
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. पूजा खेडकर यांच्यासोबतच त्यांचं अख्ख कुटुंब वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. आधी आई मनोरमा खेडकर यांच्याविरोधात पुणे जिल्ह्यातील पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. त्यानंतर आता मनोरमा खेडकर यांच्या बंगल्याला नोटीस लावली आहे. इतकंच नव्हे तर पूजा खेडकर यांच्या वडिलांचे कारनामे हे लेकीच्या एक पाऊल पुढे आहेत. दिलीप खेडकर यांनी खाजगी वाहनावर ‘भारत सरकार’ बोर्ड वापरल्याचं छाननीत समोर आहे. इतकं थोडं म्हणून आता बंगल्याचा काही भाग हा रस्त्यावर अतिक्रमण करून बांधल्याचं समोर आलं आहे.
पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या बंगल्याला नोटीस लावण्यात आली आहे. पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने नोटीस लावली आहे. रस्त्याच्या बाजूला फुटपाथवर अतिक्रमण झालं आहे. हे अतिक्रमण 7 दिवसात काढून घ्या अन्यथा कारवाई करणार असं या नोटीसमध्ये म्हणण्यात आलं आहे.
मुळशीमधील व्हायरल व्हीडीओनंतर अखेर वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्यावर पौड पोलीस स्टेशनंमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोरमा खेडकर यांच्यासह दिलीप खेडकर, अंबादास खेडकर, दोन पुरुष बाउंसर, दोन महिला बाउन्सर आणि घटनेवेळी त्यांच्यासोबत आलेल्या इतर गुंड व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतकरी पंढरीनाथ कोंडीबा पासलकर यांच्या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातल्या धडवली गावात खेडकर कुटुंबाने 25 एकर जमीन खरेदी केली होती. ती ताब्यात घेताना शेजाऱ्यांचीही न्यायप्रविष्ट असलेली जमीन ताब्यात घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. यावेळी शेजारी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांनी विरोध केला तेव्हा मनोरमा खेडकर या बाउन्सर घेऊन त्या ठिकाणी पोहोचल्या. त्यांनी हातात पिस्तूल घेऊन या शेतकऱ्यांना धमकावले होतं. त्याचा हा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर तब्बलं एक वर्षानंतर त्यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकरांचा नवा कारनामा समोर आला आहे. दिलीप खेडकर यांनी खाजगी वाहनावर ‘भारत सरकार’ बोर्ड वापरल्याचं छाननीत समोर आलं आहे. थर्मोवेरिटा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या पजेरो गाडीवर ‘भारत सरकार’चा बोर्ड लावला. आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी ट्विट करत चौकशीची मागणी केली आहे.
IAS Puja Khedkar’s father, Dilip, is under scrutiny for using a ‘Government of India’ board on a private vehicle belonging to Thermoverita Pvt Ltd. #IllegalUse #IAS #GovernmentBoard #Accountability pic.twitter.com/zbTV0NlcKV
— Vijay Kumbhar (@VijayKumbhar62) July 13, 2024