पहिल्या टप्प्यातील घरांचा ताबा मार्च 2021 अखेरपर्यंत देणार, सिडकोचे आश्वासन

| Updated on: Nov 21, 2020 | 8:43 AM

पहिल्या टप्प्यातील घरांचा ताबा मार्च 2021 अखेरपर्यंत देण्याची महत्त्वपूर्ण आश्वासन सिडकोने दिलं आहे. (CIDCO Announce to give Home Before March 2021)

पहिल्या टप्प्यातील घरांचा ताबा मार्च 2021 अखेरपर्यंत देणार, सिडकोचे आश्वासन
MNS Bomba Maro Agitation
Follow us on

नवी मुंबई : सिडको उपाध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालकांनी पंतप्रधान आवास योजनेतंर्गत महागृहनिर्माण योजनेच्या बांधकाम स्थळांना भेट दिली. त्यानुसार या योजनेच्या पहिल्या टप्प्यातील घरांचा ताबा मार्च 2021 अखेरपर्यंत देण्याची महत्त्वपूर्ण आश्वासन सिडकोने दिलं आहे. (CIDCO Announce to give Home Before March 2021)

सिडकोतर्फे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत नवी मुंबईमध्ये साकारण्यात येत असलेल्या महागृहनिर्माण योजनेतील वाशी ट्रक टर्मिनस, खारघर रेल्वे स्थानक, खारघर बस टर्मिनस, खारघर बस आगार, कळंबोली बस आगार, पनवेल आंतरराज्यीय बस स्थानक, नवीन पनवेल (प.) बस आगार, खारघर, सेक्टर-४३ आणि तळोजा, सेक्टर-२१,२८,२९,३१ व ३७ या बांधकाम स्थळांना व्यवस्थापकीय संचालकांनी भेट दिली.

यावेळी उपाध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी उपरोक्त बांधकाम स्थळांना भेट देऊन बांधकाम कार्याचा आढावा घेतला. या योजनेच्या पहिल्या टप्प्यातील घरांचा ताबा मार्च 2021 अखेरीस देण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. नव्या वर्षात सिडकोच्या घरांची विक्री करण्याच्या योजनादेखील जाहीर करु, असेही ते म्हणाले.

“सिडकोतर्फे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत नवी मुंबईमध्ये साकारण्यात येत असलेल्या महागृहनिर्माण योजनेतील घरांच्या बांधकामाचे काम प्रगतीपथावर आहे. या योजनेमुळे येत्या काळात अनेक कुटुंबांचे हक्काच्या घराचे आणि नवी मुंबईमध्ये वास्तव्य करण्याचे स्वप्न साकार होणार आहे”, असे व्यवस्थापकीय संचालक म्हणाले.

घरापासून कामावर जाण्यासाठी प्रवासाचा वेळ वाचणार

सिडकोने नेहमीच अत्यंत किफायतशीर दरात घरांची विक्री केली आहे. त्यामुळे या महागृहनिर्माण योजनेच्या माध्यमातून सिडको प्रधानमंत्री आवास योजनेतील “सर्वांसाठी घरे” या उद्दिष्टपूर्तीसाठी मोठे योगदान देणार आहे. त्याचप्रमाणे हा गृहप्रकल्प हे परिवहन केंद्रीत असल्याने नागरिकांचा घर ते कामाचे स्थळ यातील प्रवासाचा वेळ वाचणार आहे.

सिडकोतर्फे डिसेंबर, 2018 मध्ये ‘परिवहन केंद्रीत विकास’ संकल्पनेवर आधारित महागृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात आला होता. या गृहनिर्माण योजनेअंतर्गत नवी मुंबईतील तळोजा नोड्सह विविध नोड्मधील बस डेपो, ट्रक टर्मिनस, रेल्वे स्थानक फोरकोर्ट एरिया परिसरामध्ये घरांचे बांधकाम करण्यात येणार आहे. या गृहनिर्माण योजना ही एकूण 4 पॅकेजमध्ये साकारण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांकरिता घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. (CIDCO Announce to give Home Before March 2021)

संबंधित बातम्या : 

Thane School | ठाणे जिल्ह्यातील शाळा 31 डिसेंबर 2020 पर्यंत बंद राहणार; पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

TOURISM | सिंधुदुर्गातील समुद्रकिनाऱ्यावरचे वॉटर स्पोर्ट्स सुरु; पर्यटकांना लुटता येणार आनंद