्याशी बोलल्या. निवेदन तुमच्याविरोधात द्यायचं नव्हतं. आईबहिणींवरून आमच्या नेत्यांनी शिव्या दिल्या, त्यांच्याविरोधात निवेदन देणार होतो. पण आमच्या नेत्यांचा दबाव असल्याने आम्ही तुमच्या विरोधात निवेदन देत आहे, असं या महिलांना मला सांगितलं, असा दावाही त्यांनी केला.

चिखलीतील लोकच सांगतील

चिखलीचा गाझियाबाद झाल्याची टीका गायकवाड यांनी केली होती. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. चिखलीचा गाझियाबाद झाला की नाही हे चिखलीची जनताच सांगेल. चिखली सुसंस्कृत आहे. इथे कुणी दारू पिऊन भररस्त्यात कुणाला शिव्या देत नाही. बुलढाण्यात अवैध धंदे ज्यांचे आहे, ते मोर्चात सहभागी होतात. उलट तेच म्हणतात की, अवैध धंदे बंद झाले पाहिजे, असा हल्लाच त्यांनी केला.

Follow Us
धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता इमारतीत राहणार धारावीकर
Video : धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता झोपडपट्टी नाही तर, इमारतीत राहणार धारावीकर
'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी
Prashant Ambi : कोणता जिहादी मदत करतो.., 'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी; संजय गायकवाडांच्या आरोपांनंतर खळबळ
महिलांवर दबाव असल्याने त्या..., संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
Video : महिलांवर दबाव असल्याने त्या..., श्वेता महालेंचे संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
नापिकी अन् कर्जाचा डोंगर; शेतकऱ्याने जीवन संपवलं, मृतदेह घेऊन नातेवाईक
Dharashiv Farmer : नापिकी अन् कर्जाचा डोंगर; शेतकऱ्याने जीवन संपवलं, मृतदेह घेऊन नातेवाईक थेट...
आंदोलन करून राजीनामा घेणं हे..; दीपकेंबद्दल नार्वेकर स्पष्टच बोलले
Rahul Narvekar : आंदोलन करून राजीनामा घेणं हे..; अभिजीत दीपकेंबद्दल राहुल नार्वेकर स्पष्टच बोलले
दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी
Dino Morea : दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी सुरू, नेमकं प्रकरण काय?
कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; स्मित मच्छार....
PM Modi : कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्याला PM मोदींचा सलाम
दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर
Meenakshi Shinde PC : दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत मीनाक्षी शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर प्रकरणावर बोलणं टाळलं...
सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत..
Sachin Kharat : सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत केला गंभीर दावा, पुढे म्हणाले...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं
Delhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं, पोलिसांकडून आंदोलकांना...