
“मी शांतीपूर्वक आंदोलन करणार आहे. परंतु आंदोलन केल्यानंतर उच्च न्यायालय, सुप्रीम कोर्टाने ऐकलं नाही, तर आमच्याकडे ब्रह्मशस्त्र आहे. शस्त्र म्हणजे उपोषण करु असं म्हटलं. महात्मा गांधींनी शस्त्र उचलली का?. अहिंसेचा संदेश दिला. आम्ही अहिंसावादी आहेत. आम्ही शस्त्र कधी उचलणार नाही” असं जैनमुनीने शस्त्र उचलण्याच्या वादावर स्पष्टीकरण दिलं आहे. “राजसाहेबांना विनंती आहे की, तुम्ही मराठी भाषेची देवता आहात. आमची मारवाडी लोक तुमच्यासोबत आहेत” असं जैनमुनी म्हणाले.
“समाजाचे संत म्हणून सरकारवर विश्वास आहे. आमचे देवाभाऊ एक हिंदुत्ववादी, मोदींच्या विचाराचं सरकार आहे. एकनाथ शिंदे यांनी गोमातेला राज्यमाता घोषित केलं ते जीवदया प्रेमी आहेत. मला असं वाटत जैन लोकांची भावना समजत असतील, तर त्यांनी एक समिती बनवून कबूतर वादाचा अंत केला पाहिजे” असं जैनमुनी म्हणाले. जैन, गुजराती, मारवाडी समाजातील प्रमुख नेत्यांना, संघटनांना तुमची भूमिका मान्य नाही असं म्हटल जातय. त्यावर जैन मुनींनी उत्तर दिलं.
त्यावेळी शिवेसना एका कोंबडीमुळे हरलेली
“काही वर्षापूर्वी जैन मंदिरासमोर मांसमच्छी टाकली. त्यावर एकासंताने आव्हान केलेलं की, शिवसेना, मनसेला मत देऊ नका. आमच्या जैन मंदिरासमोर मांस टाकलं. एका जैनगुरुने म्हटलं त्यावेळी शिवेसना एका कोंबडीमुळे हरलेली. तो जैनगुरु कोंबडीवर बोलला. पण आता कबुतरावर बोलत नाही. मी कुठल्या पक्षाच समर्थन करत नाही. मी जीवदया प्रेमी आहे. मी कुठल्या पक्षाचा नाही, कोण नेता, काय बोलतो याच्याशी देणघेण नाही” असं जैनमुनी म्हणाले. “मी मुंबईला आंदोलनासाठी आलोय. कोणत्या नेत्याचा प्रचार करायला आलेलो नाही. पूर्ण जैन समाज माझ्यासोबत आहे. एक लाख लोक माझ्यासोबत उपोषणाला बसणार” असा त्यांनी दावा केला.
कबुतरांसाठी मरणं हे माझं सौभाग्य
“काही लोक म्हणाले महाराजांनी न्यायालयाचा अपमान केला. मी म्हटलं हाय कोर्टात नाही, तर सुप्रीम कोर्टात जाऊ. तिथे नाही झालं, तर परमात्म्याच्या कोर्टात जाऊ. म्हणजे उपोषण करु. कबुतरांसाठी मरणं हे माझं सौभाग्य आहे. त्यासाठी मी मोक्ष प्राप्त करायला तयार आहे. मी राज्य सरकार, फडणवीसांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. राजसाहेब, एकनाथ शिंदेंना भेटणार आहे. माझ्यामुळे मराठी समाज दुखावला असेल, तर माफी मागतो. जैन समाजाने सुरी, तलवारी आणल्या होत्या, ते कोणाला मारायला नाही, तर जी शेड टाकलेली ती कापण्यासाठी” असं जैन मुनीने सांगितलं.