अंबानीच्या घराबाहेरील CRPF जवानाचा बंदुकीतून गोळी सुटल्याने मृत्यू

| Updated on: Jan 24, 2020 | 11:58 AM

उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील जवानाच्या बंदुकीतून चुकून गोळी सुटल्याने त्याचा मृत्यू (CRPF soldier death outside ambani bungalow) झाला आहे.

अंबानीच्या घराबाहेरील CRPF जवानाचा बंदुकीतून गोळी सुटल्याने मृत्यू
Follow us on

मुंबई : उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील जवानाच्या बंदुकीतून चुकून गोळी सुटल्याने त्याचा मृत्यू (CRPF soldier death outside ambani bungalow) झाला आहे. हा जवान केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलातील (CRPF) होता. हा जवान दक्षिण मुंबईमधील आरआयएलचे चेअरमन आणि संचालक मुकेश अंबानी यांचे अंटालिया या निवासस्थानी बाहेर (CRPF soldier death outside ambani bungalow) पेडर रोडवर तैनात होता.

“ही घटना बुधवारी (22 जानेवारी) संध्याकाळी 7 च्या दरम्यान घडली. देवदान बकोत्रा असं या जवानाचं नाव आहे. गोळी लागल्यावर या जवानाला जेसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हा जवान गुजरात येथील राहणारा होता”, अशी माहिती पोलिसांनी दिली.

“या जवानाला अंटालिया येथील मधल्या गेटवर तैनात करण्यात आले होते. या गेटचा उपयोग घरातील कर्मचाऱ्यांसाठी केला जात होता. जेव्हा तो गेटजवळ उभा होता. तेव्हा त्याच्या एका हातात मोबाईल होता. त्याने त्यावेळी रायफलचा पट्टा हटवण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याचे नियंत्रण सुटल्यामुळे बंदुकीतून गोळ्या सुटून त्याला लागल्या. त्यानंतर त्याला जेसलोक रुग्णालयात दाखल केले”, असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

“जवानाचा मृतदेह काल सकाळी 6.30 वाजता रुग्णालयात आणला. आम्ही पोस्टमॉर्टम केले आणि मृतदेह पोलिसांकडे सोपवला”, असं जेजे रुग्णालयाचे डीन डॉ. पल्लवी सपले यांनी सांगितले.

दरम्यान, गावदेवी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. त्याचे पार्थिव गुजरातच्या जुनागड येते पाठवण्यात आले आहे. अंबानी यांना सुरक्षित ठेवण्यासाठी झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे.