Prithviraj Chavan: ‘ते’ उदयोन्मुख नेते असले तरी..; देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाला का लावला ब्रेक; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितली ही कारणं

| Updated on: Jul 01, 2022 | 7:22 PM

देवेंद्र फडणवीस यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथ विधीनंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी एकनाथ शिंदे यांना एक सबुरीचा सल्ला दिला आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणतात की, एकनाथ शिंदे सरकारमध्ये आता जेव्हा खाते वाटप होईल त्यावेळी मात्र त्यांच्या आमदारांना नाराजीचा सामना करावा लागणार आहे.

Prithviraj Chavan: ते उदयोन्मुख नेते असले तरी..; देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाला का लावला ब्रेक; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितली ही कारणं
Ghulam Nabi Azad : जुना व्यक्ती पक्ष सोडून गेला हे दुर्दैवी, दोन वर्षापुर्वी दिलेल्या पत्राचा विचार व्हायला हवा होता - पृथ्वीराज चव्हाण
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबईः शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या आमदारांच्या बंडखोरीनाट्याचा शेवट एकनाथ शिंदे (Eknath  Shinde) यांना मुख्यमंत्री पदी बसवून झाली. त्याच शपथविधीमध्येच अचानक झालेल्या निर्णयामुळे देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी घेतलेल्या उपमुख्यमंत्री पदाविषयी शरद पवार, संजय राऊत आदी नेत्यांनी मतं व्यक्त केली असली तरी त्यांच्या या निवडीविषयी वरिष्ठ पातळीवरचा निर्णय धक्कादायक कसा असू शकतो त्याची कारणं काय असतात, त्याविषयी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण (Former Chief Minister Prithviraj Chavan) यांनी विश्लेषण केले आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले की, देवेंद्र फडणवीस यांच्या झालेल्या निवडीला भाजपमधीलही काही कार्यकर्ते कारणीभूत आहेत. कार्यकर्त्यांच्या अतिउत्साहामुळेच देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा वरिष्ठ नेत्यांसमोर वेगळ्या प्रकारे गेली असल्यानेच दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या या नेतृत्वाला ब्रेक लावल्याचे सांगितले.

हा निर्णय अचानाक नाही

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नावाची मुख्यमंत्री पदाची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यनंतर त्याच बैठकीत त्यांनी सांगितले की, मी मंत्रिमंडळाच्य् बाहेर असेन. पण काही काळातच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी निर्णय बदलत देवेंद्र फडणवीस या मंत्रिमंडळातही सहभागी होतील असं ट्विट भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि अमित शहा यांनीही केली. त्यानंतर सायंकाळी झालेल्या साडेसातच्या शपथ विधीमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. या निर्णयाचे विश्लेषण करताना पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले की, हा निर्णय तात्काळ नव्हता, तर तो विचारपूर्वक घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.

शिवसेना संपवण्यासाठीच हा निर्णय

राज्यातील गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने चांगले यश मिळवले होते. त्यामुळे राज्यातील शिवसेनेचे वजन वाढते आहे. हे भाजपच्या चांगलेच लक्षात आले होते, त्यामुळे शिवसेनेचे राज्यातील वजन कमी करणे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे घरण्याचे राज्यातील राजकारणातून त्यांचे वजन कमी करण्यासाठीच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा डाव भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबई महानगरपालिका निवडणुका महत्वाचं कारण

काही दिवसात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत. त्या निवडणुकीत शिवसेनेला टक्कर देण्यासाठी आणि शिवसेनेचे कमी करण्यासाठी म्हणून भाजपकडून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री बनवण्याचे धोरण ठरले असल्याचेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

जातीय समीकरणाची गणितं

महानगरपालिका डोळ्यासमोर भाजपकडून महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवणं आणि अचानक उपमुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा करणं यापाठीमागे महानगरपालिका निवडणुका आहेत. मराठा समाज डोळ्यासमोर ठेऊन भाजपकडून हा निर्णय झाला असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

फडणवीसांच्या उदयोन्मुख नेतृत्वाला ब्रेक

भाजपमधील आणि देवेंद्र फडणवीसांच्या अतिउत्साही कार्यकर्त्यामुळे फडणवीसांचा तोटा सहन करावा लागला आहे. राज्यसभा, विधान परिषद आणि आता बंडखोरी नाट्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची जी राज्यात आणि राष्ट्रीय पातळीवर जी प्रतिमा उभा राहिली गेली ती प्रतिमाच त्यांना मारक ठरली आहे. देशातील चौथ्या नंबरचे नेतृत्व, राज्यसभेचा शिल्पकार, अशा प्रकारे कार्यकर्त्यांकडून उभी झालेल्या प्रतिमेमुळेच उदयोन्मुख नेता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला ब्रेक लावण्याचे काम राष्ट्रीय पातळीवरून केले गेले आहे.

एकनाथ शिंदेंना सबुरीचा सल्ला

देवेंद्र फडणवीस यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथ विधीनंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी एकनाथ शिंदे यांना एक सबुरीचा सल्ला दिला आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणतात की, एकनाथ शिंदे सरकारमध्ये आता जेव्हा खाते वाटप होईल त्यावेळी मात्र त्यांच्या आमदारांना नाराजीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी खाते वाटप करताना काळजी घेणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

एकत्रच पुढं जाऊ

उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगित की, येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत आम्ही एकत्र जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा बैठक घेऊन पुढील दिशा ठरवणार आहोत. झालेल्या बैठकीत आम्ही उद्धव ठाकरे यांनी तुम्ही नाराज न होता पुढील दिशा एकत्र बसून ठरवू असंही त्यांनी यावेळी सांगितले.