AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kabutar Khana : दादर कबूतर खाना परिसरात तणाव, ‘शस्त्र उचलणार असाल, तर ते…’ मराठी एकीकरण समितीचा संताप

Kabutar Khana : दादर कबूतर खाना परिसरात तणाव निर्माण झाला आहे. मराठी एकीकरण समितीचे आंदोलक तिथे आहेत. मागच्या आठवड्यात तिथे झालेलं आंदोलन, त्याला विरोध म्हणून आणि कबूतर खाना बंदीच समर्थन करण्यासाठी आंदोलक तिथे एकवटले आहेत. यावेळी एकीकरण समितीच्या आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड सुरु होती.

Kabutar Khana : दादर कबूतर खाना परिसरात तणाव, 'शस्त्र उचलणार असाल, तर ते...' मराठी एकीकरण समितीचा संताप
Kabutar Khana Protest
| Updated on: Aug 13, 2025 | 5:45 PM
Share

हाय कोर्टाच्या आदेशानुसार दादर येथील कबुतर खाना बंद झाला आहे. त्या विरोधात मागच्या आठवड्यात तिथे आंदोलन झालं होतं. यात जैन समाजाचे सुद्धा लोक होते. कबुतर खान्यामध्ये घुसून आंदोलकांनी ताडपत्री फाडल्या होत्या. या सगळ्या प्रकाराला विरोध करण्यासाठी आणि कबूतर खाना बंदीच समर्थन करण्यासाठी आता मराठी एकीकरण समितीने दादर कबूतर खान परिसरात आंदोलनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. या विरोधात एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दात चीड आणि संताप व्यक्त केला.

“पत्रकार आले बाईट मागत होते. आम्ही बाईट दिला, त्यासाठी जर कारवाई होत असेल, तर आमचा हाच प्रश्न आहे. एवढी आंदोलनं झाली. शस्त्र उचलण्याची भाषा झाली. त्याच्यावर काय तुम्ही कारवाई केली. हाच प्रश्न आहे आमचा. आज मराठी माणसाला एकत्रित येण्याची गरज आहे. तेच आम्ही करतोय. मराठी माणासाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय” असं मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्याने म्हटलं.

प्रत्येक समाज घटक ताकद दाखवतोय

“हा धार्मिक विषय नाही. आम्ही तेच सांगतोय, समाज हिताचा प्रश्न आहे. कुठला जातीयवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असाल, शस्त्र उचलण्याबाबत बोलत असाल, तर कोणावर उगारणार हे पण सांगा. आमची छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार उचलण्याची संस्कृती आहे. हे सर्व प्रकार थांबले पाहिजेत. प्रत्येक समाज घटक ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतोय. छुपा अजेंडा घेऊन मराठी माणसाला ताकद दाखण्याचा प्रयत्न होतोय, हे थांबलं पाहिजे” असं मराठी एकीककरण समितीने म्हटलय.

त्यांच्यावर काय कारवाई केली ?

“ज्यावेळी आमच्या मराठी एकीकरण समितीने मीरारोड-भाईंदरमध्ये आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी नोटीस दिली, मोर्चाला परवानगी नाकारली. परवा जो प्रकार घडला, त्यात चाकू, सुरे आणून ताडपत्र्या फाडल्याय. त्यांच्यावर काय कारवाई केली हे जाहीर करावं. आमचं मराठा आरक्षण, धनगर आरक्षण आंदोलन असेल, शेतकऱ्यांच आंदोलन असेल गुन्हे दाखल होतात. मग इतक्या संवेदनशील भागात जो काय प्रकार घडला, त्यांच्यावर काय कारवाई केली हा आमचा प्रश्न आहे” असं मराठी एकीकरण समितीचा आंदोलक म्हणाला.

‘आम्ही दाखून देतो कितीचा मोर्चा काढू शकतो ते’

जैनमुनी म्हणतात लाखभराचा मोर्चा काढू असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर हा आंदोलक म्हणाला की, “हा जो प्रकार आहे एका लाखाचा मोर्चा काढू तो पोलीस प्रशासनाला, शासकीय व्यवस्थेला दिलेलं आव्हान आहे. आम्ही मराठी आहोत, आम्ही दाखून देतो कितीचा मोर्चा काढू शकतो ते. आमच्या मराठी मातीच दुर्देव आहे, आम्हाला आमच्या महाराष्ट्रात मराठीच्या अधिकारासाठी भांडावं लागतय. यापुढे हे सहन केलं जाणार नाही”

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.