
मुंबईः लव्ह जिहादला विरोध दर्शविण्यासाठी आणि धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्यासाठी सकल हिंदू समाजाने विरोट मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चामध्ये शिंदे गट आणि भाजपचे काही नेतेही सहभागी झाले होते. तर दुसरीकडे या मोर्चामध्ये ठाकरे गटाचा एकही नेता सहभागी झाला नसल्याने भाजपकडून ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला.
त्यामुळे या मोर्चाविषयी खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना ठाकरे गटाच्या शिवसेना भवन हिंदूसाठी किती आशावादी आहे ते सांगताना राज्यातील आणि केंद्रातीली हिंदूचे सरकार म्हणवून घेणाऱ्या भाजपवर संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.
यावेळी खासदार संजय राऊत यांनी सकल हिंदू समाजाच्या विराट मोर्चावर बोलताना त्यांनी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचंही गुणगान गायिले आहे.
राहुल गांधी यांनी लाल चौकामध्ये तिरंगा फडकावून देशाला संदेश दिला असल्याचेही सांगितले आहे. तर या यात्रेमध्ये मी सहभागी झालो होतो असंही त्यांनी यावेळी सांगतले.
काँग्रेस आणि भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी यांनी देशात महत्वाचा टप्पा पार केला आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल चढविला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व कधीच सोडले आहे.
त्यांनी फक्त आता एमआयएमशी युती करायची तेवढीच बाकी आहे अशी जोरदार टीका भाजप नेत्याकडून करण्यात आली आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी आपल्या संजय राऊत यांच्या शैलीत टीका करणाऱ्यांना उत्तर दिले आहे.
मोर्चाविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले की, मोर्चे काढणे हा लोकशाहीमध्ये प्रत्येकाचा हक्क आहे. मात्र हा मोर्चा निघाला असला तरी त्या मोर्चाचे विसर्जन हे शिवसेना समोर झाले आहे. त्यामुळे याचा अर्थ असा आहे की, शिवसेना आणि शिवसेना भवन हिंदुसाठी एकमेव आशास्थान असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य आणि केंद्र सरकारवर टीका करताना त्यांनी या दिल्लीत शक्तिमान हिंदू नेत्यांचं राज्य तरीही मोर्चा काढावा लागतो हे दुर्देव्य असल्याचे मतही संजय राऊत यांना यावेळी व्यक्त केले.