BREAKING : जितेंद्र आव्हाड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला, महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं चाललंय तरी काय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे.

BREAKING : जितेंद्र आव्हाड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला, महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं चाललंय तरी काय?
Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 21, 2022 | 6:49 PM

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आलीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळालीय. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह इथे या दोन्ही बड्या नेत्यांची भेट झाल्याची माहिती समोर आलीय.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मतदारसंघातील विकासकामा संदर्भात चर्चा करण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलीय. त्यांच्यासोबत मतदारसंघातील आणखी 20 ते 25 स्थानिक नागरिक देखील सह्याद्री अतिथीगृहात उपस्थित असल्याची माहिती समोर आलीय. या भेटीत आव्हाड त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भात देखील चर्चा होण्याची दाट शक्यता वर्तवली जातेय.

जितेंद्र आव्हाड आणि एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांचा मतदारसंघ ठाणे जिल्ह्यात येतो. त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राजकीय वैर हे सर्वश्रूत आहे. विशेष म्हणजे दोन आठवड्यांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आल्याने महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं होतं.

ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये प्रवाशांना मारहाण केल्याच्या आरोपांप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. पण जामिनावर त्यांची सूटका झाली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड मुंब्र्यातील एका उड्डाणपुलाच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमात एकाच मंचावर दिसले होते. त्यावेळी गर्दीत जितेंद्र आव्हाडांनी आपला विनयभंग केल्याचा आरोप एका भाजप महिला कार्यकर्ताने केला होता.

महिलेच्या विनयभंगाच्या आरोपांमुळे जितेंद्र आव्हाड अस्वस्थ झाले होते. आव्हाडांनी थेट आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. पण पक्षश्रेष्ठींनी समजूत काढल्यामुळे त्यांनी राजीनामा मागे घेतला. या सगळ्या घडामोडींनंतर जितेंद्र आव्हाडांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आव्हाड आणि मुख्यमंत्री यांच्यात नेमकी का भेट झाली? असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होतोय.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.