म्हाडाने बदलला हा नियम अन् वाढली घरांची संख्या, आता अधिकाधिक लोकांना परवडणारी घरे

संभाजीनगरमध्ये आम्ही ड्रॉ केला, त्यात जालना, अंबोजोगाई लातूर होते. आम्ही सर्वत्र या स्किम सुरू केल्या. माझ्या आधीच्या स्किम आहे. श्रेय घेत नाही. पण आम्ही त्या कंम्प्लिट केल्या आहेत. आम्ही आता पुन्हा लातूर, संभाजीनगरमध्ये या स्किम आणत आहोत.

म्हाडाने बदलला हा नियम अन् वाढली घरांची संख्या, आता अधिकाधिक लोकांना परवडणारी घरे
गृहनिर्माण मंत्री अतुल सावे
Jitendra Zavar | Updated on: Oct 08, 2024 | 10:09 AM

पूर्वी म्हाडा जिथे दहा हजार स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे तेथे १ एसएफआय देत होते. त्यामुळे १० हजार स्क्वेअर फुटाचंच बांधकाम मिळत होते. त्यामुळे लिमिटेड घरे होत होती. आता आम्ही प्रीमियम घेऊन तीन चार एफएसआय देतो. त्यामुळे तीन चार घरे उपलब्ध होतात. म्हणजे एखाद्या प्लॉटमध्ये आधी २५ घरे असतील तर एफएसआय चार झाला तर त्याला १०० घरे तिकडे मिळतात. त्याल सेल कंपोनंनट वाढतो. विकासक प्रिमीयम भरतात. त्यामुळे अधिकाधिक लोकांना परवडणारी घरे मिळतात, असे भाजप नेते अन् गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. ‘टीव्ही ९ मराठी’च्या ‘इन्फ्रा अँड हाऊसिंग कॉन्क्लेव्ह’ मध्ये ते बोलत होते.

मध्यमवर्गीयांसाठी घरांसाठी म्हाडाच्या योजना

महाराष्ट्राचं आमचं महायुतीचं सरकार आलं तेव्हापासून आम्ही या मुंबईत या महाराष्ट्रात सामान्य मध्यमवर्गीयांसाठी घरे उपलब्ध झाली पाहिजे, यामुळे म्हाडाच्या माध्यमातून अनेक स्कीम जाहीर केल्या. लॉटरीच्या माध्यमातून सर्वांना घरे देण्याचा प्रयत्न केला आहे. उद्याही दोन हजार २० घरांची लॉटरी आहे. १ लाख लोकांनी अर्ज केले आहेत. आम्हाला खात्री आहे की या माध्यमातून या ड्रॉमधून घरे लागतील.

पहिल्या टप्प्यात पाच कोटी घरे

प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात पाच कोटी घरे दिली. आता पर्यंत ३ कोटी घरे देणार आहोत. सामान्य जनतेला स्वत:चं घर असावं, प्रत्येकाचं हे स्वप्न असतं. मोदी पहिल्यांदाच पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी सांगितलं प्रत्येकाला हक्काचं घर मिळावं. मोदींनी देशासाठी संकल्प केला. आम्ही राज्यात पूर्ण देत आहोत. सोलापूरच्या रे नगरात ३० हजार घरांचा संकल्प केला होता. १५ हजार घरे दिले. मार्चपर्यंत १५ हजार घरे देऊ. आमचे अनेक प्रकल्प पूर्ण होत आले आहेत.

संभाजीनगरमध्ये आम्ही ड्रॉ केला, त्यात जालना, अंबोजोगाई लातूर होते. आम्ही सर्वत्र या स्किम सुरू केल्या. माझ्या आधीच्या स्किम आहे. श्रेय घेत नाही. पण आम्ही त्या कंम्प्लिट केल्या आहेत. आम्ही आता पुन्हा लातूर, संभाजीनगरमध्ये या स्किम आणत आहोत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us