AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RCB vs MI : तिलक-नमनची निर्णायक खेळी, आरसीबीसमोर 167 धावांचं आव्हान, मुंबई जिंकणार?

Royal Challengers Bengaluru vs Mumbai Indians, 1st Innings Highlights : मुंबई इंडियन्सला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचवण्यात नमन धीर आणि तिलक वर्मा या जोडीने प्रमुख योगदान दिलं. जाणून घ्या दोघांनी किती धावा जोडल्या.

RCB vs MI : तिलक-नमनची निर्णायक खेळी, आरसीबीसमोर 167 धावांचं आव्हान, मुंबई जिंकणार?
Tilak Varma and Naman DhirImage Credit source: IPL X Account
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: May 10, 2026 | 11:02 PM
Share

तिलक वर्मा आणि नमन धीर या दोघांचा अपवाद वगळता मुंबई इंडियन्सच्या प्रमुख फलंदाजांनी पुन्हा एकदा घोर निराशा केली आहे. मुंबई इंडियन्स आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 54 व्या सामन्यात मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरली आहे. मुंबईने आरसीबीसमोर 167 धावांचं आव्हान ठेवलं आहे. मुंबईला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 166 धावांपर्यंतच मजल मारता आली. मुंबईसाठी तिलक वर्मा आणि नमन धीर या दोघांनी सर्वाधिक धावांचं योगदान देता आलं. तर इतर प्रमुख फलंदाजांनी आरसीबीच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. मुंबईला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखण्यात भुवनेश्वर कुमार याने प्रमुख भूमिका बजावली. त्यामुळे आता आरसीबी विजयी आव्हान पूर्ण करत प्लेऑफचा दावा आणखी मजबूत करणार की मुंबई गेल्या पराभवाची परतफेड करणार? याचं उत्तर हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

मुंबईची बॅटिंग

आरसीबीचा कॅप्टन रजत पाटीदार याने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मुंबईच्या पहिल्या 7 पैकी दोघांचा अपवाद वगळता इतर 5 फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली. मात्र तिलक वर्मा आणि नमन धीर या दोघांचा अपवाद वगळता इतरांना काही करता आलं नाही. रायन रिकेल्टन याने निराशा केली. रायनने 2 धावा केल्या. तर सूर्यकुमार यादव याला भोपळाही फोडता आला नाही. रोहित शर्मा चांगला खेळत होता. मात्र रोहितच्या खेळीचा शेवट झाला. रोहितने 10 बॉलमध्ये 22 रन्स केल्या.

नमन-तिलकची निर्णायक भागीदारी

त्यानंतर नमन धीर आणि तिलक वर्मा या दोघांनी 50+ पार्टनरशीप करुन मुंबईला 150 पार पोहचवण्यात प्रमुख योगदान दिलं. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 57 बॉलमध्ये 82 रन्स जोडल्या. नमन धीर आऊट होताच ही जोडी फुटली. नमनने 32 बॉलमध्ये 47 रन्स केल्या. नमनचं अर्धशतक अवघ्या 3 धावेने हुकलं. मात्र तिलक वर्माने अर्धशतक झळकावलं. मात्र तिलकला अर्धशतकानंतर फार धावा करता आल्या नाहीत. तिलकने सर्वाधिक 57 धावा जोडल्या. तिलकने या खेळीत 42 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 3 फोर लगावले.

लाईव्ह स्कोअरकार्ड

विल जॅक्स याने 10 धावा जोडल्या. तर राज बावा याने 16 रन्स केल्या. तर कॉर्बिन बॉश आणि दीपक चाहर हे दोघे नॉट आऊट परतले. कॉर्बिनने 5 तर दीपकने 1 धाव जोडली. आरसीबीकडून भुवनेश्वर कुमार याने सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या. तर जोश हेझलवूड, रसीख सलाम डार आणि रोमरिया शेफर्ड या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...