VIDEO | Fire in Mumbai: पवईत कार शोरूमला भीषण आग

अग्निशमन दलाच्या आधिक गाड्या घटनास्थळी पोहोचत आहेत. घटनास्थळी मोठा जनसमुदाय जमला आहे आणि गोंधळ पाहायला मिळतोय. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

VIDEO | Fire in Mumbai: पवईत कार शोरूमला भीषण आग
Fire in Powai
| Edited By: | Updated on: Nov 18, 2021 | 12:10 PM

मुंबईः पवई साकी विहार परिसरातील हुंडाई ऑटो सेंटरला भीषण आग लागली आहे. अद्याप कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही मात्र आग मोठी आहे. अनेक महागड्या गाड्या शोरूममध्ये आहेत. अग्निशमन दलाच्या किमान 4 गाड्या घटनास्थळी असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. अग्निशमन दलाच्या आधिक गाड्या घटनास्थळी पोहोचत आहेत. घटनास्थळी मोठा जनसमुदाय जमला आहे आणि गोंधळ पाहायला मिळतोय. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

या घटनेचा व्हिडिओ एका रहिवाशाने शेअर केला आहे.

ही प्राथमिक माहिती आहे. ही बातमी अपडेट केली जाईल.

इतर बातम्या-

निलंबनाच्या भीतीनं ST कर्मचाऱ्याकडून विष प्राशन, बुलडाण्याच्या विशाल अंबलकर यांचं अकोल्यात निधन

VIDEO | फूटेज असूनही वडील खोट्या केसमध्ये तुरुंगात, दादाचा पत्ता नाही, बदलापूरच्या तरुणीचा ठाकरे सरकारकडे टाहो

रिलायन्स विमा कंपनीचे अणखीन एक गुपित समोर, चौकशीनंतर होणार कारवाई