मुंबई अब्जाधीश वाढले, आशियात सर्वाधिक अब्जाधिशांची संख्या देशाच्या आर्थिक राजधानीत

Hurun rich list: मुंबईतील अब्जाधिशांची संख्या 386 झाली आहे. मुंबईतील अब्जाधिशांच्या संख्येत यंदा 58 लोक वाढले आहेत. मुंबईनंतर अब्जाधिशांच्या संख्येत दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्लीत अब्जाधिशांची संख्या 18 ने वाढली आहे.

मुंबई अब्जाधीश वाढले, आशियात सर्वाधिक अब्जाधिशांची संख्या देशाच्या आर्थिक राजधानीत
| Updated on: Aug 30, 2024 | 12:09 PM

मुंबई मायानगरी आहे. या शहरात अनेक जणांनी आपले करिअर घडवले. यामुळेच मुंबई देशाची आर्थिक राजधानी बनली. आता मुंबई देशातच नव्हे तर आशिया खंडात सर्वाधिक अब्जाधीश असलेले शहर झाले आहे. मुंबईने चीनलाही मागे टाकले आहे. अब्जाधिशांच्या यादीत जगात न्यूयॉर्क पहिल्या, लंडन दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर मुंबईचा तिसरा क्रमांक आहे. हुरुन 2024 च्या यादीत ही माहिती दिली आहे. भारताचा विचार केल्यास देशातील 25 अब्जाधीश मुंबईत राहतात.

मुंबईतील अब्जाधिशांची संख्या 386 झाली आहे. मुंबईतील अब्जाधिशांच्या संख्येत यंदा 58 लोक वाढले आहेत. मुंबईनंतर अब्जाधिशांच्या संख्येत दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्लीत अब्जाधिशांची संख्या 18 ने वाढली आहे. दिल्लीत आता 217 अब्जाधिश आहे. महाराष्ट्रातील मुंबईनंतर पुणे शहरात सर्वाधिक अब्जाधिश आहे. पुण्यात अब्जाधिशांची संख्या 53 आहे. मुंबईत अब्जाधिशांची संख्या दरवर्षी वाढत आहे.

कोणत्या शहरात किती अब्जाधीश

  • मुंबई- 386
  • दिल्ली- 217
  • हैदराबाद- 104
  • बंगळूरु- 100
  • चेन्नई- 82
  • कोलकाता- 69
  • अहमदाबाद-67
  • पुणे- 53
  • सुरत- 28
  • गुरुग्राम- 23

हुरुन रिच लिस्टमध्ये मुंबईबाबत काय म्हटले

हुरुन रिच लिस्ट 2024 मध्ये म्हटले आहे की, मुंबई बीजिंगला मागे टाकत आशिया खंडातील अब्जाधिशांचे केंद्र झाला आहे. मुंबईतील अब्जाधिशांची एकूण संपत्ती 445 बिलियन डॉलर आहे. यापूर्वी सर्वात कमी वयाचे अब्जाधिश रेजरपेचे संस्थापक हर्षील माथुर आणि शशांक कुमार होते. त्यांचे वय 33 वर्ष आहे. परंतु आता या यादीत सर्वात युवा अब्जाधिश जेप्टोचे कैवल्य वोहरा आहे. त्यांचे वय 21 वर्ष आहे. जेप्टोचे सह-संस्थापक आदित पालीचा यांचे वय 22 वर्ष आहे. ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. कैवल्य वोहरा आणि आदित पालिचा यांनी संगणक शास्त्राची पदवी घेतली होती. परंतु गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून दिली. त्यानंतर त्यांनी अत्यावश्यक वस्तू घरपोच पोहचवण्याच्या व्यवसायात सुरु केली.  2021 मध्ये क्विक डिलिव्हरी ॲप झेप्टोची स्थापना केली.

यंदा 1990 च्या दशकात जन्मलेले 11 जण या यादीत आहेत. हुरुन रिचलिस्टने 1,000 कोटींची संपत्ती असणारे एकूण 1539 व्यक्ती असल्याचे म्हटले आहे.