AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! शिवसेना नाराज? एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला रवाना, राज्यात मोठ्या घडामोडी

मोठी बातमी समोर येत आहे. एकनाथ शिंदे हे अचानक दिल्लीला रवाना झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. राज्यात घडामोडींना वेग आला आहे.

मोठी बातमी! शिवसेना नाराज? एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला रवाना, राज्यात मोठ्या घडामोडी
eknath shindeImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 16, 2026 | 4:50 PM
Share

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना शिंदे गटाचे सर्वेसर्वा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक दिल्लीला रवाना झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. एकनाथ शिंदे आपल्या या दौऱ्यामध्ये भाजपचे अध्यक्ष नितीन नबिन आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार जिल्हा परिषदेमध्ये अनेक ठिकाणी शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवलं जात असून, दुजाभाव केला जात आहे. त्यामुळे शिवसेनेत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहेत. रायगड मध्ये बहूमत असूनही तडजोड करावी लागली, तर फलटणमध्ये शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यात आलं, अशी खंत स्थानिक शिवसैनिकांकडून व्यक्त केली जात आहे.  दरम्यान यावर काही ठोस तोडगा निघावा, यासाठी एकनाथ शिंदे हे अचानक दिल्लीला गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

दरम्यान नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीमध्ये भाजपने शिवसेना शिंदे गटाला अनेक ठिकाणी मोठा धक्का दिला होता. शिवसेना शिंदे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यावेळी भाजपात प्रवेश केला होता. यावरून देखील शिवसेना शिंदे गटात नाराजी होती. त्यानंतर महापालिका निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौरा केला. या दौऱ्यानंतर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे महापालिका निवडणुकीसाठी अनेक ठिकाणी युती झाल्याचं पहायला मिळालं, आणि दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश द्यायचा नाही, असं देखील ठरलं होतं.

महापालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला चांगलं यश मिळालं. काही ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचा महापौर झाला तर काही ठिकाणी भाजपचा महापौर झाला. मात्र त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये देखील भाजप हा नंबर एकचा पक्ष ठरला तर शिवसेना शिंदे गटाला देखील चांगलं यश मिळालं. अनेक ठिकाणी या निवडणुकीतही भाजप शिवसेना शिंदे गटाची युती होती. मात्र आता निकालानंतर सत्तेपासून दूर ठेवलं जात असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात येत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे याचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!