Abhijeet Dipke: मुंबई मोर्चामुळे अभिजीत दिपके यांच्या अडचणीत वाढ? या वकिलाची पोलीस ठाण्यात धाव, गुन्हा दाखल होणार?

CJP Abhijeet Dipke Mumbai Protest : कॉकरोच जनता पक्षाचे नेते अभिजीत दिपके यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. स्थानिकांचा विरोध डावलून त्यांनी काल दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये आंदोलन केले. त्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Abhijeet Dipke: मुंबई मोर्चामुळे अभिजीत दिपके यांच्या अडचणीत वाढ? या वकिलाची पोलीस ठाण्यात धाव, गुन्हा दाखल होणार?
मुंबई मोर्चामुळे अभिजीत दिपके यांच्या अडचणीत वाढ?
| Updated on: Oct 03, 2026 | 8:41 AM

केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मुंबईत कॉकरोच जनता पक्षाने शक्तीप्रदर्शन केले. शुक्रवारी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये सीजेपीने हुंकार भरला. स्थानिकांचा विरोध असताना मोठे आंदोलन झाले. तरुणाईसोबत मोठ्या संख्येने नागरिक या आंदोलनात सहभागी झाले. मुंबईच्या आंदोलनानंतर आता सीजेपीने दिल्लीकडे कूच करण्याचा नारळ फोडला आहे. दरम्यान स्थानिकांनी या आंदोलनाला विरोध केला होता. तो डावलून हे आंदोलन करण्यात आले. आता याप्रकरणात वकील सिद्धी देवळेकर यांनी अभिजीत दिपके यांच्यासह सहकाऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसात दाखल तक्रारीमध्ये काय?

Loading...

ॲडव्होकेट सिद्धी देवळकर यांनी मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, परवानगी नसताना हे आंदोलन करण्यात आले. या परिसरातील शांतता भंग झाली. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या 2013 मधील एका निवाड्याचा दाखलाही तक्रारीसोबत देण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात कोणीही आंदोलन करू शकत नाही असा संदर्भ या निवाड्याचा असल्याचा तक्रारकर्तीचा दावा आहे. मुंबई पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी दिली नव्हती. तरीही सीजेपीच्या लोकांनी एखाद्या उपद्रवी गटाप्रमाणे गर्दी जमा केली आणि निदर्शनं केली. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास झाला असे तक्रारीत म्हटले आहे.

ॲड. सिद्धी देवळकर यांच्या मते, आंदोलनाचा प्रत्येकाला हक्क, अधिकार आहे. पण त्यासाठी योग्य ठिकाण असणे आवश्यक आहे. आझाद मैदानावरही हे आंदोलन होऊ शकले असते. दिपके यांनी दिल्लीतील जंतरमंतर इथे जाऊन आंदोलन करायला हवे होते. जर त्यांना मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा हवा आहे, तर त्यांनी दिल्लीत जाऊन प्रदर्शन करावे, मुंबईत आंदोलन करण्याला काय अर्थ आहे? असा सवालही देवळकर यांनी केला. सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास देण्यात काय हाशील? मुंबई पोलिसांनी माझी तक्रार स्वीकारली. आता ते योग्य ती कायदेशीर कारवाई करतील अशी आशाही ॲड. सिद्धी देवळकर यांनी व्यक्त केली. यामुळे सीजेपी आणि नेत्यांविरोधात पुढे काय कारवाई होणार, याची चर्चा सुरू झाली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us