सावरकरांसारखाचं मी एकांतात राहिलो, संजय राऊत यांचा राज ठाकरे यांना टोला

| Updated on: Nov 10, 2022 | 6:21 PM

मी तुरुंगात शंभर दिवस राहिलो. तिथं एक-एक तास हा शंभर दिवसासारखा असतो.

सावरकरांसारखाचं मी एकांतात राहिलो, संजय राऊत यांचा राज ठाकरे यांना टोला
संजय राऊत यांचा राज ठाकरे यांना टोला
Image Credit source: tv 9
Follow us on

मुंबई : एकांतातला काळा आपण सत्कारणी लावला, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊथ यांनी एकप्रकारे राज ठाकरे यांनी हा टोला लगावलाय. सावरकरांसारखाच मी एकांतात राहिलो, असं संजय राऊत म्हणाले. संजय राऊत यांनी एकांतात राहायची सवय लावून घ्यावी. एकांतात बोलण्याची सवय लावून घ्यावी, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्याला राऊत यांनी उत्तर दिलंय.

संजय राऊत म्हणाले, आमचे मित्र, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी एका भाषणात म्हटलं होतं, संजय राऊत यांना ईडीकडून अटक होईल. आता एकांकात स्वतःशीच बोलण्याची प्राक्टिस करावी, असं म्हटलं होतं. मला त्यांना सांगायचं आहे. हो मला ईडीनं अटक केली. ती बेकायदेशीर होती, असं कोर्टाचं म्हणणं आहे. राजकारणामध्ये शत्रूच्या संदर्भातही अशा प्रकारच्या भावना व्यक्त करू नये की तो तुरुंगात जावा.

संजय राऊत म्हणाले, एकांतवास खडतर असतो. मी तुरुंगात हा विचार करत होतो की, दहा-बारा वर्षै सावरकर कसे राहिले. लोकमान्य टिळक मंडालेत कसे राहिले. आणीबाणीच्या काळात इतर बंदी कसे राहिले.

वर्षोनुवर्षे लोकं राहत असतात. मी शंभर दिवस राहिलो. तिथं एक-एक तास हा शंभर दिवसासारखा असतो. अशाही परिस्थितीत या देशातल्या राजकीय कैद्यांना राहावं लागतं. मी स्वतःला युद्धकैदी मानत होतो, असंही संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितलं.

तुरुंगातील अनुभव मी लिहिलेत. मी लिहिणारा माणूस आहे. दोन पुस्तकं मी तयार केलीत. मी तुरुंगात असताना वाचण्याचा प्रयत्न करत होतो.
जे जे मी वाचलं. पुस्तकातल्या महत्त्वाच्या गोष्टी मी डायरीत लिहिलं. त्याचं पुस्तक काढावं, असं मला वाटतं, असंही संजय राऊत म्हणाले.