मोठी बातमी, ठाकरे बंधूंच्या मोर्चाच्या मार्गात बदल, भायखळ्याहून मोर्चा निघणार नाही, आता..
Uddhav Raj Thackeray Route Change : 4 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मुंबईतील ठाकरे बंधूंच्या मोर्चाविषयी एक मोठी अपडेट समोर येत आहे. या मोर्चाचा मार्ग बदलला आहे.

दिनेश दुखंडे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी : केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात ठाकरे बंधूंनी एल्गार पुकारला आहे. 4 ऑक्टोबर रोजी, रविवारी मुंबईत मनसे आणि सेना यांचा महामोर्चा निघणार आहे. पण त्यापूर्वीच एक मोठी अपडेट समोर येत आहे. या मोर्चाच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. या मोर्चाची जय्यत तयारी सुरू असतानाच या मोर्चाच्या मार्गात बदल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आता या मार्गात असा बदल करण्यात आला आहे.
आता मार्गात असा बदल
याआधी नियोजित मार्गानुसार हा मोर्चा भायखळा ते आझाद मैदाना असा जाणार होता. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चाला राज्यभरातून मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि मनसैनिक येण्याची शक्यता आहे. या मोर्चासाठी मोठी तयारी सुरू असतानाच आता मोर्चाच्या मार्गात मोठा बदल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
आता या मोर्चाच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. ठाकरे बंधूमचा मोर्चा हा मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान असा जाणार आहे. या मोर्चाच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. मोर्चाचे अंतर थोडे कमी झाल्याचे समोर आले आहे. रविवारी सकाळी दहा वाजता हा मोर्चा सुरू होणार आहे. पण प्रत्यक्ष मोर्चा निघायला अजून थोडा वेळ लागू शकतो. या मोर्चाला राज्यभरातून कार्यकर्ते येणार असल्याचे समजते.
मुंबई महापालिकेसमोर सभा
4 ऑक्टोबर रोजी मेट्रो सिनेमापासून हा मोर्चा निघेल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त मोर्चाला सकाळी 11 वाजता सुरुवात होण्याची शक्यता आहे. दहा वाजता या मोर्चाला जमा होण्यास सुरुवात होईल. हा मोर्चा आगेकूच करत मुंबई महापालिकेसमोर येईल. या ठिकाणी मोर्चाचे सभेत रूपांतर होईल. या ठिकाणी मंच उभारल्या जाणार आहे. गेल्यावर्षीपासून ठाकरे बंधू मराठीच्या मुद्दावर एकत्र आलेले दिसले आणि आतापर्यंत ते कोणत्या ना कोणत्या निमित्ताने एकत्र आले आहेत. परवाच्या मोर्चाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील पक्षांनी यापूर्वी सुद्धा निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात जोरदार आंदोलन केले आहे. यापूर्वी सुद्धा त्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन मत चोरीचा मुद्दा हिरारीने मांडला आहे. राज ठाकरे यांनी यापूर्वी सुद्धा ईव्हीएमविरोधातील भूमिका जाहीर केलेली आहे. आता ठाकरे बंधू पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत.
