काँग्रेसचे माजी नेते अजित सावंत यांचं निधन

| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

मुंबई : काँग्रेसचे माजी नेते आणि राजकीय निरीक्षक डॉ. अजित सावंत यांचं निधन झालं. वर्षभरापासून त्यांना  कर्करोगाने ग्रासलं होतं आणि आज मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अजित सावंत हे 60 वर्षांचे होते. डॉ. अजित सावंत यांनी मुंबई काँग्रेसमध्ये अनेक वर्ष काम केलं. या दरम्यान त्यांनी अनेक महत्त्वाची पदं भुषवली. 2001 ते 2012 दरम्यान ते मुंबई […]

काँग्रेसचे माजी नेते अजित सावंत यांचं निधन
Follow us on

मुंबई : काँग्रेसचे माजी नेते आणि राजकीय निरीक्षक डॉ. अजित सावंत यांचं निधन झालं. वर्षभरापासून त्यांना  कर्करोगाने ग्रासलं होतं आणि आज मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अजित सावंत हे 60 वर्षांचे होते. डॉ. अजित सावंत यांनी मुंबई काँग्रेसमध्ये अनेक वर्ष काम केलं. या दरम्यान त्यांनी अनेक महत्त्वाची पदं भुषवली.

2001 ते 2012 दरम्यान ते मुंबई प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते होते. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी ‘आप’मध्ये प्रवेश केला. नॅशनल कॉन्फेरेशन ऑफ युनिट्सचे वरिष्ठ अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम सांभाळलं होतं. तसेच भारतीय असंघटित कामगार विकास संघटनेचेही ते अध्यक्ष होते.

आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी सर्वात प्रथम संघटना ही अजित सावंत यांनी उभारली. ‘बीपीओ-आयटी एम्प्लॉइज कॉन्फेडरेशन’ या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी आयटी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या होणाऱ्या पिळवणुकीविरोधात आवाज उठवला होता. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कार्मिक व्यवस्थापनात काम केलं.