Corona Update APMC closed | आशियातील सर्वात मोठं मार्केट बंद, वाशी APMC मार्केटमध्ये खबरदारी

| Updated on: Mar 19, 2020 | 11:02 AM

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून गर्दीची ठिकाणं बंद (APMC Market closed) करण्याचं आवाहन केलं जात आहे.

Corona Update APMC closed | आशियातील सर्वात मोठं मार्केट बंद, वाशी APMC मार्केटमध्ये खबरदारी
Follow us on

नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून गर्दीची ठिकाणं बंद (APMC Market closed) करण्याचं आवाहन केलं जात आहे. मुंबईत प्रवाशांची संख्या घटली असताना, तिकडे नवी मुंबईतही खबरदारी घेतली जात आहे. (APMC Market closed). आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेले नवी मुंबईतील एपीएमसी  फळे आणि भाजीपाला मार्केट पूर्णपणे बंद ठेवण्यात आलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज भाजीपाला आणि फळ बाजार पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. हे मार्केट आठवड्यातील दर गुरुवार आणि रविवारी बंद ठेवण्यात येणार आहे.

या मार्केटमध्ये दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये राज्यात आणि राज्याबाहेरुन दररोज शेतमालाच्या 1200 ते 1500 गाड्यांची आवक होत असते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज मार्केट पूर्ण बंद असल्याने इथे शुकशुकाट दिसत आहे. मार्केटमध्ये एकाही गाडीला प्रवेश दिला जात नाही.

दुसरीकडे कांदा बटाटा मार्केटची वेळही बदलून दुपारी चारवाजता हे मार्केट बंद करण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी ही खबरदारी घेण्यात येत आहे.

वाचा : 

देशात आणि राज्यात कोरोनाचा फैलाव वाढत आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर एपीएमसी बाजार समिती शक्य ती सर्व खबरदारी घेत आहे.

एपीएमसी बाजारात होणारी गर्दी टाळण्यासाठी, जीवनावश्यक वस्तूंची खरेदीची ऑर्डर फोनवरुन घ्या आणि माल घरपोच पाठवा, अशा सूचना प्रशासनाने व्यापाऱ्यांना दिल्या आहेत.

तसेच फळ आणि भाजी मार्केट 31 मार्च पर्यत दर गुरुवार आणी रविवारी साफसफाई तसेच निर्जंतुकीकरण करण्यासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय कांदा-बटाटा मार्केटची वेळ देखील बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे  बुधवार  दि. 18 मार्चपासून  सकळी साडेआठ ते दुपारी चार वाजेपर्यत मार्केट सुरू राहणार. दुपारी चारनंतर संपूर्ण बाजार समितीची साफसफाई आणि निर्जंतुकीकरण करण्यात  येणार आहे.

संबधित बातम्या 

Corona positive | महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा 47 वर, आणखी दोन महिलांना लागण