AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

असं एक शहर जिथे भरतो वधू वरांचा बाजार, भाजीपाल्याच्या दराप्रमाणे अडकवले जातात बायोडाटा

इंटरनेटच्या युगात देखील अजूनही असं एक शहर आहे, जिथे वधू वरांचा बाजार भरतो असं तुम्हाला कोणी सांगितलं? तर तुम्ही त्यावर विश्वास ठेवणार नाही, मात्र हे खरं आहे. इथे भाजी-पाल्याच्या दराप्रमाणे वधू वराचे बायोडेटा अडकवले जातात.

असं एक शहर जिथे भरतो वधू वरांचा बाजार, भाजीपाल्याच्या दराप्रमाणे अडकवले जातात बायोडाटा
marriageImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 10, 2026 | 10:06 PM
Share

सध्याचं युग हे इंटरनेटचं युग आहे. कम्युनिकेशन प्रचंड फास्ट झालं आहे. नव्या युगामध्ये डेटिंग अ‍ॅपचा देखील सुळसुळाट झाला आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये आता अशाच अ‍ॅपच्यामाध्यमातून तरुण तरुणींची ओळख होते, आणि त्यानंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात होतं. पुढे अनेकजण लग्न देखील करतात. अशा अ‍ॅपच्या माध्यातून जग प्रचंड जवळ आलं आहे. काही अ‍ॅप तर फक्त लग्न जमवण्याच्या उद्देशानेच विकसीत करण्यात आल्या आहेत. मात्र या डेटिंग अ‍ॅपचे जसे काही फायदे आहेत, तसे अनेक तोटे देखील आहेत. अनेकदा वधु वरांनी एकमेकांना पाहिलं नसतं, त्यामुळे फसवणुकीची मोठी शक्यता असते. काही तर लग्न जमावं यासाठी अशा डेटिंग अ‍ॅपवर आपली खोटी माहिती देखील टाकतात. मात्र या इंटरनेटच्या युगात देखील अजूनही असा एक देश आहे, जिथे वधू वरांचा बाजार भरतो असं तुम्हाला कोणी सांगितलं? तर तुम्ही त्यावर विश्वास ठेवणार नाही, मात्र हे खरं आहे.

चीनमधील शांघाय शहरात आजही वधू वरांचा बाजार भरतो, शांघायमधील वधू वरांचा बाजार चीनमध्ये खूप प्रसिद्ध आहे. या बाजारामध्ये शक्यतो ज्यांना लग्न करायचं आहे, ते वधू वर येत नाहीत, तर त्यांचे आई-वडील, आजी -आजोबा किंवा इतर नातेवाईक येतात. ते आपल्या मुलीसाठी किंवा मुलासाठी सुटेबल अशा वधू किंवा वराची निवड करतात. ते यावेळी येताना आपल्यासोबत बायडाटा देखील घेऊन येतात. या बायोटेडामध्ये संबंधित वधू किंवा वराची संपूर्ण माहिती असते जसं की त्याचं वय, नोकरी, त्याच्या नावावर किती संपत्ती आहे, या सर्व गोष्टी असतात.

या बाजारात वधू किंवा वराचे आई-वडील हे बाजारात एका मोठ्या छत्री खाली बसलेले असतात, ज्याप्रमाणे बाजारात गेल्यानंतर आपल्याला संबंधित भाज्याचे दरफलक लावलेले दिसतात त्याचप्रमाणे वधू किंवा वराचे आई वडील आपल्या मुलाचा किंवा मुलीचा बायोडाटा हा छत्रीवर लावतात. किंवा जमिनीवर ठेवतात. जर एखाद्या व्यक्तीला हा बायोडेटा आवडला तर त्यानंतर लग्नाची पुढील बोलणी केली जातात.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?