AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वनडे क्रिकेटमध्ये फेल होण्याचं कारण काय? सूर्यकुमार यादवने स्वत:च केला खुलासा

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियाने टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं. त्यामुळे कर्णधारपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर पहिल्याच आयसीसी स्पर्धेत यश मिळवलं. टी20 क्रिकेटमध्ये सूर्यकुमारचं नाणं खणखणीत वाजलं, पण वनडे क्रिकेटमध्ये फेल गेला. नेमकं कारण काय जाणून घ्या.

वनडे क्रिकेटमध्ये फेल होण्याचं कारण काय? सूर्यकुमार यादवने स्वत:च केला खुलासा
वनडे क्रिकेटमध्ये फेल होण्याचं कारण काय? सूर्यकुमार यादवने स्वत:च केला खुलासाImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Mar 16, 2026 | 5:14 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरल्यानंतर प्रशिक्षक गौतम गंभीर याचं पुढचं लक्ष्य वनडे वर्ल्डकप स्पर्धा असणार आहे. यासाठी टीम इंडियाची लवकरच बांधणी केली जाणार आहे. मागच्या पर्वात ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाल्याने जेतेपदाचं स्वप्न भंगलं होतं. असं असताना या स्पर्धेपूर्वी सूर्यकुमार यादव या फॉर्मेटमधून एक पाऊल मागे आला आहे. सूर्यकुमार यादवने स्पष्ट सांगितलं की, तो वनडे क्रिकेटसाठी बनलेला नाही. सूर्यकुमार यादवने एका मुलाखतीत हा खुलासा केला. सूर्यकुमार यादव वनडे क्रिकेटपासून इतकं लांब राहण्याचं कारण काय? असं काय झालं की सूर्युकमार यादव वनडे क्रिकेटपासून दूर राहणं पसंत करतो. सूर्यकुमार यादव शेवटचा वनडे सामना 2023 मध्ये खेळला होता. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा खेळाल होता. त्यानंतर आतापर्यंत टी20 क्रिकेटच खेळत आहे. असं असताना सूर्यकुमार यादवने वनडे क्रिकेटमधील चढउतारांबबात सांगितलं.

काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

सूर्यकुमार यादव म्हणाला की, ‘मी जितकं वनडे क्रिकेट खेळलो, त्यात तुम्हाला तीन प्रकारे खेळावं लागतं. कधी तुम्हाला लवकर उतरावं लागतं. कधी विकेट पडली तर कसोटी सारखं खेळावं लागतं. त्यानंतर तुम्हाला चांगल्या स्ट्राईक रेटसह खेळावं लागतं. जसं की आम्ही टी20 क्रिकेटमध्ये करतो. मला कधीच वनडे क्रिकेट समजलं नाही. मी माझे सर्वोत्तम प्रयत्न केले, पण वनडे क्रिकेट कठीण फॉर्मेट आहे.’ सूर्यकुमार यादवने पुढे सांगितलं की, वनडे क्रिकेटचा उत्साह वेगळा आहे आणि वेगळीच मजा असते. टी20 त्यापेक्षा वेगळं आहे.

सूर्यकुमार यादवची टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत बॅट तशी शांत होती. पहिल्या सामन्यात अमेरिकेविरुद्धची खेळी सोडली तर संपूर्ण स्पर्धेत काही खास करू शकला नाही. अंतिम सामन्यातही शून्यावर बाद होत तंबूत परतला. सूर्यकुमार यादवने 113 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 36 पेक्षा जास्त सरासरीने 3272 धावा केल्या. यात त्याने 4 शतकं ठोकली आहेत. दुसरीकडे, वनडे क्रिकेटमध्ये 37 सामने खेळला असून 35 डावात 25.76 च्या सरासरीने 773 धावा केल्या आहे. यात 4 अर्धशतकांचा समावेश आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल