जीएसटीचा परतावा आणि महाराष्ट्राला केंद्राकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करेन: आठवले

| Updated on: May 31, 2021 | 4:48 PM

आता जवळ नसलो तरी विकासासाठी आम्ही एकत्र यायला पाहिजे, असे मतही रामदास आठवले यांनी व्यक्त केले. | Ramdas Athawale

जीएसटीचा परतावा आणि महाराष्ट्राला केंद्राकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करेन: आठवले
रामदास आठवले, केंद्रीय मंत्री
Follow us on

मुंबई: केंद्र सरकारकडे असलेली महाराष्ट्राची जीएसटी थकबाकी आणि मुंबईला जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी मी स्वत: प्रयत्न करणार असल्याचे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. एमएमआरडीएच्या परिसरात उद्धव ठाकरेंचा ‘मातोश्री’ आणि माझा ‘संविधान’ बंगला आहे. आम्ही जवळ राहणारे आहोत. आता जवळ नसलो तरी विकासासाठी आम्ही एकत्र यायला पाहिजे, असे मतही रामदास आठवले यांनी व्यक्त केले. (Union minister Ramdas Athawale Inauguration ceremony of Mumbai Metro 2A & 7 corridors)

मुंबईतील मेट्रोच्या 2 ए आणि 7 या दोन मार्गिकांचे सोमवारी उद्घाटन झाले. या कार्यक्रमात रामदास आठवले यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांनी म्हटले की, केंद्राच्यावतीने मुंबईला जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी मी मदत करणार आहे. मुंबईतून देशाला खूप उत्पन्न मिळते. मुंबईतील गर्दी पाहता मेट्रोचे जाळे उभे राहिल्यास लोकल सेवेवरील ताण कमी होईल. अनेक ठिकाणी रस्ते आणि उड्डाणपुलांचे काम सुरु आहे. ही कामं पूर्ण झाल्यानंतर मुंबईतील वाहतूक कोंडी कमी व्हायला मदत होईल, असे रामदास आठवले यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी केंद्र सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत. केंद्रात पाठपुरावा करुन मी त्या पूर्ण करुन घेईन. तर जीएसटीचा परतावा हा महाराष्ट्राला टप्याटप्प्याने मिळेल, असे रामदास आठवले यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

दिल्लीत जाऊन मोदींना फक्त एवढं सांगा, अजित पवारांची रामदास आठवलेंना विनंती

मुक्त संचार केला तर निर्बंध अधिक कडक करणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मुंबईकरांना इशारा

मुंबईत मेट्रोच्या चाचणीला सुरुवात, मानापमान नाट्य आणि भाजपच्या निदर्शनाने गोंधळ

(Union minister Ramdas Athawale Inauguration ceremony of Mumbai Metro 2A & 7 corridors)