Temperature Update : राज्यभर थंडीचा कडाका वाढला; मुंबईसह सर्वत्र पारा घसरला

वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाल्याने पिकांना पोषक वातावरण झाले आहे. थंडीचा फायदा गहू, हरभरा यांसारख्या पिकांना होत आहे. बीड, गोंदिया, अहमदनगर तसेच कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आदी जिल्ह्यांत थंडीची तीव्रता अधिक जाणवत आहे.

Temperature Update : राज्यभर थंडीचा कडाका वाढला; मुंबईसह सर्वत्र पारा घसरला
राज्यभर थंडीचा कडाका वाढला
| Edited By: | Updated on: Dec 25, 2021 | 11:06 PM

मुंबई : उत्तर भारतातील तीव्र थंडीची लाट आणि बर्फवृष्टीचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवू लागला आहे. मुंबईसह संपूर्ण राज्यभरात थंडीचा कडाका वाढला आहे. सर्वत्र किमान तापमानात मोठी घसरण झाली आहे. तसेच बहुतांशी भाग सकाळच्या सुमारास धुक्यात हरवून जात आहे. पुढील किमान आठवडाभर तरी मुंबई व उर्वरित राज्यात थंडीची तीव्रता अधिक असेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे. सर्वत्र हवेत गारठा वाढला असून नागरिक सकाळच्या सुमारास या सुखद गारव्याचा आनंद घेताना दिसून येत आहे.

ढगाळ वातावरणानंतर हवेत गारठा

राज्याच्या काही जिल्ह्यांत गेले काही ढगाळ वातावरण होते. या ढगाळ वातावरणामुळे संबंधित जिल्ह्यांतून जवळपास थंडी गायबच झाली होती. मात्र आता वातावरणात बदल झाला असून कडाक्याच्या थंडीची लाट आली आहे. अनेक जिल्ह्यांतील किमान तापमानात मोठी घट झाली आहे. शहरी भागातील नागरिक गुलाब थंडीमध्ये मॉर्निंग वॉकचा आनंद घेत आहेत. ग्रामीण भागात कमालीचे धुके पसरले असून गावे धुक्याच्या साम्राज्यात हरवून गेली आहेत. थंडीपासून बचाव करण्यासाठी ग्रामीण भागातील लोक शेकोट्या पेटवताना दिसून येत आहेत.

वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाल्याने पिकांना पोषक वातावरण झाले आहे. थंडीचा फायदा गहू, हरभरा यांसारख्या पिकांना होत आहे. बीड, गोंदिया, अहमदनगर तसेच कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आदी जिल्ह्यांत थंडीची तीव्रता अधिक जाणवत आहे. नशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला असून त्यात आणखी वाढ होईल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. अहमदनगर जिल्ह्यात अलिकडेच कडाक्याच्या थंडीमध्ये गारठून दोघांचा मृत्यू झाला.

मुंबईचे तापमान 20 अंशांच्या खाली

मुंबई शहराचे तापमान चांगलेच घसरले आहे. सांताक्रुझ आणि कुलाबा अशा दोन्ही ठिकाणी किमान तापमानाची पातळी 20 अंशांच्या खाली घसरली आहे. त्यामुळे मुंबई शहरासह उपनगरांतील नागरिक थंडीने कुडकुडले आहेत.

राज्यातील घाट धुक्यात हरवले

राज्यभर पडलेल्या गुलाबी थंडीमुळे सर्वत्र घाट रस्ते धुक्यात हरवलेले पहायला मिळत आहेत. घाटरस्त्यातून गाडी चालवणेही वाहन चालकांना अवघड झाले आहे. रात्रीच्या वेळी तर घाटातून धुक्यातून वाहने चालवणे धोकादायी ठरत आहे. (Cold all over the state including Mumbai, The fog spread over the ghats)

इतर बातम्या

Mumbai | नाताळदिनी मुंबईत शून्य कोविड बळी, डिसेंबर महिन्यात सहाव्यांदा असं घडतंय!

Mumbai High Court : संमतीशिवाय महिलेच्या शरीराला हात लावणे हा गुन्हाच : मुंबई उच्च न्यायालय