राज्यपालांचा ठाकरे सरकारच्या 12 नावांवर काही आक्षेप आहे का? अजित पवारांचं भेटीनंतर पहिलं उत्तर

| Updated on: Sep 01, 2021 | 9:18 PM

विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागा रिक्त असून अद्याप यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. महाविकास आघाडी सरकारने राज्यपालांना 12 नावांची यादी दिली होती. मात्र अनेक महिने उलटले तरी यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कुठलीही कार्यवाही केली नाही.

राज्यपालांचा ठाकरे सरकारच्या 12 नावांवर काही आक्षेप आहे का? अजित पवारांचं भेटीनंतर पहिलं उत्तर
CM Uddhav Thackeray, Ajit Pawar, Bhagat Singh Koshyari
Follow us on

मुंबई : विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागा रिक्त असून अद्याप यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. महाविकास आघाडी सरकारने राज्यपालांना 12 नावांची यादी दिली होती. मात्र अनेक महिने उलटले तरी यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कुठलीही कार्यवाही केली नाही. यासह राज्यातील पाऊस आणि कोरोनाच्या परिस्थितीबाबत चर्चेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना या भेटीत कोणकोणत्या विषयावर चर्चा झाली, याबाबतची माहिती दिली. (Does governor have any objection on 12 names for MLA that given by Thackeray govt? Ajit Pawar’s reply)

अजित पवार म्हणाले की, “मी, मुख्यमंत्री महोदय, बाळासाहेब थोरात, आणि राज्याचे मुख्य सचिव राज्यपालांना भेटलो. प्रोटोकॉलनुसार राज्यपालांची भेट घेतली जाते. त्यासाठी आम्ही भेटलो. पावसानं राज्यात जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे आणि राज्यातील कोरोनाची स्थिती याबाबत चर्चा केली. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबत प्रश्न केला असता, अजित पवार म्हणाले की, राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबतचा ठराव हा कॅबिनेटने केला होता. परंतु त्यानंतर पुढची कार्यवाही झालेली नाही. म्हणून याबाबत विनंती करण्यासाठी आम्ही आज येथे आलो होतो. त्याबद्दल लवकर निर्णय घेतला तर योग्य होईल, असे सांगून आम्ही राज्यपालांना कार्यवाही करण्याबाबत विनंती केली.

यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले की, ज्या 12 जणांच्या नावांची यादी राज्यपालांना पाठवली आहे, त्यावर राज्यपालांचा काही आक्षेप आहे का? यावर अजित पवार म्हणाले की, राज्यपालांनी याविषयी कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेतलेला नाही. या नियुक्तीचा त्यांना अधिकार आहे. त्यामुळे आम्ही केवळ विनंती केली की, हा प्रश्न लवकर सोडवला तर बरं होईल. यावर राज्यपाल म्हणाले की, ठिक आहे, मी सगळं ऐकून घेतलं आहे, त्यामुळे मी यावर योग्य तो निर्णय घेईन.

परब यांचे कार्यक्रम ठरलेले असल्याने त्यांनी ईडीकडे वेळ मागितली आहे

परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे, याबाबत विचारणा केली असता अजित पवार म्हणाले की, मंत्री असल्याने परब यांचे कार्यक्रम आधीच ठरले आहेत. त्यामुळे चौकशीसाठी उपस्थित राहता येणार नाही. मला चौकशीसाठी उपस्थित राहण्याकरीता 14 दिवसांची मुदत देण्यात यावी, असं अनिल परब यांनी ईडीला कळवलं आहे, अशी माहिती मला माध्यमांतील बातम्यांमधून मिळाली आहे.

अनिल देशमुख आणि ईडीविषयी कोणतीही चर्चा नाही

अनिल देशमुख, ईडी, सीबीआय याबाबत विचारणा केली असता अजित पवार म्हणाले की, अनिल देशमुख, अनिल परब, ईडी वगैरे विषयांवर यावेळी कोणतीही चर्चा झाली नाही. आम्ही केवळ राज्यातील पाऊस, त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती, कोरोनाची परिस्थिती याबाबत चर्चा केली. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी राज्यभरातील फॅमिली डॉक्टर्सची कॉन्फरन्स घेतात, याबाबत राज्यपालांना माहिती दिली. केरळमधील कोरोनाची परिस्थिती पाहून महाराष्ट्रातील उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली.

इतर बातम्या

निलेश राणेंची करेक्ट कार्यक्रमाची धमकी, राऊतांच्या सुरक्षेत वाढ, 6 शस्त्रधारी जवानांचं सुरक्षा कवच; घराला छावणीचं स्वरुप

लोकांच्या जीवापेक्षा स्वत:चा राजकीय अजेंडा महत्त्वाचा मानू नका; दिलीप-वळसे पाटलांचा राज ठाकरेंना टोला

ज्या आमदारांच्या जीवावर मुख्यमंत्री झालात त्यांना समजून घ्या; राष्ट्रवादीच्या आमदाराचा मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर

(Does governor have any objection on 12 names for MLA that given by Thackeray govt? Ajit Pawar’s reply)