AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट, ‘या’ देशातून येतोय पैसा… कसा होतो व्यवहार? जाणून घ्या सर्वकाही

बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शक याच्या घारावर गोळीबार झाल्यानंतर एकामागून एक धक्कादायक खुलासे होत आहेत. आता गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. कोणत्या देशातून गुंडांना पैसे पुरवले याबद्दल मोठी माहिती समोर येत आहे .

रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट, 'या' देशातून येतोय पैसा... कसा होतो व्यवहार? जाणून घ्या सर्वकाही
Rohit Shetty
| Updated on: Feb 28, 2026 | 12:07 PM
Share

बॉलिवूड निर्माता रोहित शेट्टी याच्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या तपासात महत्वाची माहिती समोर आली आहे. असे कृत्य करण्यासाठी पैसे कुठून येतात आणि ते गुडांपर्यंत कसे पोहोचवले जातात याबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. तपासात असं दिसून आलं आहे की, गोळीबार करणाऱ्यांना एटीएम व्यवहारांद्वारे पैसे देण्यात आले आहेत. त्याच बरोबर नेपाळमधून निधी पुरविण्यात आल्याची महत्वाची माहिती देखील समोर येत आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या प्राथमिक तपासात गोळीबार करणाऱ्यांना नेपाळमधून पैसे देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. ही रक्कम थेट बँकेत जमा करण्यात आली होती. ज्यामध्ये एटीएमद्वारे व्यवहार करण्यात आले… हे पैसे एका अज्ञात व्यक्तीमार्फत आरोपींच्या खात्यात जमा झाल्याचं कळत आहे. पोलिस त्यांच्या बँक तपशीलांची चौकशी करत आहेत.

गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, या व्यवहाराचा संबंध नेपाळशी असल्याचं आढळून आलं आहे. या प्रकरणात आग्र्यात अटक केलेल्या आरोपींना वारंवार निधी मिळत असल्याचं देखील तपासात समोर आले आहे. गुन्हे शाखेने चौकशीसाठी संबंधित बँकांना पत्र पाठवत आरीपींच्या बँक खात्याची माहिती मागितली आहे. यामध्ये बँक स्टेटमेंट, ट्रांजॅक्शन हिस्ट्री आणि रक्कम जमा करणाऱ्या व्यक्तीबद्दल विचारणात आलं आहे… या प्रकरणात बाहेरील दहशतवादी शक्तींचाही सहभाग असू शकतो, असा पोलिसांना संशय आहे.

12 आरोपी अटक

रोहित शेट्टीच्या जुहू येथील बंगल्यावर काही हल्लेखोरांनी अचानक गोळीबार केला. यामध्ये कोणाला दुखापत झाली नाही. याप्रकरणी पोलिसांनी 12 आरोपींना अटक केली आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान आणि हरियाणा येथून आरोपींना अटक करण्यात आली आहे. सध्या पोलीस याप्रकरणी कसून चौकशी करत आहेत.   गुंड लॉरेन्स बिष्णोईचा निकटवर्तीय आरजू बिष्णोई याने साथीदारांशी संगनमत करून गोळीबार केला होता. गोळीबाराच्या घटनेनंतर बिष्णोईने सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप पोस्ट करत जबाबदारी स्वीकारली होती.

रोहित शेट्टी याच्यानंतर अभिनेता रणवीर सिंग आणि आभिनेता आयुष शर्मा यांना देखील धमकी देण्यात आली. अशा सतत मिळणाऱ्या धमक्या आणि गोळीबार प्ररणामुळे बॉलिवूडमध्ये दहशतीचं वातावरण आहे. सांगायचं झालं तर, गेल्याा वर्षी अभिनेता सलमान खान याच्यावर वांद्रे येेथील घरावर देखील गोळीबार करण्यात आला. एवढंच नाही तर, भाईजानला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या देखील देण्यात आल्या आहेत.

Follow Us
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क...
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क....
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह...
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह....
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं.
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका.
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च.
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात.
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह.
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र.
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका.
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा.