कंगना रणावत विरोधात मुंबईत तक्रार दाखल, काँग्रेस नेत्याकडून अटकेची मागणी

| Updated on: Nov 13, 2021 | 6:57 PM

स्वातंत्र्याबाबत केलेल्या आक्षेपाहार्य विधानबद्दल अभिनेत्री कंगना रणावत विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष कुणाल राऊत यांनी पोलिसात ही तक्रार केली आहे.

कंगना रणावत विरोधात मुंबईत तक्रार दाखल, काँग्रेस नेत्याकडून अटकेची मागणी
kunal raut
Follow us on

मुंबई: स्वातंत्र्याबाबत केलेल्या आक्षेपाहार्य विधानबद्दल अभिनेत्री कंगना रणावत विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष कुणाल राऊत यांनी पोलिसात ही तक्रार केली आहे. कंगनावर देशद्रोहाची कारवाई करून तिला अटक करावी अशी मागणी कुणाल राऊत यांनी केली आहे.

कुणाल राऊत यांनी शुक्रवारी संध्याकाळी मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांनी कंगना रणावतविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारावर कंगनावर एफआयआर दाखल करून तिला तात्काळ अटक करावी अशी मागणी राऊत यांनी केली आहे.

हा तर देशाचा अपमान

कंगना सतत वादग्रस्त वक्तव्ये करत असते. देशाला 1947 साली मिळालेले स्वातंत्र्य हे भीक असून खरे स्वातंत्र्य हे 2014 साली मिळाले, असे अतिशय आक्षेपार्ह व देशविरोधी वक्तव्य कंगनाने केले आहे. यापूर्वीही त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचे सेनानी महात्मा गांधी यांचा मारेकरी आणि हिंदूत्ववादी अतिरेकी नाथुराम गोडसेचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, आताच्या कंगनाच्या विधानाने स्वातंत्र्य चळवळीचा, स्वातंत्र्य सैनिकांचा, राष्ट्रपिता गांधी व देशाचा अपमान झाला आहे, असे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

मीही स्वातंत्र्य सैनिकाचा नातू

भारत सध्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत असताना कंगनाचं हे वक्तव्य हजारो शहीद, लाखो स्वातंत्र्य सैनिक, क्रांतिकारक यांचा अपमान करणारे आहे. काँग्रेसच्या नेतृत्वात स्वातंत्र्याचा लढा लढण्यात आला. मी स्वतः स्वातंत्र्य संग्राम सैनिकाचा नातू आहे. प्रदेश युवक काँग्रेसचा उपाध्यक्ष या नात्याने मी आज कंगनाच्या वक्तव्याविरूद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे, असे ते म्हणाले.

 

या आरोपांखाली गुन्हे दाखल करा

देशद्रोह, राष्ट्रीय प्रतिकांचा अपमान, राष्ट्रपिता महात्मा गांधींचा अपमान, दोन समुहांमध्ये भांडणे लावून हिंसेचा प्रसार करण्यासाठी चिथावणी देणे, शांतता व सौहार्दाचा भंग करणे, देशात अशांतता निर्माण करून कायदा-सुव्यवस्था बिघडवणे, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर पुरूषांचा व स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करणे, यासारख्या बेकायदेशीर कृत्यांसाठी उचित कलमांखाली गुन्हे नोंदवून कंगनाला तात्काळ अटक केली जावी, अशी मागणीही त्यांनी केली.

 

संबंधित बातम्या:

दगडफेक, लाठीमार आणि उद्रेक… अमरावतीत पाचहून अधिक लोक एकत्र आल्यास तात्काळ अटक; वाचा, संचारबंदी म्हणजे काय?

जनतेनं भाजपच्या षडयंत्राला बळी पडू नये, पटोलेंचं आवाहन; भाजपकडून दंगलीचं राजकारण सुरु असल्याचाही आरोप

स्वच्छ महाराष्ट्र अभियानातंर्गत 408 जागांसाठी भरती, 35 हजारापर्यंत पगाराची संधी