AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आदी गोदरेज, इक्बाल सिंह चहल, उज्ज्वल निकम यांच्यासह 31 मान्यवरांना ‘मुंबई रत्न’, राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या 31 निवडक व्यक्तींना राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे ‘मुंबई रत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले

आदी गोदरेज, इक्बाल सिंह चहल, उज्ज्वल निकम यांच्यासह 31 मान्यवरांना ‘मुंबई रत्न’, राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
MUMBAI RATNA
| Edited By: | Updated on: Jul 19, 2021 | 11:58 PM
Share

मुंबई :  विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या 31 निवडक व्यक्तींना राज्यपाला भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या हस्ते राजभवन येथे ‘मुंबई रत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. फिल्म्स टुडे, नाना नानी फाउंडेशन व एनार समूहातर्फे सदर पुरस्कार देण्यात आले. यावेळी गोदरेज समूहाचे अध्यक्ष आदी गोदरेज, महानगर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, बांधकाम उद्योजक निरंजन हिरानंदानी, वकील उज्ज्वल निकम आदी मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. (Governor Bhagat Singh Koshyari presented Mumbai Ratna award to 31 people)

देश आत्मनिर्भर करण्यासाठी प्रत्येकाने योगदान  दिले पाहिजे

यावेळी बोलताना उद्योजक, कलाकार, वकील, वैद्यकीय तज्ज्ञ असे सर्वच जण समाजासाठी आपापल्या परीने योगदान देत असतात. मात्र सर्वांना आरोग्य सेवा व शिक्षण उपलब्ध करून, तसेच गरिबी हटवून देश आत्मनिर्भर करण्यासाठी प्रत्येकाने समाजासाठी अधिक योगदान दिले पाहिजे असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज (19 जुलै) मुंबई येथे केले.

31 निवडक व्यक्तींना राज्यपालांच्या हस्ते ‘मुंबई रत्न’ पुरस्कार

राज्यपालांच्या हस्ते गोदरेज समूहाचे अध्यक्ष आदी गोदरेज, महानगर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, बांधकाम उद्योजक निरंजन हिरानंदानी, वकील उज्ज्वल निकम, इंडियन एक्स्प्रेस समूहाचे अनंत गोयनका, वैद्यकीय तज्ञ डॉ गौतम भन्साळी, मंजू लोढा, पार्श्वगायक उदित नारायण, भजन सम्राट अनुप जलोटा, युनियन बँकेचे अध्यक्ष राजकिरण राय, डॉ शोमा घोष, आशिष चौहान आदींना यावेळी सन्मानित करण्यात आले. टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा व वेदांत समूहाचे अनिल अगरवाल कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही. कार्यक्रमाला फिल्म्स टुडेचे अध्यक्ष श्याम सिंघानिया व राजेश श्रीवास्तव उपस्थित होते.

इतर बातम्या :

मोठी बातमी ! पंढरपुरात अखेर 300 वारकऱ्यांना परवानगी, विसाव्यापासून मठापर्यंत मानाच्या पालख्या पायी जाणार

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती, प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा यांना अटक, कारण काय?

Mumbai Rains Live Updates | जळगावच्या हतनूर धरणाचे 8 दरवाजे पूर्णपणे उघडले

(Governor Bhagat Singh Koshyari presented Mumbai Ratna award to 31 people)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.