नालासोपाऱ्यात रस्त्यावर गुडघाभर पाणी, अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी

वसईत पहिल्याच पावसाने नालेसफाईची पोलखोल केली. आज पहाटेपासून वसई, विरार, नालासोपाऱ्यात पावसाने धुवांधार हजेरी लावली आहे.

नालासोपाऱ्यात रस्त्यावर गुडघाभर पाणी, अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी
| Updated on: Jun 28, 2019 | 10:56 AM

मुंबई : वसईत पहिल्याच पावसाने नालेसफाईची पोलखोल केली. आज पहाटेपासून वसई, विरार, नालासोपाऱ्यात पावसाने धुवांधार हजेरी लावली आहे. गेल्या 5 तासापासून पडणाऱ्या पावसाने शहरातील सकल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. वसईच्या विश्वकर्मा नगर, वसई फाट्याकडे जाणाऱ्या भोयदापाडा, वसंतनागरी, एव्हरशाईन या परिसरातील रस्ते जलमय झाले आहेत. तर नालासोपाऱ्यात सेंट्रल पार्क रस्त्यावर गुडगाभार पाणी साचले आहे. साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना नागरिक, वाहनधारक यांना मोठी कसरत करावी लागत आहे.

याशिवाय अनेक रिक्षा पाण्यात बंद पडल्याने वाहतूक कोंडी होत आहे.  यंदाच्या वर्षी पालिकेने नालेसफाईसाठी 10 कोटींचा खर्च केला होता. मात्र तरीही रस्त्यावर पाणी तुंबल्याने नागरिक आता संतप्त होत आहेत.

मुंबईत पावसाची हजेरी

मुंबईतही पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईच्या लालबाग, परळ, दादर, माहीम भागात सकाळपासून पावसाने बरसायला सुरुवात केली. वसई-विरारपासून चर्चगेटपर्यंत पाऊस बरसत आहे.

कल्याण : काल संध्याकाळपासून कल्याणमध्ये पाऊस सुरु आहे. पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.  कल्याणच्या चिकलघर परिसरात पाणी साचले. त्यामुळे नालेसफाईची पहिल्याच पावसात पोलखोल झाली.