सरस्वतीनं किती शाळा उघडल्यात, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचा सवाल

| Updated on: Nov 28, 2022 | 10:26 PM

याआधी अमोल मिटकरींनी उडवलेल्या खिल्लींमुळे ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या होत्या.

सरस्वतीनं किती शाळा उघडल्यात, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचा सवाल
छगन भुजबळ
Follow us on

मुंबई – राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांचं विधान पुन्हा वादात आलंय. याआधी शाळांमध्ये फक्त सरस्वतीचाच फोटो का,  असा प्रश्न करणाऱ्या भुजबळांनी आता सरस्वतीनं किती शाळा उघडल्या, असा प्रश्न केलाय. मात्र त्यांच्या या विधानाशी राष्ट्रवादीच असहमत असल्याचं दिसतंय. सरस्वतीबद्दल राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी दुसऱ्यांदा केलेलं विधान वादात आलंय. याआधी मंदिरांमध्ये सरस्वतीऐवजी सावित्रीबाईंचा फोटा का नाही, असा प्रश्न भुजबळांनी केला होता.  त्यानंतर आता सरस्वतीनं किती शाळा काढल्या, असं म्हणत सरस्वतीऐवजी फुले-सावित्रीबाई-शाहू-आंबेडकरंची पूजा करा असं भुजबळांनी म्हटलंय.

अखिल भारतीय समता परिषदेच्या कार्यक्रमात भुजबळ बोलत होते. यावेळी पुणे विद्यापीठात अथर्वशीर्ष पठणाचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आल्यावरुनही भुजबळांनी टीका केली.  मात्र खुद्द राष्ट्रवादीनं याबद्दल वेगळी भूमिका मांडली आहे.

याआधी अमोल मिटकरींनी उडवलेल्या खिल्लींमुळे ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या होत्या. त्यावरुन खुद्द शरद पवारांनी मिटकरींना समज देण्यात आल्याचं म्हटलं.  मात्र आता भुजबळांनी दोनच महिन्यात दुसऱ्यांदा सरस्वतीबद्दल केलेल्या विधानाचा वादामुळे त्यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

शाळेत सावित्री फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो लावायला पाहिजेत. सरस्वतीचा फोटो, शारदा मातेचा फोटो. जिला आम्ही कधी पाहिलं नाही. शिकविलं असेल तर फक्त तीन टक्के लोकांना शिकविलं. त्यांची पूजा कशासाठी करायची, असा सवाल छगन भुजबळ यांनी केला.

सरस्वती कुठून आल्या, किती शाळा त्यांनी काढल्या. किती लोकांना शिकविलं. पदवी, डिग्री, डिप्लोमा कुणाला काही दिलं का. त्यांनी दिलं तर महात्मा फुले यांना पाऊल का उचलावं लागलं. सगळया समाजाला शिक्षण का मिळालं नाही, असंही छगन भुजबळ यांनी ठामपणे विचारलं.