मुंबईत मेट्रोच्या चाचणीला सुरुवात, मानापमान नाट्य आणि भाजपच्या निदर्शनाने गोंधळ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मेट्रोच्या 2 ए आणि 7 या मार्गिकेच्या चाचणीला हिरवा झेंडा दाखवला. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास सोपा आणि सुस्साट होणार आहे. (CM Uddhav Thackeray flags off trial run for Mumbai Metro 2A & 7 corridors)

मुंबईत मेट्रोच्या चाचणीला सुरुवात, मानापमान नाट्य आणि भाजपच्या निदर्शनाने गोंधळ
CM Uddhav Thackeray
Follow us
| Updated on: May 31, 2021 | 2:17 PM

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मेट्रोच्या 2 ए आणि 7 या मार्गिकेच्या चाचणीला हिरवा झेंडा दाखवला. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास सोपा आणि सुस्साट होणार आहे. मात्र, कार्यक्रम पत्रिकेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं नाव नसल्याने मानापमान नाट्य रंगलं. भाजपने कार्यक्रम स्थळी निषेधाच्या घोषणा देत जोरदार निदर्शने केली. त्यामुळे या परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. (CM Uddhav Thackeray flags off trial run for Mumbai Metro 2A & 7 corridors)

आकुर्ली स्टेशन येथे मेट्रोच्या 2 ए आणि 7 या मार्गिकेच्या चाचण्यांचा शुभारंभ झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, महापौर किशोरी पेडणेकर आणि पर्यावरण मंत्री अजित पवार यांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला. त्याशिवाय शिवाय टी 1 आणि टी 2 ला जोडण्यासाठी अंडरपास व एलिव्हेटेड रस्ते करण्यासाठी भूमीपूजनही करण्यात आलं. येत्या ऑक्टोबर महिन्यात मेट्रोचा हा पहिला टप्पा सुरु होईल, असं एमएमआरडीएकडून सांगण्यात आलं.

भाजपची निदर्शने

दरम्यान, भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी आकुर्ली स्थानकाबाहेर जोरदार निदर्शने केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रोची वाट लावल्याचा आरोप करत भाजपने ही निदर्शने केली. यावेळी भाजपने मुख्यमंत्र्यांना काळे झेंडेही दाखवले. दरम्यान, भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ वाढल्याने पोलिसांनी भातखळकरांसह काही भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

मानापमान नाट्य

दरम्यान, मेट्रोच्या 2 ए आणि 7 या मार्गिकेच्या चाचण्यांच्या शुभारंभाच्या या कार्यक्रम पत्रिकेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं नाव नसल्याने मानापमान नाट्य रंगलं. भाजपने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत आघाडी सरकार हेकेखोर असल्याचा आरोप भाजपने केला आहे. विरोधी पक्षनेत्याला कार्यक्रमाला न बोलावणं हा संसदीय परंपरेचा अपमान आहे. त्याचा आम्ही निषेध करतो, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. (CM Uddhav Thackeray flags off trial run for Mumbai Metro 2A & 7 corridors)

संबंधित बातम्या:

Maharashtra News LIVE Update | देवेंद्र फडणवीस यांनी घेतली शरद पवार यांची भेट

Maharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण? कुठे निर्बंध?

Break the chain : लॉकडाऊनमध्ये काय सुरु काय बंद? तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं

(CM Uddhav Thackeray flags off trial run for Mumbai Metro 2A & 7 corridors)

Non Stop LIVE Update
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.