Maharashtra News LIVE Update | राष्ट्रवादीचे रविराज तावरे यांच्यावरील गोळीबार प्रकरण, पुण्याचे पोलीस अधिक्षक हॉस्पिटलला दाखल

| Updated on: May 31, 2021 | 11:18 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | राष्ट्रवादीचे रविराज तावरे यांच्यावरील गोळीबार प्रकरण, पुण्याचे पोलीस अधिक्षक हॉस्पिटलला दाखल
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 31 May 2021 10:27 PM (IST)

    राष्ट्रवादीचे रविराज तावरे यांच्यावरील गोळीबार प्रकरण, पुण्याचे पोलीस अधिक्षक हॉस्पिटलला दाखल

    बारामती : राष्ट्रवादीचे रविराज तावरे यांच्यावरील गोळीबार प्रकरण.. – पुण्याचे पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख बारामती हॉस्पिटलला दाखल – गोळीबाराच्या घटनेबद्दल घेणार माहिती

  • 31 May 2021 09:34 PM (IST)

    मावळमध्ये तळेगांव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्याम पोशेट्टी यांना 9 लाखांची लाच मागितल्या प्रकरणी अटक

    मावळ (पुणे) :

    -तळेगांव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्याम पोशेट्टी यांना 9 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी अटक तर उद्यान अधीक्षक विशाल अंकुश मिंड फरार

    – तक्रारदार यांच्या कंपनीस तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत काम मिळाले होते हे काम पूर्ण झाल्यानंतर कामाच्या बिलाची रक्कम राधा करण्यासाठी मुख्य अधिकारी व उद्यान पर्यवेक्षक यांनी नऊ लाख रुपये लाचेची मागणी केली

    -या प्रकरणी तळेगाव दाभाडे नगरपरिषद मुख्य अधिकारी श्याम पोशेट्टी व विशाल अंकुश मिंड यांच्यावर तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

  • 31 May 2021 08:34 PM (IST)

    संभाजीराजेंवर पाळत ठेवण्याचा किंवा हेरगिरी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

    संभाजीराजेंवर पाळत ठेवण्याचा किंवा हेरगिरी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ते राज्यभर करत असलेल्या दौऱ्यांदरम्यान कोणतीही सामाजिक अपप्रवृत्ती त्यांच्या कार्यक्रमात विघ्न आणू नये म्हणून पुरेसा बंदोबस्त सिंधुदुर्ग दौऱ्यात नेमण्यात आला होता.यासंदर्भात माझी संभाजी राजेंशी चर्चा झालेली आहे आणि त्यांचा गैरसमज पूर्णपणे दूर झालेला आहे, असा खुलासा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केला.

  • 31 May 2021 08:02 PM (IST)

    महाराष्ट्राला दिलासा, दिवसभरात 15 हजार 77 नवे कोरोनाबाधित, 33 हजार रुग्णांची कोरोनावर मात

    राज्यात दिवसभरात 15 हजार 77 नवे कोरोनाबाधित, 184 कोरोनाबाधितांचा मृत्यू, तर 33 हजार रुग्णांची कोरोनावर मात

  • 31 May 2021 07:49 PM (IST)

    बारामती तालुक्यात जिल्हापरिषद सदस्याच्या पतीवर गोळीबार

    बारामती : तालुक्यातील माळेगाव या ठिकाणी जिल्हापरिषद सदस्याच्या पतीवर गोळीबार

    रविराज तावरे असं जखमी व्यक्तीचे नाव

    रविराज तावरे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य रोहिणी तावरे यांचे पती

    बारामती तालुक्यातील माळेगाव या ठिकाणी झाला गोळीबार

    गोळीबार का केला याचा तपास पोलीस करीत आहेत

    रविराज तावरे यांच्या पोटात गोळी लागल्याची प्राथमिक माहिती

    रविराज तावरे यांना बारामतीतील बारामती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलंय

  • 31 May 2021 07:47 PM (IST)

    विरारमधील बांधकाम व्यावसायिक मयुरेश राऊत यांच्यावर गुन्हा दाखल

    विरार : बोगस सीसीच्या आधारे इमारत उभी करुन ती ग्राहकांना विकून फसवणूक केल्या प्रकरणी विरारमधील बांधकाम व्यावसायिक मयुरेश राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    फसवणूक आणि बनावट कागदपत्र तयार केल्याप्रकरणी नालासोपराच्या तुलिंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

    माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह, निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा आणि पोलीस निरीक्षक राजकुमार कोथिंबरे यांच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी अँटी करप्शन ब्युरो कडे तक्रार करणारे विरारचे बांधकाम व्यवसायिक मयुरेश राऊत यांच्यावरच गुन्हा दाखल झाल्याने परिसरात खळबळ

    नालासोपारा पूर्वेकडे विजय नगर येथे प्रभाकर भुवन नावाची चार मजली इमारत बांधून तिला सिडकोची बोगस बांधकाम परवानगी वापरून ती खरी असल्याचे भासवल्याचा त्यांच्यावर आरोप करण्याता आलाय.

    पालिकेचे अधिकारी अक्षय मोखर यांनी मेसर्स प्रतिभा इंटरप्रायजेसचे प्रोपायटर मयुरेश राउतवर गुन्हा दाखल केला आहे.

    याप्रकरणी अद्याप राउतला अटक करण्यात आली नाही.

  • 31 May 2021 07:37 PM (IST)

    जालन्यात वादग्रस्त पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांचे निलंबन

    जालना:  कदीम पोलीस स्टेशनचे वादग्रस्त पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. भाजपा युवा मोर्चाचे शिवराज नारीलवाले मारहाण प्रकरणी औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी हे निलंबन केले आहे. या अगोदर पाच पोलीस पोलीस कर्मचाऱ्यांचे जालना जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी निलंबन केले होते. प्रशांत महाजन यांची विभागीय चौकशी झाल्या नंतर हे निलंबन करण्यात आले आहे.

  • 31 May 2021 07:19 PM (IST)

    ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने नीरज आणि केशव यांची सलग दुसर्‍या दिवशी केली चौकशी

    मुंबई : अभिनेता सुशांत सिंह मृत्यूनंतर समोर आलेल्या ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने नीरज आणि केशव यांची सलग दुसर्‍या दिवशी केली चौकशी

    या वेळी एनसीबीच्या पथकाने या दोघांनाही मुंबईच्या काही महत्त्वाच्या ठिकाणी घेऊन जाऊन केली चौकशी

    मात्र एनसीबीने सदर ठिकाणाबाबत खुलासा करण्यास  टाळाटाळ केली आहे

    या आठवड्यात सुशांत ड्रग्स प्रकरणात एनसीबीने आणखी काही लोकांना बोलावून चौकशी करण्याची केली आहे

  • 31 May 2021 06:33 PM (IST)

    कल्याणमध्ये दुर्गाडी खाडीवरील पुलाच्या दोन लेनचे एकनाथ शिंदेच्या हस्ते लोकार्पण, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

    कल्याण : दुर्गाडी खाडीवरील पुलाच्या दोन लेनचे ऑनलाईन लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडल्यावर पुलाजवळ झालेल्या लोकार्पण कार्यक्रमात पालकमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहिले. दोन लेन सुरु झाल्यानंतर वाहतूक कोंडीच्या त्रसातून नागरिकांची मुक्तता होणार आहे. उर्वरित चार लेनचे कामही लवकर पूर्ण होणार आहे. एकूण आठ लेन झाल्यावर वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे, असे यावेळी पालकमंत्र्यांनी सांगितले. मात्र या कार्यक्रमात चांगलीच गर्दी झाली होती. याेवळी पोलीस अधिकाऱ्याने सोशल डिस्टन्सिंगचे  पालन करा असे आवाहन करुनदेखील शिवसेना तसेच भाजप कार्यकर्त्यांनी तोबा गर्दी केली होती. यावेळी सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडाला होता.

  • 31 May 2021 06:22 PM (IST)

    मराठा समाजाला आरक्षण द्या, पण ओबीसी आरक्षणाला अजिबात धक्का नको : पंकजा मुंडे

    औरंगाबाद : ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाचा निर्णय आपल्यासाठी धक्कादायक

    या सरकारला ओबीसींची बाजू मांडायचीच नाही हा माझा दावा आहे, मागच्या सरकारमध्ये आम्ही अभ्यासगट स्थापन करुन आरक्षण कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केलं.. आम्ही अध्यादेश काढून कोर्टात सादर केला..

    हे सरकार आल्यानंतर १५ महिन्यात काही केलं नाही.. या सरकारने कोर्टात मान्य केलं ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण आहे... इथेच सर्व गमावलं..

    मराठा आरक्षण असो वा ओबीसी आरक्षण असो सरकार फेल ठरलं..

    सरकार आणि कॅबिनेट शक्तीशाली असतं, अजूनही ओबीसी आरक्षणाचा मार्ग काढू शकता... मागास आयोग नेमून ओबीसी आरक्षण अबाधित ठेवू शकता...

    कॅबिनेटमध्ये उपसमिती स्थापन करुन हा निर्णय घेण्याची गरज आहे.

    ओबीसींची जनगणना हा मुद्दा वेगळा आहे.. इथे इम्पेरिअल डाटा आवश्यक

    असं नाही झालं तर या महाराष्ट्रात निवडणुका होऊ देण्याची मानसिकता नाही, आम्ही निवडणुका होऊ देणार नाही

    जे वंचित पीडित आहेत, ज्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केले, त्यांच्यासमोर आज प्रश्नचिन्ह आहे..

    सरकारच्या मानसिकतेबद्दल प्रश्नचिन्ह आहे, आता सरकार अपयशी ठरलं तर सरकारची इच्छा नाही हे स्पष्ट होतं.. आिम्ही स्वस्थ बसणार नाही, आवाज उठवू

    ओबीसी आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे, ओबीसी आरक्षणासाठी उपसमितीची स्थापना करावी ही माझी मागणी आहे.

    मी मुख्यमंत्र्यांना भेटणार यात वाद नाही, पण एक दोन माणसांनी भेटून उपयोग नाही. पण त्यासाठी उपसमितीची स्थापना करणे आवश्यक. मी मुख्यमंत्र्यांना भेटेन, पंतप्रधानांना भेटेन.

  • 31 May 2021 06:10 PM (IST)

    राज्य सरकारची माझ्यावर हेरगिरी, संभाजीराजेंचा आरोप

    मुंबई : राज्य सरकार हेरगिरी करत असल्याचा संभाजीराजेंना संशय

    "माझ्यासारख्या प्रामाणिक आणि सरळ माणसाची हेरगिरी करून काय मिळणार ?"

    "राज्य सरकाचं इंटेलिजन्स विभाग हेरगिरी करत असल्याचा संशय"

    ट्टवीट करून छत्रपती संभाजीराजेंनी दिली माहिती

  • 31 May 2021 05:11 PM (IST)

    अकोला शहरातल्या अकोट फैल परिसरात दोन गोडाऊनला भीषण आग

    अकोला शहरातल्या अकोट फैल परिसरातील दोन गोडाऊनला भीषण आग

    या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे

    फर्निचर आणि वेस्टेज पॉलिथिनचे हे गोडाऊन होते

    लॉकडाऊन असल्यामुळे हे दोन्ही गोडाऊन बंद होते

    त्यामुळे यात कोणतीही जीवितहानी झाली नाही

    आज दुपारच्या सुमारास अचानक या दोन्ही गोडाऊनमधून धूर येताना नागरिकांना दिसले

    नागरिकांनी लगेच अग्निशमन विभागाला माहिती दिली

    अग्निशमन विभागाने लगेच आगीवर नियंत्रण मिळवले

    या आगीत 40 ते 45 लाखाचं नुकसान झाल्याची माहिती गोडाऊन मालक साजित खान यांनी दिली आहे

  • 31 May 2021 04:48 PM (IST)

    पनवेलमध्ये प्रेयसीला इंजेक्शन देऊन खून करणाऱ्या प्रियकरास अटक

    पनवेल : प्रेयसीला केटामाईन इंजेक्शन देऊन खून करणाऱ्या प्रियकरास अटक

    लग्नाचा तगादा लावणाऱ्या प्रेयसीला इंजेक्शन देऊन संपवले

    पनवेलच्या कोपर कोली गावाच्या दत्त मंदिराजवळ सापडला होता अज्ञात मृतदेह

    भावाने ओळखला बहिणीचा मृतदेह

    वॉर्डबॉय प्रियकराला पनवेल शहर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

    पटेल हॉस्पिटलमध्ये काम करत होता प्रियकर

    आरोपी प्रियकराला 5 जून पर्यंत कोठडी

  • 31 May 2021 04:13 PM (IST)

    विकासकामांमध्ये राजकारण करू नये, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे विरोधकांना आवाहन

    मुंबई - लोकांच्या हितासाठी काम सुरु आहेत, विकासकामांमध्ये राजकारण करू नये

    नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे विरोधकांना आवाहन

    - EWS आरक्षण आधीपासून होतं. SEBC आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवल्याने EWS चं जे आरक्षण आहे ते मराठा समाजाला मिळायला पाहिजे.

    - जे आरक्षण यापूर्वी मिळले होते ते मिळावे यासाठी राज्य सरकार प्रामाणिक प्रयत्न करत आहे. मराठा, obc आरक्षण मुद्दा निकाली निघेल तोपर्यंत प्रयत्न हे सरकार प्रयत्न करेल. त्याचे कोणीही राजकारण करु नये.

    महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचं षडयंत्र सुरु आहे, मंत्री अनिल परब यांच्याविरोधात कोणतेही पुरावे नाहीत

  • 31 May 2021 03:37 PM (IST)

    आमदार महेश लांडगे यांच्या विवाह सोहळ्याप्रसंगी कोरोना नियमांचे उल्लंघन ?

    पिंपरी चिंचवड : आमदार महेश लांडगे यांच्या विवाह सोहळ्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमामधील आणखी एक व्हिडिओ समोर

    - या व्हिडिओमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी सुनील बेळगावकर हे आमदार लांडगे यांच्यासोबत नृत्य करत असल्याचे दिसत आहे.

    -कोरोनाचे नियम पाळावेत यासाठी ज्या महापालिकेनं जनजागृती करणं गरजेचं असतं त्याच महानगरपालिकेचे अधिकारी स्वतः नियमांना तिलांजली देत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसतंय.

    - महापालिका मात्र तक्रार आल्यानंतर कारवाई करू अशी पळवाट शोधत आहे.

    पण सर्वसामान्यांवर मात्र कोणाच्या नियमाची पायमल्ली केल्यानंतर सर्रासपणे कारवाई केली जात आहे.

    मग लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिका अधिकारी यांच्याबाबत उदासीनता का? असा सवाल नागरिकांकडून विचारला जातोय.

  • 31 May 2021 03:23 PM (IST)

    वाशिम जिल्ह्याच्या रिसोड शहरात जोरदार पाऊस 

    वाशिम : वाशिम जिल्ह्याच्या रिसोड शहरात जोरदार पाऊस

    पावसामुळे जनजीवन विस्कळीत, अनेक ठिकाणी पाणी साचले

  • 31 May 2021 01:40 PM (IST)

    मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध कामांचं उद्घाटन मेट्रोच्या 2 ए आणि 7 या मार्गिकेच्या चाचण्यांचा शुभारंभ

    मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध कामांचं उद्घाटन मेट्रोच्या 2 ए आणि 7 या मार्गिकेच्या चाचण्यांचा शुभारंभ

    शिवाय टी 1 आणि टी 2 ला जोडण्यासाठी अंडरपास आणि एलिव्हेटेड रस्ते करण्यासाठी भूमीपूजनही केलं.

    ठाणे जिल्ह्यातील भिवंडी कल्याण रो वरील रजनोली उड्डाणपुलाचं आणि दुर्गडी उड्डाणपुलाच्या एका मार्गिकेचे ऑनलाईन उदघाटन

    या ठाणे जिल्ह्यातील प्रोजेक्टमुळे नव्या रोड कंनेक्टिविटी रजनोली आणि दुर्गडी उड्डाणपुलामुळे प्रवाशांची वाहतूक कोंडीपासून सुटका होणार आहे.

  • 31 May 2021 01:40 PM (IST)

    मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मेट्रोच्या 2 ए आणि 7 या मार्गिकेच्या चाचण्यांचा शुभारंभ

    मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध कामांचं उद्घाटन मेट्रोच्या 2 ए आणि 7 या मार्गिकेच्या चाचण्यांचा शुभारंभ

    शिवाय टी 1 आणि टी 2 ला जोडण्यासाठी अंडरपास आणि एलिव्हेटेड रस्ते करण्यासाठी भूमीपूजनही केलं.

    ठाणे जिल्ह्यातील भिवंडी कल्याण रो वरील रजनोली उड्डाणपुलाचं आणि दुर्गडी उड्डाणपुलाच्या एका मार्गिकेचे ऑनलाईन उदघाटन

    या ठाणे जिल्ह्यातील प्रोजेक्टमुळे नव्या रोड कंनेक्टिविटी रजनोली आणि दुर्गडी उड्डाणपुलामुळे प्रवाशांची वाहतूक कोंडीपासून सुटका होणार आहे.

  • 31 May 2021 01:28 PM (IST)

    मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची सुरुवात बीडमधून होणार, सगळ्या मराठा संघटना सहभागी होणार - तुषार काकडे

    पुणे,

    मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची सुरुवात बीडमधून होणार,

    सगळ्या मराठा संघटना आंदोलनात सहभागी होणार,

    5 जूनला निघणार बीडमधून मोर्चा

    परवानगी नाकारली तरी मोर्चा होणार,

    बीड जिल्हा मराठा क्रांती संघर्ष मोर्चानं याचं आयोजन केलंय,

    राज्य सरकारने पुर्नविचार याचिका दाखल केलेली नाहीये,राज्य सरकारला अल्टीमेटम देऊनही सरकारने दखल घेतली नाही,

    शिवसंग्रामचे नेते विनायक मेटेंच्या नेतृत्वात निघणार मोर्चा,

    तर इतर जिल्ह्यातील कार्यकर्ते ऑनलाईन पद्धतीने होणार सहभागी,

    शिवसंग्रामचे प्रदेश प्रवक्ता तुषार काकडेंची पत्रकार परिषदेत माहिती

  • 31 May 2021 01:21 PM (IST)

    देवेंद्र फडणवीस यांनी घेतली शरद पवार यांची भेट

    देवेंद्र फडणवीस यांनी घेतली शरद पवार यांची भेट मुंबई येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली फडवणीस य़ांची ट्वीट करुन दिली माहिती

  • 31 May 2021 12:31 PM (IST)

    भिवंडी शहरात पावसाला सुरुवात, हवेत गारवा

    भिवंडी शहरात पावसाला सुरवात,

    सकाळ पासून उष्णता असल्याने पावसाने हवेत गारवा

  • 31 May 2021 12:13 PM (IST)

    गजेंद्र पाटील नाशिक पोलीस आयुक्तालयात दाखल

    नाशिक - गजेंद्र पाटील नाशिक पोलीस आयुक्तालयात दाखल

    दोन वकिलांसह गजेंद्र पाटील पोलीस आयुक्तालयात हजर

    तक्रारदार गजेंद्र पाटील यांची आज गुन्हे शाखेकडून चौकशी

    पदोन्नती भ्रष्टाचार प्रकरणी आतापर्यंत 15 जणांना समन्स

    परिवहन आयुक्तांसह 9 जणांची चौकशी पूर्ण आणि जबाब नोंदवले

    आज गजेंद्र पाटील यांची चौकशी करून पुढील कारवाई होणार

    गजेंद्र पाटील यांनी पदोन्नती भ्रष्टयाचार प्रकरणात घेतले आहे परिवहन मंत्री अनिल परब यांचे नाव

  • 31 May 2021 11:48 AM (IST)

    शिक्षण मंत्र्यांकडून चेंबूरच्या गोरगरीब जनतेला अन्यधान्याचं मोफत वाटप

    - शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि नेता निलेश नानचे यांच्यांकडून चेंबूरच्या गोरगरीब जनतेला अन्यधान्याचं मोफत वाटप

    - 500 लोकांना वाटले धान्याचे पॅकेट्स

  • 31 May 2021 11:16 AM (IST)

    कल्याण दुर्गाडी खाडी पुलाचा दोन लेनच्या आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण

    कल्याण दुर्गाडी खाडी पुलाचा दोन लेनच्या आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण

    मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमाचा आधीच मनसे कार्यकर्ते कार्यक्रमस्थळी पोहोचले

    लोकार्पण करण्याच्या तयारीत असलेल्या मनसे कार्यकर्त्यांना कल्याण पोलिसांनी पिटाळून लावले

    मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर यांच्या पुढाकाराने हे काम झाले असल्याचा मनसेचा दावा

    श्रेयवाद लाटण्यासाठी शिवसेना भाजप मनसे मध्ये चुरस

  • 31 May 2021 11:12 AM (IST)

    पुणे जिल्ह्यात ऊस गाळप हंगामाची सांगता, `बारामती ॲग्रो´ कारखाना अव्वल

    बारामती : पुणे जिल्ह्यात ऊस गाळप हंगामाची सांगता...

    - चालू हंगामात १३२ लाख टन ऊसाचे गाळप..

    - ऊस गाळपात `बारामती ॲग्रो´ हा कारखाना अव्वल..

    - साखर उताऱ्यात सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने मारली बाजी..

    - माळेगाव सहकारी साखर कारखान्याने केले सर्वाधिक साखर उत्पादन.

  • 31 May 2021 10:57 AM (IST)

    ओबीसीचं आरक्षण रद्द झाल्याने भाजप आक्रमक, राज्य सरकारविरोधात नागपुरात आंदोलन

    - राज्य सरकारविरोधात नागपुरात भाजपचं आंदोलन सुरु

    - ओबीसीचं आरक्षण रद्द झाल्याने भाजप आक्रमक

    - नागपूरात संविधान चौकात भाजपचं राज्य सरकार विरोधात आंदोलन

    - भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळेंच्या नेतृत्त्वात आंदोलन

    - ‘ओबीसी समाजावर राज्य सरकारने अन्याय केला’

    - ओबीसी आरक्षणाकडे राज्य सरकारने जाणीवपुर्वक दुर्लक्ष केलं

  • 31 May 2021 10:33 AM (IST)

    नागपुरात निर्दयी आईकडून चिमुकल्या मुलाला मारहाण

    - नागपुरात निर्दयी आईकडून चिमुकल्या मुलाला मारहाण
    - नागपूरातील पांढराबोडी परिसरातील धक्कादायक घटना
    - मुलाला मारत असल्याचा व्हीडीओ व्हायरल
    - घरगूती वादाचा राग काढण्यासाठी केली चिमुकल्याला मारहाण
    - व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी घेतली दखल
    - अंबाझरी पोलिसांनी मुलाच्या आईचा बयान नोंदवला
  • 31 May 2021 10:31 AM (IST)

    पुणे जिल्ह्यात ऊस गाळप हंगामाची सांगता

    बारामती : पुणे जिल्ह्यात ऊस गाळप हंगामाची सांगता

    - चालू हंगामात १३२ लाख टन ऊसाचे गाळप

    - ऊस गाळपात `बारामती ॲग्रो´ हा कारखाना अव्वल

    - साखर उताऱ्यात सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने मारली बाजी

    - माळेगाव सहकारी साखर कारखान्याने केले सर्वाधिक साखर उत्पादन

  • 31 May 2021 10:00 AM (IST)

    इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादीला मिळेना एकमुखी नेतृत्व

    सांगली -

    इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादीला मिळेना एकमुखी नेतृत्व

    इस्लामपूर नगरपालिका निवडणूक 6 महिनेवर येऊन ठेपली

    पक्षात एकमुखी नेतृत्ववर शिक्का मोर्तब होत नाही

    त्यामुळे भविष्यात जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतीक पाटील यांच्या कडे जाणे ची शक्यता

    1985 पासून 35 वर्ष विजय पाटील यांच्या कडे होते नेतृत्व

    मात्र 2017 साली पराभव ला सामोरं जावं लागल

    थेट नगराध्यक्ष निवडीत निशिकांत पाटील यांनी विजय पाटील यांचा केला पराभव

    पराभव नंतर विजय पाटील झाले राजकारण पासून अलिप्त

    त्यामुळे पालिकेत एकमुखी नेतृत्व राहिले नाही

    विजय पाटील यांच्या निधनानंतर आज पर्येंत राष्ट्रवादी ला नेतृत्व नाही

  • 31 May 2021 08:27 AM (IST)

    नाशिक महापालिकेचे 2759 कोटींचे अंदाजपत्रक आज मंजुरीसाठी महासभेवर

    नाशिक - महापालिकेचे 2759 कोटींचे अंदाजपत्रक आज मंजुरीसाठी महासभेवर

    अंदाजपत्रकात यंदा 400 कोटींची वाढ

    पंचवटी,सिडको,सातपूर भागात 100 खाटांचे हॉस्पिटल उभारण्याची तरतूद

    ऑक्सिजन निर्मिती प्लांट साठी विशेष तरतूद

    उत्पन्न वाढीसाठी विशेष योजना आणण्यावर भर

    आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपाचा विकास कामांवर जोर

  • 31 May 2021 08:13 AM (IST)

    वर्ध्यात खताची काळाबाजारी करणाऱ्यांवर होणार कारवाई

    वर्धा

    - खताची काळाबाजारी करणाऱ्यांवर होणार कारवाई

    - कृषी विभागाने केले तक्रार करण्याचे आवाहन

    - विक्रेते अधिक दराने विक्री करण्याची शक्यता यामुळे वाढीव दराने खताची विक्री केल्यास तक्रार करण्याचे आवाहन

    - विविध पथक करणार कृषी केंद्रांची तपासणी

  • 31 May 2021 08:12 AM (IST)

    परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, परिवहन आयुक्तांसह 10 जणांची कसून चौकशी

    नाशिक - परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

    परिवहन आयुक्तांसह 10 जणांची कसून चौकशी

    चौकशीनंतर 10 जणांचे जाब नाशिक क्राईम ब्रांच कडून नोंदवले

    पदोन्नती, बदल्यांमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टयाचार झाल्याचा आरोप

    निलंबित मोटर वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी केले आहेत आरोप

    आज गजेंद्र पाटील यांच्या देखील चौकशीची शक्यता

  • 31 May 2021 08:00 AM (IST)

    खडकवासला धरणसाखळीतील सगळी धरणं सुरक्षित

    पुणे

    खडकवासला धरणसाखळीतील सगळी धरणं सुरक्षित,

    पावसाळ्याच्या आधीची धरणाची देखभाल दूरुस्तीची कामं पूर्ण,

    खडकवासला, पानशेत ,टेमघर, वरसगाव या धरणांची झाली देखभाल दुरुस्ती ,

    वरसगाव धरणाची गळती बंद करण्याचं काम सुरुय,

    आधूनिक यंत्रांच्या सहाय्याने ही दूरस्ती करण्यात आलीये,

    पावसाळ्यासाठी धरणं सज्ज असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आलीये

  • 31 May 2021 07:31 AM (IST)

    पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचं कामकाज आजपासून सुरळीत

    पुणे

    पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचं आजपासून कामकाज सुरळीत ,

    बाजार समितीत येणाऱ्या शेतमाल वाहन, टेम्पो चालकांकडून पे अँण्ड पार्किंगचे वसूल केले जात होते 200 रुपये ,

    पे अँण्ड पार्किंग बंद करा याविरोधात कामगार संघटनांनी हमाल कामगारांनी मार्केट बंदची घेतली होती भूमिका,

    मात्र आताच्या काळात मार्केट बंद ठेवणं शक्य नसल्यानं बाजार समितीनं काढलं पत्रक,

    यापुढे टेम्पो चालक आणि शेतमाल घेऊन येणाऱ्या वाहनांंना पार्किंग शुल्क आकारलं जाणार नाही, नाममात्र शुल्क हे द्यावं लागेल ,

    अशी माहिती बाजार समितीचे प्रशासक मधूकांत गरड यांनी दिलीये

    पार्किंग शुल्काचा निर्णय रद्द केल्यावर संघटनांनी आपला बंद मागे घेतलाय

    गेल्या आठवडाभरापासून कामगार संघटनांच सुरू होतं आंदोलन

  • 31 May 2021 07:27 AM (IST)

    काँग्रेस प्रदेशअध्यक्ष नाना पटोले आज एक दिवसीय भंडारा जिल्हा दौऱ्यावर

    भंडारा

    काँग्रेस प्रदेशअध्यक्ष नाना पटोले आज एक दिवसीय भंडारा जिल्हा दौऱ्यावर.

    जिल्ह्यातील विविध विषयांवर प्रमुख अधिकारी यांच्याशी बैठक असणार आहे.

    कोरोणा काळात दगावलेल्या जिल्ह्यातील कोंग्रेस कार्यकर्ता यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देणार आहे.

    दुपारी 2.00 वाजता प्रेस असणार आहे.

  • 31 May 2021 07:26 AM (IST)

    पुणे महापालिकेच्या 9 हजार कर्मचाऱ्यांना मिळणार हक्काच घरं

    पुणे

    पुणे महापालिकेच्या 9 हजार कर्मचाऱ्यांना मिळणार हक्काच घरं,

    महापालिकेच्या वसाहत पुर्नविकास योजनेला सुरुवात

    महापालिकेच्या पुर्नविकास झालेल्या वसाहतीत कर्मचाऱ्यांना मिळणार घरं,

    शहरात विविध भागात 20 हून अधिक महापालिकेच्या इमारती आहेत, या इमारतींचा पुर्नविकास केला जाणाराय,

    पुणे महापालिकेचे 26 हजार कर्मचारी आहेत, त्यापैकी 1500 जणांची या वसाहतीत सोय झाली आहे,

    पुर्नविकास वसाहतीची काम लवकरात लवकर सुरु करून कर्मचाऱ्यांना घरं देणार,

    महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

  • 31 May 2021 07:02 AM (IST)

    नागपुरात बनावट नोटा छापून त्या चलनात आणणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेने केली अटक

    नागपुरात बनावट नोटा छापून त्या चलनात आणणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेने केली अटक,

    निलेश कडवे आणि मारूफ खान असं अटक केलेल्या आरोपींची नावे,

    भाड्याचे घर घेऊन 100, 50, 20 आणि 10 रुपयांच्या नोटा छापण्याचा सुरू होता प्रकार,

    गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून केली कारवाई,

    1 लाख 28 हजार 382 रुपयांच्या नोटा केल्या जप्त,

    अनेक नोटा चलनात असण्याची शक्यता

  • 31 May 2021 06:50 AM (IST)

    सामना अग्रलेख – जाग मराठा आम जमाना बदलेगा, आता लढाई दिल्लीत!

    महाराष्ट्राच्या जडणघडणीत मराठा समाजाचे योगदान मोठे आहे. पण आज हा स्वाभिमानी, कष्ट करणारा समाज आर्थिकदृष्टय़ा पीछेहाटीस लागला.

    म्हणूनच या समाजाला 16 टक्के आरक्षण देणारा कायदा महाराष्ट्र सरकारने केला, पण सर्वोच्च न्यायालयाने त्यावर आक्षेप घेतला.

    त्यामुळे पुढची लढाई दिल्लीतच लढावी लागेल. मराठा आरक्षणाबाबत ठाम भूमिका महाराष्ट्र सरकारने घ्यावी, असे संभाजीराजे छत्रपती सांगतात.

    पण शेवटी निकाल दिल्लीलाच घ्यायचा आहे. त्यामुळे मराठय़ांच्या स्वाभिमानाची धडक दिल्लीच्या दरवाजावरच मारावी लागेल.

    ‘दो कवडी के मोल मराठा बिकने को तैयार नहीं’ हा संयुक्त महाराष्ट्र लढय़ाचा माहोल दिल्लीत पुन्हा निर्माण करावा लागेल

  • 31 May 2021 06:49 AM (IST)

    केरळमध्ये पावसाचा नवा मुहूर्त 3 जून

    पुणे : अंदमानातील जोरदार प्रवेशानंतर वेगाने कूच करणाऱ्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रवासाला सध्या पोषक स्थिती नसल्याने खीळ बसली आहे. त्यामुळे त्यांचे केरळमधील आगमन लांबणीवर पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हवामान विभागाने मोसमी वारे केरळमध्ये दाखल होण्याचा नवा मुहूर्त ३ जून असा जाहीर केला आहे. ते तेथे पोहोचल्यानंतरच त्यांची महाराष्ट्राकडे वाटचाल होण्याचा अंदाज आहे.

  • 31 May 2021 06:35 AM (IST)

    पुण्यात पेट्रोलने शंभरी ओलांडली

    पुणे

    पुणे शहरात पेट्रोच्या दराने गाठलं शतक

    आजपासून पुणे शहरात पेट्रोल शंभरच्या पार

    पहिल्यांदाच पुण्यात पेट्रोल 100 रुपयेच्या पूढे

    पेट्रोल तब्बल 34 पैशांनी वाढलं

    डिझेलच्या दरातही वाढ

    शहरात आज 100.15 रुपये दराने मिळणार पेट्रोल

    तर डिझेल 90.71 रुपये

Published On - May 31,2021 10:27 PM

Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.