कल्याण डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी, 9 गावांचा मालमत्ता कर कमी करण्यावर शिक्तामोर्तब

| Updated on: Oct 26, 2020 | 8:56 PM

9 गावांतील नागरीकांना मालमत्ता कराच्या वाढीपासून दिलासा मिळणार आहे अशी माहिती खासदार शिंदे यांनी दिली आहे.

कल्याण डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी, 9 गावांचा मालमत्ता कर कमी करण्यावर शिक्तामोर्तब
यामुळे आयकर विभागाने एक ट्वीट करून आम्ही पाठवलेल्या कोणत्याही ई-मेलकडे दुर्लक्ष करू नका असं करदात्यांना सूचित केलं आहे.
Follow us on

ठाणे : कल्याण डोंबिवलीकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महापालिकेत असलेल्या 9 गावांतील मालमत्ताधारकांना आकारण्यात येणारा कर कमी करण्यात येणार आहे. त्याविषयी आजच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याशी चर्चा केली. यामध्ये प्रस्ताव मान्य झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर लवकरच हा प्रस्ताव महासभेत सादर करून मंजूर केला जाणार आहे. त्यामुळे 9 गावांतील नागरीकांना मालमत्ता कराच्या वाढीपासून दिलासा मिळणार आहे अशी माहिती खासदार शिंदे यांनी दिली आहे. (Commissioners permission to reduce property tax of 9 villages in Kalyan dombivli)

महापालिका आयुक्तांसोबत खासदार श्रीकांत शिंदे यांनी चर्चा केली. यावेळी शिवसेनेचे काही नगरसेवक उपस्थित होते. 1983 पासून 27 गावं महापालिकेत होती. २००२ साली महापालिकेतून ही गावं वगळण्यात आली. यानंतर पुन्हा 2015 मध्ये महापालिकेत गावांचा समावेश करण्यात आला. आता त्यापैकी 18 गावं वगळण्यात आलेली आहे. मात्र 9 गावं ही महापालिकेत आहे. त्यांना अडीच पट जास्तीचा मालमत्ता कर आकारला जात आहे.

नवी मुंबईत भर रस्त्यात विक्रीकर अधिकाऱ्यावर चाकू हल्ला, आरोपी फरार

यामध्ये सूट मिळावी यासाठी नागरीकांकडून वारंवार मागणी होत होती. त्यामुळे 9 गावातील मालमत्ताधारकांना अडीच पटीचा जास्तीचा कर लावला जाणार नाही आहे. त्याचबरोबर 2002 ते 2015 या कालावधीत ही गावं ज्या नियोजन प्राधिकरणाअंतर्गत होती मालमत्ता धारकांनाही अडीच पट मालमत्ता कर आकारला जाऊ नये अशी मागणी आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

या दोन्ही मागण्या आज आयुक्तांनी मान्य केल्या असून येत्या महासभेत हा ठराव मांडला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. महासभेच्या मान्यतेनंतर ही सूट 9 गावातील मालमत्ताधारकांना मिळणार आहे. लवकर महापालिकेची महासभा संपन्न होईल. त्यात ठराव मंजूर झाल्यावर सध्या महापालिकेकडून सुरू असलेली अभय योजना पाहता या योजनेचा लाभही मालमत्ता धारकांना घेता येणार आाहे. 9 गावातील मालमत्ता धारकांचा दुहेरी फायदा होणार आहे याकडे खासदारांनी लक्ष वेधल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

सर्वसामान्यांना झटका बसण्याची चिन्हं, पेट्रोल-डिझेलवर टॅक्स वाढवण्याच्या केंद्राच्या हालचाली

(Commissioners permission to reduce property tax of 9 villages in Kalyan dombivli)