AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संभाजीनगरात गरवारे स्टेडियमसाठी झाडांची कत्तल! वृक्षप्रेमींचा विरोध

संभाजीनगरात गरवारे स्टेडियमसाठी झाडांची कत्तल! वृक्षप्रेमींचा विरोध

| Updated on: Feb 28, 2026 | 12:03 PM
Share

छत्रपती संभाजीनगर येथील गरवारे स्टेडियमला आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम बनवण्यासाठी हजारो झाडे तोडण्याच्या निर्णयाला वृक्षप्रेमींनी तीव्र विरोध दर्शवला आहे. हे वृक्ष शहराचे ऑक्सिजन हब असून, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ती वाचवणे आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. वृक्षतोड झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरातील गरवारे स्टेडियमला आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या प्रकल्पासाठी अनेक जुनी झाडे तोडण्यात येणार असल्याने शहरातील वृक्षप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सिडको भागातील हे स्टेडियम विकसित करताना आजूबाजूची सुमारे ३० ते ४० वर्षांपूर्वीची झाडे तोडण्याची योजना आहे. या विरोधात वृक्षप्रेमींनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली आणि “झाडे वाचवा, झाडे लावा” अशा घोषणा दिल्या.

वृक्षप्रेमींच्या मते, ही झाडे केवळ पर्यावरणाचा समतोल राखत नाहीत, तर ती शहरातील “ऑक्सिजन हब” आहेत. हजारो नागरिक सकाळी या परिसरात फिरायला येतात आणि व्यायाम करतात. दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये वाढलेल्या प्रदूषणाचा दाखला देत, वृक्षतोड टाळून विकास करण्याची मागणी त्यांनी केली आहे. प्रशासनाने यावर पुनर्विचार करावा आणि पर्यावरणाचा विचार करूनच विकास प्रकल्प राबवावेत, अशी त्यांची स्पष्ट भूमिका आहे.

Published on: Feb 28, 2026 12:03 PM
Follow Us