PAK vs AUS : T20 वर्ल्ड कप आधी पाकिस्तानला मिळाला त्यांचा अभिषेक शर्मा, ऑस्ट्रेलिया विरुद्ध वादळी खेळी
PAK vs AUS : भारताकडे जसा अभिषेक शर्मा सारखा स्फोटक फलंदाज आहे. तसं पाकिस्तानला आता त्यांचा युवा स्फोटक ओपनर मिळाला आहे. ऑस्ट्रेलियन टीमला या पाकिस्तानी अभिषेक शर्माचा फटका बसला आहे.

ICC T20 वर्ल्ड कप 2026 सुरु होण्याआधी पाकिस्तानला त्यांचा अभिषेक शर्मा मिळाला आहे. थोडं तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण सत्य हेच आहे. टीम इंडियाचा युवा ओपनर अभिषेक शर्मा पहिल्या चेंडूपासून आक्रमक सुरुवात करतो. त्यानंतर मधल्या ओव्हर्समध्ये किफायती गोलंदाजी करतो. अगदी तसच प्रदर्शन पाकिस्तानचा युवा स्टार सॅम अयूबने ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या टी 20 सामन्यात केलं. त्याचा खेळ पाहून पाकिस्तानी जनता त्याची फॅन झाली आहे. टुर्नामेंटचा पहिला सामना 29 जानेवारीला लाहोरच्या गद्दाफी स्टेडिअममध्ये खेळला गेला. पाकिस्तानने पहिली बॅटिंग केली. ओपनिंग करताना त्याने 22 चेंडूत 40 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर गोलंदाजीमध्ये तीन ओव्हरचा स्पेल टाकून 2 विकेट घेतले.
सॅम अयूब पाकिस्तानकडून एकूण 58 टी 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळलाय. त्याने 56 इनिंगमध्ये 20.92 च्या सरासरीने 1109 धावा केल्या आहेत. टी 20 क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर पाच अर्धशतकं आहेत. 98 धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. गोलंदाजी बद्दल बोलायचं झाल्यास त्याने 58 सामन्यात 28 इनिंगमध्ये 24.33 च्या सरासरीने 21 विकेट काढलेत. 35 धावा देऊन तीन विकेट ही त्याची गोलंदाजीतली सर्वोत्तम कामगिरी आहे.
गोलंदाजीतली कामगिरी कशी?
सॅम अयूब आतापर्यंत पाकिस्तानसाठी आठ टेस्ट, 17 वनडे आणि 58 टी20 इंटरनॅशनल सामने खेळलाय. या दरम्यान टेस्टमध्ये बॅटिंग करताना त्याने 26 च्या सरासरीने 364, वनडेच्या 17 डावात 46.94 च्या सरासरीने 751 आणि टी 20 च्या 56 डावात 20.92 च्या सरासरीने 1109 धावा केल्या आहेत. गोलंदाजीत टेस्टमध्ये चार, वनडेमध्ये नऊ आणि टी 20 मध्ये 21 विकेट काढल्यात. अभिषेक शर्मा भारताचा युवा स्फोटक ओपनर आहे. भारताला वेगवान सुरुवात देण्याची त्याची खासियत आहे. प्रतिस्पर्धी टीमच्या गोलंदाजांची दिशा आणि टप्पा बिघडवण्यात अभिषेक शर्मा माहीर आहे.
