करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या गोदामाला भीषण आग

मुंबई : गोरेगाव येथील कामा इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 12 गाड्या, 8 वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले असून, आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आग विझवताना अग्निशमन दलाचा कर्मचारी जखमी झाला आहे. मध्यरात्री दोन-अडीच वाजण्याच्या सुमारास आग लागली. आग लागून पाच तास झाले, तरीही आग विझवण्यात यश आले नाही. कामा इंडस्ट्रीयल […]

करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या गोदामाला भीषण आग
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 3:57 PM

मुंबई : गोरेगाव येथील कामा इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 12 गाड्या, 8 वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले असून, आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आग विझवताना अग्निशमन दलाचा कर्मचारी जखमी झाला आहे. मध्यरात्री दोन-अडीच वाजण्याच्या सुमारास आग लागली.

आग लागून पाच तास झाले, तरीही आग विझवण्यात यश आले नाही.

कामा इंडस्ट्रीयल इस्टेटच्या शेजारीच धर्मा प्रॉडक्शनचं गोदाम आहे. या गोदामालाही आग लागली आहे. धर्मा प्रॉडक्शनमधील महत्त्वाचे साहित्य जळून खाक झाले असून, धर्मा प्रॉडक्शनचे मोठे नुकसानही झाले आहे.

धर्मा प्रॉडक्शन हे हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर याच्या मालकीचे आहे. गोरेगाव येथेच धर्मा प्रॉडक्शनचं गोदाम आहे. सिनेमाच्या शूटिंगसंबंधित साहित्य या गोदामात होती, अशी माहिती मिळते आहे. मात्र, या आगीत अनेक साहित्य जळून खाक झाले आहेत.