दक्षिण मुंबई पहिल्यांदाच तुंबली, पर्यावरण तज्ज्ञांचं मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टकडे बोट

| Updated on: Aug 07, 2020 | 11:08 PM

दक्षिण मुंबई बुडण्याला मुख्यमंत्र्यांचं ड्रीम प्रोजेक्ट असलेलं कोस्टल रोड जबाबदार आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात (South Mumbai Waterlogging) आहे.

दक्षिण मुंबई पहिल्यांदाच तुंबली, पर्यावरण तज्ज्ञांचं मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टकडे बोट
Follow us on

मुंबई : गेल्या दोन दिवसात मुंबईत झालेल्या अतिवृष्टीमुळे ठिक-ठिकाणी सखल भागात पाणी साचले. या अतिवृष्टीत पहिल्यांदाच दक्षिण मुंबई पाण्याखाली गेल्याचं चित्र पाहायला मिळालं. दक्षिण मुंबई बुडण्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं ड्रीम प्रोजेक्ट असलेलं कोस्टल रोड जबाबदार आहे का? कोस्टल रोडच्या सुरू असलेल्या कामामुळे दक्षिण मुंबई बुडाली का? असा सवाल पर्यावरण तज्ज्ञांकडून उपस्थित केला जात आहे. (Coastal Road and Metro 3 project Affect South Mumbai Water logging)

दक्षिण मुंबईत कोस्टल रोडसोबतच मेट्रो 3 चे भुयारी मार्ग आहेत. या भुयारी मार्गाच्या कामासाठी जमिनीखाली काम सुरू आहे. त्यामुळे दक्षिण मुंबई बुडण्याला कोस्टल रोड सोबत मेट्रो 3 चा प्रोजेक्टही जबाबदार आहे का, असाही प्रश्न पर्यावरण तज्ज्ञांनी उपस्थित केला आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

मुंबईला 26 जुलै 2005 रोजी पुराचा फटका बसला होता. यात दक्षिण मुंबईत अरबी समुद्र असूनही 2005 मध्ये पुरात या ठिकाणी कुठेही पाणी कमी साचले नाही. त्या पुराचा या ठिकाणी फार कमी प्रमाणात फटका बसला. मात्र बुधवारी रात्रीच्या पावसाने उच्चभ्रू वस्ती असलेल्या दक्षिण मुंबईला चांगलेच झोडपले. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याचे पाहायला मिळाले.

पर्यावरण तज्ज्ञांच्या या प्रश्नांनंतर महापौर किशोरी पेडणेकर यांना याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, “कोस्टल रोडमुळे दक्षिण मुंबईमध्ये पाणी साचले अस म्हणणं संयुक्तिक ठरणार नाही. कारण पाऊस लक्षात घेऊनच कोस्टल रोडच्या सर्व मशिन इतरत्र हलवल्या होत्या. पूर्ण काळजी घेतली होती.”

“समुद्राचं पाणी हायटाईड आणि सुसाट वाऱ्यामुळे पाण्याची पातळी वाढली. कोस्टल रोडच्या बाबतीत पूर्ण काळजी घेतली आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच काम होतं आहे. शेवटी निसर्ग मोठा आहे,” असेही किशोरी पेडणेकर म्हणाल्या. (Coastal Road and Metro 3 project Affect South Mumbai Water logging)

संबंधित बातम्या : 

पुराच्या पाण्यात उडी मारण्याचे साहस जीवावर, रायगडमध्ये वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह दोन दिवसांनी सापडला

पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची गळा चिरुन हत्या, नांदगाव हादरले