PMC Bank fraud : 22 फ्लॅट, 1 विमान, 1 जहाज, ईडीच्या हाती घबाड

| Updated on: Oct 07, 2019 | 4:42 PM

पीएमसी बँकेचं कर्ज बुडवणाऱ्या PMC Bank fraud सारंग वाधवान (Sarang Wadhwan) आणि राकेश वाधवान (Rakesh Wadhwan) यांना अटक केल्यानंतर, ईडीने मोठमोठ्या धाडी टाकल्या.

PMC Bank fraud : 22 फ्लॅट, 1 विमान, 1 जहाज, ईडीच्या हाती घबाड
Follow us on

मुंबई : पंजाब आणि महाराष्ट्र बँक घोटाळाप्रकरणात  (PMC Bank fraud) ईडीचं धाडसत्र सुरुच आहे.  मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हेशाखेने (EOW Mumbai Police) पीएमसी बँकेचं कर्ज बुडवणाऱ्या PMC Bank fraud सारंग वाधवान (Sarang Wadhwan) आणि राकेश वाधवान (Rakesh Wadhwan) यांना अटक केल्यानंतर, ईडीने मोठमोठ्या धाडी टाकल्या. आजच्या धाडीत ईडीला घबाड सापडलं आहे. ईडीला अलिबागमध्ये तब्बल 22 फ्लॅट सापडले आहेत. लॅविश फ्लॅटचा ईडीने ताबा घेतला आहे.

हे कमी म्हणून की काय ईडीला एचडीआयएलच्या प्रमोटर्सच्या नावावर एक विमान असल्याचं  आढळलं आहे. त्याचबरोबर एक छोटं जहाजही सापडलं आहे, ते मालदीवमध्ये असल्याची माहिती ईडीला मिळाली आहे.

ईडीने काय काय जप्त केलं?

  • अलिबागमद्ये 22 खोल्याचं अलिशान घर
  • एक विमान
  • एक जहाज
  • अनेक महागड्या गाड्या

वाधवान बिल्डर्स हे एचडीआयएल (HDIL) कंपनीचे संचालक आहेत.  पीएमसी बँकेचं कर्ज घेऊन बुडवणाऱ्या एकूण 44 मोठ्या खात्यांपैकी 10 खाती ही एचडीआयएल (HDIL) आणि वाधवा यांच्याशी संबंधित आहेत. त्यामुळे ईडीने कारवाईची मोहीम उघडली आहे.

संबंधित 10 खात्यांपैकी एक खाते सारंग वाधवा यांचे तर दुसरे राकेश वाधवा यांचे खासगी खाते आहे. पोलिसांनी चार दिवसांपूर्वी दोघांनाही चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, तपासात सहकार्य करत नसल्याने पोलिसांनी दोघांनाही अटक केली. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची जवळपास 3 हजार 500 कोटी रुपयांच्या संपत्तीवरही जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या 

PMC बँकेत RBI च्या अधिकाऱ्यांचेही पैसे अडकले, आता 10 हजार रुपये काढण्याची मुभा   

पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी बडे मासे सापडले, वाधवान बिल्डर्सला अटक, 3500 कोटींची संपत्ती जप्त  

PMC बँकेत RBI च्या अधिकाऱ्यांचेही पैसे अडकले, आता 10 हजार रुपये काढण्याची मुभा