AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray: मुंबईतील उद्याच्या गर्जना मोर्चापूर्वीच मनसेचे मोठे पाऊल, राज ठाकरे यांचा थेट आदेश…

Uddhav Thackeray Raj Thackeray Garjana Morcha: मुख्य निवडणूक आयुक्ताविरोधात काल CJP च्या आंदोलनानंतर आता उद्या ठाकरे बंधूंनी एल्गार पुकारला आहे. उद्याच्या मोर्चापूर्वी दोन्ही पक्षाकडून मोठी तयारी सुरू आहे. काय आहे याविषयीची अपडेट?

Raj Thackeray: मुंबईतील उद्याच्या गर्जना मोर्चापूर्वीच मनसेचे मोठे पाऊल, राज ठाकरे यांचा थेट आदेश...
उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शिवसेना, मनसे, गर्जना मोर्चा
| Updated on: Oct 03, 2026 | 7:52 AM
Share

मयुरेश जाधव, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी: सत्याचा मोर्चा, तिरंगा मोर्चा नंतर आता ठाकरे बंधूंच्या अजेंड्यावर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे आहेत. मतदार यादीमधील विशेष पुनर्निरीक्षण प्रक्रियेवरून (SIR) देशभरात रणकंदन सुरू आहे. त्यातच दोन आयुक्तांनी मुख्य आयुक्तांविरोधात कथित तक्रारीचा दावा समोर आल्यानंतर विरोधकांच्या हाती आयते कोलीत आले आहे. कॉकरोच जनता पार्टी, काँग्रेस, इंडिया आघाडीसोबतच आता ठाकरे बंधूही मैदानात उतरले आहेत. उद्या मुंबईत ठाकरे बंधूंचा ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात गर्जना मोर्चा आहे. त्यापूर्वीच दोन्ही पक्षांची मोठी तयारी सुरू झाली आहे.

आज मनसे नेत्यांसोबत राज ठाकरे यांची बैठक

उद्याच्या गर्जना मोर्चापूर्वी राज ठाकरे हे मनसे नेत्यांसोबत बैठक घेत आहेत. गर्जना मोर्चाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. त्यापूर्वीच ही बैठक होत आहे. राज ठाकरे यांनी मनसे नेत्यांना शिवतीर्थावर बोलावलं आहे. मोर्चापूर्वी राज ठाकरेंची महत्त्वाची बैठक असेल. आज सकाळी 11 वाजता शिवतीर्थावर बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत राज ठाकरे हे नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना काय सूचना देतात. मोर्चाविषयी काय मार्गदर्शन करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

मुंबईत विराट गर्जना मोर्चा

निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात आणि ज्ञानेश कुमार हे मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करत ठाकरे बंधू हे उद्या रस्त्यावर उतरतील. मुंबईत उद्या सकाळी 11 वाजता विराट गर्जना मोर्चा निघणार आहे. या मोर्चानिमित्ताने मुंबईत मोठा पोलीस बंदोबस्त असेल. याविषयीची संयुक्त पत्रकार परिषद ठाकरे बंधूंनी घेतली. त्यात मुख्य निवडणूक आयुक्तासोबतच त्यांचा रोख भाजपवर असल्याचे दिसून आले. निवडणूक आयोगावर टीका केल्यावर भाजपच्या पोटात का दुखते असा रोकडा सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे.

मोर्चाच्या मार्गात बदल

4 ऑक्टोबर रोजी मेट्रो सिनेमापासून हा मोर्चा निघेल. यापूर्वी भायखळा ते आझाद मैदान असा मोर्चाचा मार्ग होता. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त मोर्चाला सकाळी 11 वाजता सुरुवात होईल. सकाळी दहा वाजता या मोर्चासाठी नागरीक, कार्यकर्ते, पदाधिकारी जमा होण्यास सुरुवात होईल. हा मोर्चा मुंबई महापालिकेसमोर येईल. या ठिकाणी मोर्चाचे सभेत रूपांतर होईल.

या आंदोलनात कोणत्याच पक्षाचा झेंडा नसेल. तर आंदोलकांनी केवळ तिरंगा हातात घेऊन सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या मोर्चाला महाविकास आघाडीतील घटक पक्षांनीही पाठिंबा दिला आहे. सर्वपक्षीय नागरिकांनी या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उद्याच्या मोर्चात निवडणूक आयुक्तांविरोधात ठाकरे बंधू कोणती घोषणा देतात आणि काय मागणी करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा